Army recruitment : सुवर्ण संधी NCC आर्मी भरती सुरु| अर्ज करा.

Army recruitment : सुवर्ण संधी NCC आर्मी भरती सुरु | अर्ज करा या विषयी सविस्तर माहिती.

जर तुमचे स्वप्न Army भरती होऊन या देशाची सेवा करायचे असेल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे आजच या संधीसाठी अर्ज करा. भारतीय Army अंतर्गत 56 एनसीसी विशेष प्रवेश योजना पदांच्या एकूण 55 जागा रिक्त असून ते भरण्यासाठी एक विशेष जाहिरात निघाली आहे.

या योजनेसाठी अर्ज भरायचे असेल तर ते आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत. या योजनेसाठी अर्ज भरण्यास 8 जानेवारी 2024 पासून सुरुवात झाली आहे व त्याची अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांना पुढील वेबसाईटला भेट देऊन अर्ज भरावे लागेल.

https.//joinindianarmy.nic.in/

हे ही वाचा: Nashik Police कडून वाहतूक मार्ग नियंत्रणाबाबत महत्वाचे बदल

सिलेक्शन प्रक्रिया

56 एनसीसी विशेष प्रवेश योजनेमध्ये सर्विस सिलेक्शन बोर्ड सर्वप्रथम उमेदवारांची मुलाखत घेते. ही मुलाखत पाच दिवसांची असते. या मुलाखतीत अनेक प्रकारची शारीरिक व मानसिक चाचणी घेतली जाते. या मुलाखती सर्विस सेलेक्शन बोर्डच्या प्रयागराज, भोपाळ, बंगलोर आणि जालंदर या केंद्रावर घेतल्या जातात. या मुलाखतीच्या सर्व फेऱ्या पार झाल्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जातो. या निकालात ज्यांची निवड झालेली असते, त्यांना पुढे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मध्ये 49 आठवड्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागते. यातून उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची सैन्यात भरती होते.

हे ही वाचा: 2 दिवशीय केंद्रस्तरीय नवभारत साक्षरता अभियान प्रशिक्षणाची सांगता

या सैन्य भरतीत पुरुषांबरोबरच महिला देखील अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवारांचे वय 19 ते 25 वर्षाच्या दरम्यान असायला पाहिजे. या भरतीत 50 जागा पुरुषांसाठी रिक्त आहेत, तर पाच जागा महिलांसाठी रिक्त असतात. या प्रकारे एकूण 55 उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

संस्था

भारतीय सैन्यअंतर्गत 56 एनसीसी विशेष प्रवेश योजना

भरले जाणारे पदे:-

56 एनसीसी प्रवेश योजना

पद संख्या :-

55 पदे

अर्ज करण्याची पद्धत:-

ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:-

6 फेब्रुवारी 2024

हे ही वाचा: शैक्षणिक सहली बाबत शासनाचे जोखमीचे परिपत्रक काय सांगते ?

शैक्षणिक पात्रता

Degree of a recognised University aur equivalent with aggregate of minimum 50% marks taking into account marks of all the years. Those studying in final year are also allowed to apply provided they have secured minimum 50% aggregate mark in the first two/three years of three/four years degree course respectively.

अर्ज कसे करावे

  1. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
  2. अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी पीडीएफ नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे.
  4. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. अर्ज करताना आवश्यक माहिती द्यावी अपूर्ण असलेले अर्ज हे नाकारले जातील.

हे ही वाचा: प्रजासत्ताक दिन परेड पाहण्यासाठी या पद्धतीने ऑनलाईन तिकीट बुक करा.

अधिकृत वेबसाईट:-

https://joinindianarmy.nic.in/

Leave a Comment