नाशिक मनपा शिक्षकांच्या योगदानामुळे वाचले विद्यार्थिनीचे प्राण या विषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील शिक्षकांनी एक आदर्श सर्वासमोर ठेवला आहे.मनपा शाळा क्र.२८ मध्ये शिकणा-या विद्यार्थिनीला व परिवाराला अडचणीच्या काळात मनपा शिक्षण विभागातील शिक्षकांनी मदत करून तिचे प्राण वाचवले.नाशिक मनपा शिक्षण विभाग शाळा क्रमांक 28 सातपूर कॉलनी शाळेतील विध्यार्थीनी समृद्धी हिचे वडील मोलमजुरी करतात तर आई दुसऱ्यांच्या घरी जाऊन धुणी-भांडी करते. यामुळे घरची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत बेताची आहे.अशा परिस्थितीत समृद्धी ला अनेक आजारांनी ग्रासले आणि उपचारासाठीचा होणारा खर्च तिच्या पालकांकडून भरला जात नव्हता अशा वेळेस तिच्या शिक्षकांनी व मनपा शिक्षण विभागातील इतर शिक्षकांनी,कर्मचार्यांनी तिच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली.
हे ही वाचा: पल्स पोलिओ लसीकरण मोहिम नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात 3 मार्च रोजी
समृद्धी कुंभार ही नाशिक मनपा शिक्षण विभाग शाळा क्रमांक 28 सातपूर कॉलनी शाळेत सातवीत शिकते . समृद्धीच्या घरची परिस्थिती ही अत्यंत बेताची आहे. या तिच्या बेताच्या परिस्थितीत तिला न्यूमोनिया, डेंग्यू , टायफाईड, स्वाइन फ्ल्यू, यांच्या एकत्रित संक्रमणाने एचएलएस या आजाराने ग्रासले. सुरुवातीला सातपूर कॉलनीतील एका खाजगी रुग्णालयात तिचे उपचार सुरू होते पण खर्च वाढल्याने तिच्या आई-वडिलांनी तिला एसएमबीटी रुग्णालयात दाखल केले. पुढे तिच्या उपचारासाठी एक लाख रुपये लागणार होते जे भरणे शक्य नव्हते.
हे ही वाचा: प्रवेशोत्सव : सातपुर भागातील केंद्र क्र.२१ व १४ चा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
समृद्धीचे वर्गशिक्षक सुरेश चौरे नेहमी पालकांच्या संपर्कात असायचे आणि म्हणून त्यांना लवकरच समृद्धीची परिस्थिती कळाली. सुरेश चौरे यांनी त्यांच्या सहकारी शिक्षकांच्या व्हाट्सअप ग्रुप वर समृद्धीची परिस्थिती मांडली. समृद्धीच्या उपचारासाठी शाळेतील उपशिक्षक सुरेश खांडबहाले यांनी आर्थिक मदत करण्याचा मेसेज शिक्षकांच्या ग्रुप वर टाकून समृद्धीच्या पालकाच्या फोन पे नंबर वर आर्थिक मदत करावी असे त्यांना आवाहन केले.
सुरेश खांडबहाले यांच्यासह सुरेश चौरे, यशवंत जाधव आणि पुनाजी मुठे यांनी त्यांना मदत केली, त्याचबरोबर इतर शिक्षक,कर्मचारी व पालक यांनी सुद्धा मदत केली.
या आव्हानाला मनपाच्या शिक्षकांनी 200 ते दोन हजार पर्यंतची आर्थिक मदत देऊन समृद्धीच्या उपचारासाठी एक लाख पाच हजार रुपयांचा प्रबंध केला.अशाप्रकारे मनपाच्या शिक्षकांमुळे समृद्धीचे प्राण वाचले आणि तिला जीवनदान मिळाले. आता एक महिन्यानंतर समृद्धीचे उपचार पूर्ण झाल्याने ती तिच्या घरी परतली आहे.
हे ही वाचा: नाशिक मनपा धृवनगर शाळेत महिला दिन उत्साहात संपन्न
शिक्षकांच्या मदतीने आज या विद्यार्थिनीला जीवनदान मिळाले आहे आणि शिक्षकांच्या या कृत्यामुळे माणुसकीचे खरे दर्शन घडून आले आहे,तसेच समृद्धीचे आई-वडील यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. त्यांच्या योगदानामुळे त्यांची मुलगी जीवित आहे.शिक्षक हा फक्त गुरु नसून तो जीवनदाता ही होऊ शकतो हे त्याचे अनोखे उदाहरण आहे.