मा.शिक्षणाधिकारी बी.टी.पाटील यांचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेबाबत बहुमोल मार्गदर्शन व कडक इशारा.

शिक्षणाधिकारी बी.टी.पाटील यांचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेबाबत बहुमोल मार्गदर्शन व कडक इशारा.

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाकडून नुकतीच 30 ऑगस्ट रोजी नाशिक महानगरपालिका मधील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस मनपा शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी महानगरपालिका शाळा मधील केंद्रसमन्वयक, मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेबाबत अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाबरोबरच केंद्रसमन्वयक, मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेबाबत कडक इशारा ही दिला.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत हलगर्जीपणा आढळल्यास तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही व काही अनुचित प्रकार घडल्यास त्या शाळेतील संपूर्ण कर्मचारी वर्गास जबाबदार धरून कडक कारवाई करण्याचा त्यांनी इशारा दिला.

हेही वाचा : शिक्षकांना इतकी कामे आहेत ! यादी पाहिली का ?

बी.टी.पाटील

विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत मार्गदर्शन करताना प्रत्येक शाळेत तक्रारपेटी असणे अतिशय आवश्यक आहे असे ते बोलत होते. आत्तापर्यंतच्या शाळा भेटीमध्ये बहुतेक शाळांमध्ये तक्रारपेटी आढळल्याबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केले.

ही तक्रारपेटी प्रत्येक शनिवारी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या समोर उघडली गेली पाहिजे, त्या  तक्रारी रजिस्टरमध्ये नोंद करून त्यावर काय कार्यवाही केली याबाबत ही खुलासा त्यात लिहिणे आवश्यक आहे असे ते बोलत होते. प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कार्यरत असणे आवश्यक आहे व प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेतील विद्यार्थी आपली स्वतःची मुले आहेत असे समजून वर्तन केले पाहिजे असे ते बोलत होते.

जवळजवळ चार तासाच्या मार्गदर्शनात त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विविध विषयावर सुद्धा प्रकाश टाकला.

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी आपल्या मार्गदर्शनात नामोल्ल्योख सुद्धा केला.

शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध असल्याचे ते बोलत होते.

98% लोक चांगले काम करत असतात व 2 टक्के लोकांमुळे बहुसंख्य लोकांना शरमेने मान खाली घालावी लागते असे ते बोलत होते.

मनपा शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षतेसाठी आणि समता मुलक वातावरण निर्मितीसाठी सखी सावित्री समितीचे गठन होणे आवश्यक आहे असे ते बोलत होते.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी विविध मुद्द्यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

मनपा शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी राबवलेल्या उपक्रमामुळे ते महाराष्ट्राला परिचित आहेत तसेच नाशिक शहरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्तेसाठी अतिशय चांगले काम करणारे अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. इतक्या वेळांच्या मार्गदर्शनामध्ये श्रोत्यांना त्यांनी अक्षरशः खेळवून ठेवलेले होते. कधी गंभीर विषय तर कधी हलकाफुलका विनोद. कधी गंभीर विषयाकडून विनोदाकडे तर कधी विनोदाकडून गंभीर विषयाकडे असे त्यांचे मार्गदर्शन बहुआयामी वाटत होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र समन्वयक कडलग यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका वैशाली क्षिरसागर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केंद्र समन्वयक महानुभव यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात मनपा शाळा शिवाजीनगर च्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या राज्य गीताने झाली व शेवट वंदे मातरम ने झाला.

केंद्र क्रमांक 21 विश्वासनगर चे केंद्र समन्वयक प्रकाश शेवाळे यांच्यासह विविध केंद्र समन्वयक उपस्थित होते. नाशिक महानगरातील सुरक्षारक्षक, अंशकालीन शिक्षक, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, शिक्षक इत्यादी या कार्यक्रमास उपस्थित होते.

Leave a Comment