2 दिवशीय केंद्रस्तरीय नवभारत साक्षरता अभियान प्रशिक्षणाची सांगता

2 दिवशीय केंद्रस्तरीय नवभारत साक्षरता अभियान प्रशिक्षणाची सांगता नाशिक मधील कार्बन नाका येथील मनपा शाळेत पार पडले या विषयी सविस्तर माहिती.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व 2021 च्या अर्थसंकल्पीय घोषणेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्वीच्या प्रौढ शिक्षण ऐवजी सर्वांसाठी शिक्षण या संकल्पनेवर नवभारत साक्षरता कार्यक्रम 2022-23 ते 2026-27 या कालावधीत राबविण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आलेला आहे. गाव व शहर पातळीवर स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात तालुकास्तर प्रशिक्षण झाल्यानंतर दोन दिवशीय केंद्रस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन कार्बन नाका येथील मनपा शाळेत पार पडले.

हे ही वाचा: शैक्षणिक सहली बाबत शासनाचे जोखमीचे परिपत्रक काय सांगते ?

या प्रशिक्षणास मुख्याध्यापक मनपा खाजगी प्राथमिक व माध्यमिक सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळा यांना आदेशित करण्यात आले होते. प्रशिक्षण मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 ते 10 जानेवारी 2024 सकाळी दहा ते पाच या वेळेत मनपा शाळा क्रमांक 35 कार्बन नाका शिवाजीनगर नवीन इमारतीच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते.

उपरोक्त शाळातून प्रत्येक शाळेतील एक शिक्षक नवभारत साक्षरता प्रशिक्षणासाठी उपस्थित ठेवावा असे आदेशित करण्यात आले होते. हे उपस्थित राहिलेले शिक्षक आपल्या शाळेत जाऊन आपल्या इतर शिक्षक सहकार्यांना देणार आहेत.

हे ही वाचा: प्रजासत्ताक दिन परेड पाहण्यासाठी या पद्धतीने ऑनलाईन तिकीट बुक करा.

या प्रशिक्षणासाठी सुलभक म्हणून उपशिक्षक संजय बच्छाव, उपशिक्षिका आरती मोरे,उपशिक्षिका श्रीमती चव्हाण,उपशिक्षक संतोष धनवटे यांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी सर्व सुलभकांना पेन आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा प्रशिक्षणार्थी कडून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक कमलेश खैरनार यांनी केले. प्रशिक्षणासाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्याध्यापक चांगदेव सोमासे यांचे यावेळी आभार मानण्यात आले.

वरिष्ठ पातळीवरून नाशिक मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बापूसाहेब पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment