विज्ञान प्रदर्शन व स्पर्धेमध्ये सहभागी होऊन बक्षीसे जिंका !

विज्ञान प्रदर्शन व स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण ! या विषयी सविस्तर लेख

रोटरी क्लब नाशिक रोड, नाशिक यांच्या वतीने दिनांक २७ जुलै २०२५ रोजी Combined Primary School, देवळाली कॅम्प, नाशिक येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक संकल्पना सादर करण्याची आणि इतरांच्या प्रकल्पांमधून शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हे- प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करण्यास व त्यांच्या सृजनशीलतेला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरेल.

हे ही वाचा: नाशिक जिल्ह्यातील दुधाचा धबधबा एक लोकप्रिय पर्यटन स्थळ !

तरी, आपल्या शाळेतील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना या विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. सोबतच या संदर्भातील माहिती पत्रक संलग्न केलेले आहे. त्याचे काळजीपूर्वक वाचून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे, प्रकल्पाचे विषय व इतर आवश्यक तपशील वेळेत आयोजकांकडे पाठवावेत. सदर उपक्रमातील विद्यार्थ्याचा सहभाग ऐच्छिक स्वरूपाचा आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

विज्ञान प्रदर्शन व स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण

आपल्याला कळवताना अत्यंत आनंद होत आहे की रोटरी क्लब ऑफ नाशिक रोड, नाशिक महानगरपालिका (शिक्षण विभाग), जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) आणि आर्टिलरी सेंटर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी व नवनवीन कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

कार्यक्रम तपशील

दिनांकः रविवार, २७ जुलै २०२५
वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी २:००
स्थळः कॉम्बाइन्ड प्रायमरी स्कूल ग्राउंड, गुरुद्वाऱ्याच्या समोर, देवळाली, नाशिक
थीमः विज्ञान आणि समाज, शाश्वत भविष्यासाठी नवनवीन कल्पना, ऊर्जा आणि शक्ती

हे ही वाचा: ध्रुवनगर मनपा शाळेतील उपशिक्षिका लता सोनवणे यांचा सेवापूर्ती समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न.

आपल्या प्रतिष्ठित शाळेस या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मनःपूर्वक आमंत्रण देण्यात येत आहे. या विज्ञान प्रदर्शन व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना इतर शाळांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची आणि विविध वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्याची संधी मिळेल.

विद्यार्थ्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे

श्रेणी १: मराठी माध्यम इयत्ता ६ वी व ७ वी
श्रेणी २: मराठी माध्यम इयत्ता ८ वी व ९ वी
श्रेणी ३: इंग्रजी माध्यम इयत्ता ६ वी व ७ वी
श्रेणी ४: इंग्रजी माध्यम इयत्ता ८ वी व ९ वी
विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांच्या पॅनलमार्फत केले जाईल.

आपल्याला विनंती करण्यात येत आहे की, आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभाग घ्यावा आणि आपल्या शाळेचे योग्य प्रतिनिधित्व करावे. कृपया आपल्या शाळेचा सहभाग १५ जुलै २०२५ पर्यंत खालीलपैकी कोणत्याही संपर्कावर फोन किंवा व्हाट्सअँपद्वारे नोंदवा

रोटे. महेश साळवे (९६८९८९१८१८)
रोटे. सौमित्री दास (९४२२७६३७७९)

हे ही वाचा: नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 2025-26 पासून टप्प्याटप्प्याने होणार

आपल्या सकारात्मक प्रतिसादाची आणि विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रतिभा वाढवण्यासाठी आपल्याकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार.

भरलेला फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीख : १५ जुलै २०२५
नोंदणी शुल्कः प्रत्येक गटासाठी ₹३००/- (प्रत्येक गटामध्ये २ विद्यार्थी असतील) प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास सहभाग प्रमाणपत्र व अल्पोपहार (नाश्ता व पाणी) दिले जाईल.

स्पर्धेच्या ४ श्रेण्या असतील

श्रेणी १: मराठी माध्यम इयत्ता ६ वी व ७ वी
श्रेणी २: मराठी माध्यम इयत्ता ८ वी व ९ वी
श्रेणी ३: इंग्रजी माध्यम इयत्ता ६ वी व ७ वी
श्रेणी ४: इंग्रजी माध्यम इयत्ता ८ वी व ९ वी

प्रत्येक श्रेणीत विजेत्यांना पुढीलप्रमाणे पारितोषिक

प्रथम क्रमांकः ₹५,०००/- रोख रक्कम विजेता ट्रॉफी
द्वितीय क्रमांकः उपविजेता ट्रॉफी
तृतीय क्रमांकः तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी

हे ही वाचा: शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील समित्यांचे एकत्रिकरण

विद्यार्थ्यांना प्रदर्शन स्थळी घेऊन येणे व सुरक्षितरीत्या परत नेण्याची जबाबदारी संबंधित शाळा व शिक्षकाची असेल.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शिक्षक प्रकल्पाच्या योग्य मांडणीस व सादरीकरणास मदत करू शकतात, परंतु शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या वतीने प्रकल्प सादर करणे अथवा प्रश्नांची उत्तरे देणे मान्य नाही.

प्रदर्शनादरम्यान कोणत्याही वैज्ञानिक प्रयोगामुळे निर्माण होणाऱ्या अपघात किंवा परिणामांबाबत रोटरी क्लब ऑफ नाशिक रोड जबाबदार राहणार नाही. सर्व हक्क रोटरी क्लब ऑफ नाशिक रोड यांच्याकडे राखीव आहेत.
अधिक माहितीसाठी किंवा शंका असल्यास कृपया प्रकल्प प्रमुखांशी संपर्क साधावाः
रोटे.

Leave a Comment