प्रवेशोत्सव : सातपुर भागातील केंद्र क्र.२१ व १४ चा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

प्रवेशोत्सव : सातपुर भागातील केंद्र क्र.२१ व १४ चा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न या विषयी सविस्तर माहिती

२१ मार्च रोजी केंद्र क्र.२१ व केंद्र क्र.१४ विश्वासनगर व कामगारनगर मधील शाळांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.या प्रवेशोत्सवात या केंद्रातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये मनपा शाळा क्र.१७,२०,२१,२२,२३,२४,२५ व ३५ इत्यादी शाळांचा सहभाग होता.मनपा शाळांची पटसंख्या वाढीसाठी प्रवेशोत्सव हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.यामुळे मनपा शाळा प्रवेश व शिक्षणाविषयी जागृती या दोन्ही गोष्टी साध्य होतात.हा उपक्रम केंद्र क्र.२१ व १४ या केंद्राचे केंद्रसमन्वयक प्रकश शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

YouTube वर व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

गाणे : आमच्या मनपाची शाळा लई भारी

याप्रसंगी शाळेतील विध्यार्थांनी वेगवेगळ्या वेशभूषा केल्या होत्या. या प्रसंगी शाळेच्या प्रवेशाबाबत जनजागृती गीते गाण्यात आली.विद्यार्थ्यांकडून यावेळी पथनाट्य ही सादर करण्यात आली.नाशिक महानगरपालिका मनपा शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी.टी.पाटील यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला होती. या प्रवेशोत्सव कार्यक्रमामध्ये त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.विध्यार्थीनींनी लेझीम ने त्यांचे स्वागत केले. शालेय विध्यार्थ्यानी अतिशय उत्साहात जनजागृती मिरवणूक काढली. अशोकनगर,शिवाजीनगर आणि धृवनगर या भागामध्ये ध्वनीक्षेपकावर प्रवेशाबाबत जागृती करण्यात आली .

YouTube व्हिडीओ पाहण्यसाठी यावर क्लिक करा.

मनपा शिक्षण विभाग नाशिक केंद्र क्रमांक २१ व १४ अंतर्गत नाशिक महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील यांच्या शुभहस्ते प्रवेशोत्सव व मतदान जनजागृती संदर्भात सातपूर प्रभागात सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी पथनाट्य व गीत सादर केले.

हे ही वाचा: नाशिक मनपा धृवनगर शाळेत महिला दिन उत्साहात संपन्न

रमेश भोये, रत्नेश चौधरी, कमलेश खैरनार, शारदा घुले यांनी प्रवेशावर आधारित उत्कृष्ट असे गीतांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाची सुरुवात रत्नेश चौधरी यांनी महाराष्ट्र गीताने केली. यावेळी इयत्ता पहिली मध्ये दाखल होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते प्रवेशित करण्यात आले.

व्हिडीओ पाहण्यसाठी येथे क्लिक करा

प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे नियोजन आयोजन केंद्राचे केंद्रसमन्वयक प्रकाश शेवाळे व सर्व मुख्याध्यापक,सर्व शिक्षकवृंद यांनी केले. यावेळी शिक्षणाधिकारी यांनी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना कौतुकाची थाप दिली. सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांविषयी गौरवोद्गार काढले. इतर केंद्रापेक्षा केंद्र क्र.२१ व १४ या केंद्राचा कार्यक्रम सरस झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा: पल्स पोलिओ लसीकरण मोहिम नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात 3 मार्च रोजी

या कार्यक्रमासाठी जी कमिटी तयार केली होती त्या कमिटीतील रमेश भोये, रत्नेश चौधरी, कमलेश खैरनार,मोहन चौधरी,श्वेता बोरसे, शितल दशपुते ,रश्मी तडस ,रूपाली ठोक, ईश्वर चौरे, उत्तम गर्दे, सुनील गावित त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाची प्रसिद्धीची चित्रीकरणासह हमी नामदेव जानकर यांनी घेतली.कार्यक्रमाला सर्वांचे सहकार्य लाभले.

Leave a Comment