Nashik Police कडून वाहतूक मार्ग नियंत्रणाबाबत महत्वाचे बदल

Nashik Police कडून वाहतूक मार्ग नियंत्रणाबाबत महत्वाचे बदल व परिपत्रक जारी या विषयी सविस्तर माहिती.

वाहतुक नियंत्रण अधिसुचना :-

ज्या अर्थी, दिनांक १२/०१/२०२४ रोजी Nashik शहरात मा. श्री. नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत सरकार हे तपोवन, पंचवटी Nashik येथे २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव-२०२४ ला संबोधित करण्यासाठी येणार असल्याने सदर महोत्सवात राज्य व परराज्यातील विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात नागरीक हे आपले वाहनाने Nashik शहरात विशेषतः सभेच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

त्या अनुषंगाने कार्यक्रम स्थळावरील मार्गावर वाहतूकीची कोंडी होवू नये म्हणून खबरदारीची उपाययोजना म्हणून Nashik आयुक्तालय हद्दीत येणारी मुंबई आग्रा हायवेवरील मुंबई बाजुकडील – धुळे बाजुकडील, पुणे हायवे, औरंगाबाद रोड, दिडॉरीरोड, पेठरोड व त्रंबकरोड बाजुकडून Nashik शहरात येणारे ” अवजड वाहनांना” इतर पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक मार्गात बदल करणे आवश्यक होते त्याप्रमाणे करण्यात आला आहे .

हे ही वाचा: 2 दिवशीय केंद्रस्तरीय नवभारत साक्षरता अभियान प्रशिक्षणाची सांगता

Nashik

प्रवेश बंद मार्ग

१) संतोष टी पॉईंट ते स्वामी नारायण चौकी कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील.

२) तपोवन कॉसिग ते कार्यकम स्थळी जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील.

३) स्वामी नारायण चौक ते कार्यक्रम स्थळी जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील

४) काटया मारूती चौक ते सतोष टी पॉईंट कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील

५) अमृतधाम चौफुली ते मिर्ची सिग्नल कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील

६) जनार्दन स्वामी मठ टी पॉईंट ते तपोवन कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील

७) लक्ष्मी नारायण मंदिर ते तपोवन कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील

८) निलगीरी बाग पाट चौफुली ते तपोवन कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील

९) बिडीकामगार नगर पाट चौफुली ते निलगीरी बाग कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील

१०) नांदुर नाका ते तपोवन कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील

हे ही वाचा: शैक्षणिक सहली बाबत शासनाचे जोखमीचे परिपत्रक काय सांगते ?

११) रासबिहारी ते निलगीरी बाग कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील

१२ ) तारवाला चौक ते अमृतधाम कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील

१३) दिंडोरी नाक ते काटया मारूती चौक कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील

१४)टाकळी गांव अनुसयानगर व गोविंद काठे चौक कडुन सिध्दीविनायक चौक व अमृतधाम कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील

१५) सप्तश्रृंगी माता (सिता गुंफा मंदिर) ते काळराम मंदिर कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील.

१६) काळराम मंदिर ते नाग चौक, काटयामारूती चौकी कडे येणा-या व जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील.

१७) सरदार चौक ते काळाराम मंदिराकडे येणार व जाणारा रस्ता वाहतूकीस प्रवेश बंद राहील.

१८) मालेगांव स्टॅण्ड ते रामकुंड, ढिकले वाचलालय गाडेमहाराज पुलापर्यंत येणा-या व जाणा-या वाहतूकीस प्रवेश बंद राहील.

हे ही वाचा: प्रजासत्ताक दिन परेड पाहण्यासाठी या पद्धतीने ऑनलाईन तिकीट बुक करा.

पर्यायी मार्ग

१) व्दारका उड्डाणपुल मार्गे इतरत्र ये-जा करतील.

२) व्दारका उड्डाणपुल मार्गे इतरत्र ये-जा करतील.

३) अमृतधाम व रासबिहारी यामार्गे इतरत्र ये-जा करतील

४) पंचवटी कारंजा – मालेगांव स्टॅण्ड – रविवार कारंजा / बायजाबाई छावणी व रामवाडी ब्रिज मार्गे इतरत्र ये-जा करतील.

५) अमृतधाम चौफुली वरून डाव्या बाजुला वळून बळी मंदिर उड्डाण पुलावरून इतरत्र ये-जा करतील

६) जनार्दन स्वामी मठ टी पॉईंट ते तपोवन कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद असल्याने इतरत्र मार्गाने ये-जा करतील.

(७) मारूती वेफर्स कडुन डाव्याबाजुला वळुन ट्रॅक्टर हाउस, व्दारका मार्गे इतरत्र ये-जा करतील.

८) निलगीरी बाग पाट चौफुली ते तपोवन कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद वाहतूकीस प्रवेश बंद असल्याने इतरत्र मार्गाने ये-जा करतील.

९) बिडीकामगार नगर पाट चौफुली ते निलगीरी बाग कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद वाहतूकीस प्रवेश बंद असल्याने इतरत्र मार्गाने ये-जा करतील.

१०) नांदुर नाका ते तपोवन कडे जाणारी अवजड वाहतूक ही दि.१२/०१/२०२४ रोजी सकाळी ०६.०० ते कार्यक्रम

संपेपर्यंत बिटको, Nashik Road, जेलरोड जत्रा चौफुली मार्गे ये-जा करतील.

हे ही वाचा: सकाळ चित्रकला स्पर्धेत सहभागी व्हा. या तारखेला स्पर्धा

११) रासबिहारी वरून डाव्या व उजव्या रॅम्पवरून उड्डाण पुलावरून इतरत्र ये-जा करतील.

१२) तारवाला चौक ते अमृतधाम कडे येणारी वाहतूक वणी दिंडोरी रोड व पेठ रोड मार्गे इतरत्र ये-जा करतील

१३) दिंडोरी रोड पेठ रोड मार्गे येणारी वाहने पंचवटी कारंजा मालेगांव स्टॅण्ड – रविवार कारंजा / बायजाबाई छावणी व रामवाडी ब्रिज मार्गे इतरत्र ये-जा करतील

१४) टाकळी गांव अनुसयानगर व गोविंद काठे चौक कडुन येणारी वाहतूक टाकळी रोडने स्वारबाबा नगर मार्गे व्दारका कडे जाईल व इतरत्र मार्गे ये-जा करतील.

१५) पंचवटी कारंजा – मालेगांव स्टॅण्ड रविवार कारंजा / बायजाबाई छावणी व रामवाडी ब्रिज मार्गे इतरत्र ये-जा करतील.

१६) मालेगाव स्टॅण्ड-रविवार कारंजा-मखमलाबाद नाका-बायजाबाई छावणी-रामवाडी पुलामार्गे इतरत्र ये-जा करतील

१७) सरदार चौक ते काळाराम मंदिराकडे येणारी व जाणारी वाहतूक गणेशवाडी पुल (पंचवटी अमरधाम) अर्गि द्वारका व इतरत्र ये-जा करतील

हे ही वाचा: PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती सुरू|

१८) मालेगांव स्टॅण्ड ते रामकुंड, ढिकले वाचलालय गाडेमहाराज पुलापर्यंत येणारी व जाणारी वाहतूक मालेगाव स्टॅण्ड ते रविकार कारंजा किंवा मखमलाबाद नाका-बायजाबाई छावणी-रामवाडी पुलामार्गे इतरत्र ये-जा करतील.

१९) नाशिक रोड कडुन मुंबईकडे जाणारी अवजड वाहन वाहतूक फेम सिग्नल डीजीप नगर वडाळगांव कलानगर पाथर्डी रोडने पाथर्डी फाटया मार्गे मुंबई कडे जाईल.

दिनांक १२/०१/२०२४ रोजी मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे तपोवन नाशिक येथील कार्यक्रम निमीत्ताने खालील नमुद मार्गावरील अवजड वाहतुकीस सकाळी ०६.०० ते कार्यक्रम संपेपर्यंत नाशिक आयुक्तालय हद्दीत वाहतुकीसाठी इतर पर्यायी मार्ग वापरतील.

नमुद मार्गावरील जाणारी सर्व अवजड वाहनांनी इतर पर्यायी मार्गाचा सकाळी ०६.०० ते कार्यक्रम संपेपर्यंत इतर पर्यायी मार्गाचा वापर करतील.

हे ही वाचा: नाशिक जिल्हास्तरीय बालमहोत्सव : 2024 खुली रंग भरण स्पर्धा सहभागी व्हा

वरील सर्व प्रकारचे निर्बंध हे पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहीका, शववाहीका व अग्निशमन दलाची वाहने यांना लागु राहणार नाही.

वरील निर्बंध हे दिनांक १२/०१/२०२४ रोजी सकाळी ०६.०० ते कार्यक्रम संपेपर्यंत अंमलात राहतील. तसेच, वरील मार्गात व वेळे मध्ये परिस्थितीनुरुप बदल करण्याचे अधिकार राखुन ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment