शैक्षणिक सहली बाबत शासनाचे जोखमीचे परिपत्रक काय सांगते ?

शैक्षणिक सहली बाबत शासनाचे जोखमीचे परिपत्रक काय सांगते ? शिक्षण उपसंचालक पुणे परिपत्रक जाहीर केले आहे या विषयी सविस्तर माहिती.

शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या मार्फत परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्याचा अपघात होऊ शकतो अशा ठिकाणी, त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी सहल नेण्यासाठी प्रतिबंध केलेले आहेत.

अबेदा इनामदार, पुणे या महाविद्यालयाची 1 फेब्रुवारी 2016 रोजी मुरुड-जंजिरा या ठिकाणी सहल गेली होती. सहलीच्या दरम्यान १३ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर शासनाने असा निर्णय घेतला आहे की, प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक शाळेच्या सहली काढताना शासनाच्या परिपत्रकातील नियमावलीचे तंतोतंत पालन करावे.

हे ही वाचा: सकाळ चित्रकला स्पर्धेत सहभागी व्हा. या तारखेला स्पर्धा

ही माहिती प्राचार्य, मुख्याध्यापक पुणे विभागातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात यावे.

खालील प्रमाणे दक्षता घ्यावी असे शासनाने घोषित केले आहे.

 • विद्यालयाने शैक्षणिक सहलीचे आयोजन समुद्राचे बीज, अतिजोखमीचे ठिकाण, नदी,तलाव,विहीर तसेच उंच टेकड्या इत्यादी ठिकाणी करू नये.
 • विद्यालयाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नेण्यापूर्वी दोन प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहलीबाबत माहिती आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यास बचाव करण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे.
 • विद्यार्थ्यांना सहलीसाठी नेण्यात येणार असेल तर सोबतीला प्रथमोपचार पेटी ठेवावी आणि स्थानिक डॉक्टर व ज्या ठिकाणी सहल चालली आहे तेथे शासकीय रुग्णालयांचे नंबर हे सोबतीला ठेवावेत.
 • सहलीचे नियोजन करताना शाळेतील शिक्षकांनी सहलीचा आराखडा हा पालकांपर्यंत पोहोचवावा. पालकांनी दिलेल्या सूचनांचेही थोडा विचार करावा व गरज असल्यास पालक सभेचा एक प्रतिनिधी सोबतीला घ्यावा.

हे ही वाचा: PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती सुरू|

 • सहलीला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमती पत्र घेणे आवश्यक आहे.
 • सहलीचे नवीन अपडेट ठिकाण निश्चित झाल्यानंतर संबंधित ठिकाणाचा भौगोलिक वातावरणानुसार विद्यार्थ्यांना कोणती काळजी घ्यायला हवी त्याचबरोबर प्रथमोपचार इत्यादींबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करावे.
 • सहली नेहताना फक्त एसटी, बस तसेच अन्य शासकीय मान्यता असलेल्या आरटीओने मान्य केलेल्या वाहनांतूनच सहली घेवून जाव्यात.
 •  दहा विदयार्थ्यांच्या मागे एक शिक्षक असावा.
 •  सहलीला आलेल्या विदयार्थिनींना एकटे-दुकटे व नजरेआड फिरण्यास सोडू नये
 • शिक्षकांनी तंबाखू, गुटखा तसेच अन्य मादक पदार्थाचे सेवन करु नये.
 • सहलीला जाणा-या विदयार्थ्यांना मोबाईल फोनचा वापर करण्याची मुभा देण्यात यावी, तसेच सतत पालकांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
 • हायस्कूलच्या विदयार्थांना ट्रेकिंग, जलक्रीडा इत्यादी परवानगी देण्यात येवू नये.

हे ही वाचा: नाशिक जिल्हास्तरीय बालमहोत्सव : 2024 खुली रंग भरण स्पर्धा सहभागी व्हा

 • विदयार्थ्यांना सहलीस येण्याची सक्ती करण्यात येवू नये.
 • विदयार्थ्यांनकडून शैक्षणिक सहलीसाठी जादा वर्गणी/जादा शुल्क गोळा करण्यात येवू नये. माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयार्थ्यांच्या सहलीचा कालावधी एका मुक्कामापेक्षा जास्त असू नये.
 •  राज्याबाहेरील सहलीस परवानगी दिली जाणार नाही.
 • सहलीतील विदयार्थ्यांच्या सरंक्षणाची सर्व जबाबदारी संबंधित विदयालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक. सहलीतील सर्व शिक्षक यांची राहील.
 •  सहलीत विदयार्थिनीचा सहभाग असल्यास महिला शिक्षिका तसेच एक महिला पालक प्रतिनिधी बरोबर असणे आवश्यक राहील.
 •  विदयार्थी/विदयार्थिनीबरोबर कोणतेही गैरवर्तन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
 • सहलीत शाळेचे विदयार्थी, शिक्षक, शाळेने नॉमिनेटेड केलेला पालक प्रतिनिधी यांच्या व्यतिरिक्त बाहेरील कोणाचाही समावेश राहणार नाही.
 • प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक शाळांनी सहली काढताना संबंधित गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षण प्रमुख, शिक्षण उपसंचालक यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक राहील तसेच संबंधित अधिका-यांना सहलीच्या सर्व बाबी लेखी स्वरुपात अवगत कराव्यात.
 •  प्राथमिक शाळेच्या सहली हया परिसर भेट तसेच संध्या ५.०० पर्यंत परत घरी अशा स्वरुपाच्या असाव्यात.

हे ही वाचा: प्रजासत्ताक दिन परेड पाहण्यासाठी या पद्धतीने ऑनलाईन तिकीट बुक करा.

 • सहासी खेळ, यांटरपार्क, अडव्हेंचर पार्क असलेल्या ठिकाणी सहली काढण्यात येवू नयेत.
 • रेल्वे क्रॉसिंगवरुन बस नेताना शिक्षकांनी सावधगिरी बाळगावी, रेल्वेचे फाटक नसलेल्या ठिकाणी रेल्वे पुढे गेल्याची खात्री करुनच बस पुढे घेवून जावी.
 •  रात्रीच्यावेळी प्रवास टाळावा.
 • शाळेच्या शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्थेचे संबंधित जवाबदार पदाधिकारी या सर्वावर नियमानुसार गरज भासल्यास कायदेशीर कारवाई /कठोर कारवाई/शिस्तभंगाची कारवाई संबंधित शिक्षणाधिकारी यांचेमार्फत करण्यात यावी.
 • विदयार्थ्यांची हेळसांड, कुचंबना झाल्यास, मासिक / शारिरीक आस झाल्यास तशी पालकांकडून तक्रार आल्यास संबंधित जबाबदार शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांचेविरुध्द कडक कारवाई केली जाईल.
 • वरील सूचनांचे काटेकोरपणे पालक करुन व तसे हमीपत्र प्राचार्याकडून १००/-रुपयाचे बाँडवर घेवून मगच सहलीला परवानगी दिली जावी. हलगर्जीपण करणा-या अधिका-यांवरसुध्दा कठोर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.

Leave a Comment