नाशिक मनपा ध्रुवनगर शाळेत महिला दिन उत्साहात संपन्न या विषयी सविस्तर माहिती
Table of Contents
मनपा शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर मध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात पार पडला. 8 मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त शालेय सुट्टी असल्याने हा कार्यक्रम 9 मार्च रोजी मनपा शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर मध्ये आयोजित करण्यात आला होता.
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाची मनपा शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर एक उपक्रमशील शाळा असून या शाळेमध्ये दिनविशेष,पुण्यतिथी,जयंती,शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात येत असतात त्याचबरोबर अनेक समाजपयोगी उपक्रम या शाळेत आयोजित करण्यात येत असतात.
हि ही वाचा: पल्स पोलिओ लसीकरण मोहिम नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात 3 मार्च रोजी
या कार्यक्रमाप्रसंगी पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केलेल्या होत्या. त्या वेशभूषा आज पर्यंत झालेल्या कर्तुत्वान महिला यांच्या होत्या. या वेशभूषा केलेल्या कर्तृत्वान महिलांनी किंवा पात्रांनी आपले समाजाप्रती केलेले कार्य त्यांनी स्वतः सांगितले.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केली.. शाळेचे मुख्याध्यापक सोनजी गवळी यांनी आज पर्यंतच्या कर्तुत्ववान महिलांचे कार्य त्यांनी मुलांना सांगितले. त्यांच्या कार्याची आपल्या देश उभारणीस किती मोठी मदत झालेली आहे याविषयी सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले.या निमित लंगडी चे सामने ही आयोजित करण्यात आले होते.
हे ही वाचा: शिवजयंती : ध्रुवनगरच्या मनपा शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न
इयत्ता तिसरी अ च्या वर्गशिक्षिका दिपाली काळे यांनी मुख्याध्यापक सोनजी गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केलेले होते. महिला दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ञ उषाताई दिपके या होत्या. महिला दिनानिमित्त उषाताई दिपके यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कार्यक्रमाचे थोडक्यात सूत्रसंचलन उपशिक्षक ईश्वर चौरे यांनी केले.या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती शाळेचे मुख्याध्यापक रंगनाथ चव्हाण यांची होती.त्यांचा ही सत्कार या वेळी करण्यात आला.
हे ही वाचा: सावित्रीबाई फुले म.न.पा शाळा क्र.७८ (ISO मानांकित) शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभ संपन्न
महिला दिनाच्या कार्यक्रमाला सर्व शिक्षकांची अर्थात मुख्याध्यापक सोनजी गवळी, उपशिक्षिका लता सोनवणे, कल्पना पवार, दिपाली काळे, उपशिक्षक नामदेव जानकर, संतोष महाले, ईश्वर चौरे इत्यादींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.