औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघात विक्रम काळे विजयी

औरंगाबादः औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे हे विजयी झाले.2017 पर्यन्त निवडणुकीत विक्रम काळेंना सहज विजय मिळाला. मात्र मागील निवडणुकांच्या तुलनेत यावेळच्या विजयासाठी त्यांना बरचसी कसरत करावी लागली. शेवटच्या फेरीपर्यंतही त्यांना विजयासाठीचा कोटा पूर्ण करता आला नाही. मागील निवडणूकीत त्यांना कोट्या पर्यन्त सहज गेले होते.त्यामुळे त्यांना सर्वाधिक मते मिळाल्याने निर्वाचीन अधिका-यांनी काळे यांना विजयी घोषित करण्यात आले.
 आज सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरूवात झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीचा निकाल हाती आल्यापासूनच विक्रम काळे यांनी आघाडी घेतली होती. मात्र पहिल्या पसंतीक्रमाची मतांवर त्यांना यावेळी विजयासाठी निश्चित करण्यात आलेला २५ हजार ३८६ मतांची कोटा पूर्ण करता आला नाही.
मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांनी खेचलेली पहिल्या पसंतीक्रमाची साडेतेरा हजारांहून अधिक मते यामुळे विक्रम काळे यांच्या विजयात चांगलाच अडथळा निर्माण झाला. त्यामुळे दुसऱ्या पसंतीक्रमाची मते मोजावी लागली. मागच्याही निवडणुकीत मराठवाडा शिक्षक संघाकडून  व्यंकटराव पवार हे निवडणुकीच्या मैदानात होते. परंतु त्यावेळी त्यांचे आव्हान  ७ हजार ४९८ मतांवरच संपुष्टात आल्यामुळे विक्रम काळेंना विजयाकडे सहज वाटचाल करता आली होती.
 यंदा मराठवाडा शिक्षक संघटनेने चांगलाच जोर लावून निवडणूक लढवल्यामुळे विक्रम काळेंना सहज मिळणारा ‘विक्रमी’  विजय अवघडात घेऊन गेला. त्यामुळे यापुढील काळात मराठवाडा शिक्षक संघाचे आव्हान दुर्लक्षून चालणार नाही, हे या निवडणुकीने सिद्ध करून दाखवले.
मराठवाडा शिक्षक संघाच्या आव्हानामुळे ही निवडणूक चुरशीची आणि अटीतटीची झाली. मतमोजणीच्या बाराव्या फेरीअखेर निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या १४ उमेदवारांपैकी ११ उमेदवार एलिमिनेट होऊन मतमोजणीच्या फेरीतून बाद झाले. बाराव्या फेरीत महाविकास आघाडीचे विक्रम काळे, भाजपचे किरण पाटील आणि मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव हे तीनच उमेदवार टिकून राहिले.
या फेरीत विक्रम काळेंना २१ हजार १०२ मते, किरण पाटलांना १४ हजार १८२ मते तर सूर्यकांत विश्वासराव यांना १४ हजार १२८ मते मिळाली. या फेरीअखेर विक्रम काळेंनी घेतलेली आघाडी पाहता ही लीड मागे पडणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नसल्याचे चित्र दिसताच विक्रम काळेंच्या समर्थकांनी विजयाचा जल्लोष केला.
सर्व पसंतीक्रमाची मते मोजूनही एकाही उमेदवाराला विजयासाठी निश्चित करण्यात आलेला कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे सर्वाधिक २३ हजार ५८० मते मिळालेले महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांना विजयी घोषित करण्यात आले. विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी विक्रम काळे यांना विजयाचे प्रमाणपत्र बहाल केले. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय उपस्थित होते.

२०१७ च्या तुलनेत यंदा विक्रम काळेंची मते घटली

फेब्रुवारी२०१७ मध्ये झालेल्या औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विक्रम काळे यांना २५ हजार २८८ मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतांच्या संख्येत घट झाली असून यंदाच्या निवडणुकीत सर्व पसंतीक्रमांची सर्व मते मोजून झाली तरीही त्यांना २४ हजार मतांचा आकडाही गाठता आला नाही. विक्रम काळे यांनी २०१७ ची निवडणूक पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच मुसंडी मारून सहज जिकंली होती. यावेळी मात्र त्यांच्या विजयापुढे चांगलेच आव्हान उभे राहिले.

निवडणूक निकालानंतर विक्रम काळे माध्यमांशी बोलताना म्हणाले …

बुद्धीवंतानी आणि विचारवंतांनी माझ्यावर विश्वास ठेवला- काळे

यापुढच्या काळात मी पहिल्या दिवसापासून कामाला लागलेला असतो. उद्यापासूनच तुम्हाला मी मराठवाड्यातील एखाद्या शाळेत दिसून येईल. कारण माझी बांधिलकी ही शिक्षक कर्मचाऱ्यांशी आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन मिळवून देणं यासारखे विविध प्रश्न सोडविण्याचं काम मी करणार आहे. टीका-टिप्पणी करत राहतात लोकं. पण तुम्ही माझ्या प्रचाराचं तंत्र पाहिलं असेल. मागील तीनही निवडणुकीत मी कोणत्याही उमदेवाराच्या टीकेकडे लक्ष दिलं नाही. मी कधीही त्याला प्रत्युत्तर देखील देत नाही. कारण माझ्यापुढे डोंगराएवढं काम आहे. ते पूर्ण करण्यासाठीच माझ्याकडे काम नाही. तर त्यांच्या टीकेला मी कुठे उत्तर देत बसू.. कारण ही काही साखर कारखान्याची निवडणूक नाही. ही बुद्धीवंत आणि विचारवंतांची निवडणूक आहे. शिक्षणाने आम्हाला विवेक आणि विचार दिलेला आहे. त्यामुळे हे विचारपूर्वक मतदान करणारे माझे मतदा

Leave a Comment