उन्हाळी सुट्टी: 2 मे पासून राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर !

उन्हाळी सुट्टी: 2 मे पासून राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर ! या विषयी सविस्तर माहिती

नाशिक जिल्हयातील प्राथमिक, शाळांच्या सन 2024 च्या सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरु शासनाने संपुर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सुचना निर्गमित केल्या आहेत.

हे ही वाचा: उष्णतेची लाट विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत

या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सन २०२४ च्या सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरु करणेबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

1) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्याना गुरुवार दि.02 मे 2024 पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
2) राज्यातील इतर मडंळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घेतला जाईल.

हे ही वाचा: पल्स पोलिओ लसीकरण मोहिम नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात 3 मार्च रोजी

3) शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मडंळाच्या शाळा शनिवारी दि. 15 जून 2024 रोजी सुरु करण्यात येतील.

Leave a Comment