अग्निवीरवायू भरती सुरु : याविषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
आपल्या भारतातील भारतीय वायुदल हे अग्निपथ योजनेद्वारे अग्निपथ वीरांची निवड करते. या योजनेअंतर्गत उमेदवाराला प्रशिक्षण कालावधीसह एकूण चार वर्षे सशस्त्र दलात काम करण्याची संधी मिळते.
या योजनेअंतर्गत उमेदवारांची भारतीय लष्करासह, भूदल आणि नौदलमध्ये भरती केली जाते. या योजनेअंतर्गत उमेदवार हवाई दलात कसे सामील होणार व त्यासाठी पात्रता निकष काय आहे? हे आपण जाणून घेऊया.
हे ही वाचा:- शिक्षकांना कोणतेही अशैक्षणिक कामे नकोत ; शासन नियुक्त समितीकडून अहवाल प्राप्त.
भारतीय वायुसेनेने अग्निवीर अंतर्गत अग्नी वीर वायू भरती 2024 साठी अर्ज मागविले आहेत. येत्या 17 जानेवारीपासून भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू होईल तर अर्जाची शेवटची तारीख ही 6 फेब्रुवारी 2024 असेल. सर्व इच्छुक उमेदवार हे IAF Agniveervayu, agnipathvayu.cdac.in या वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. 6 हजार 500 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
वय
या योजनेअंतर्गत वायुदलात सामील होण्यासाठी उमेदवारांची किमान वय साडे सतरा आणि कमाल वय 29 वर्ष असणे गरजेचे आहे. म्हणजेच इच्छुक उमेदवारांची जन्मतारीख 2 जानेवारी 2004 ते 2 जुलै 2007 दरम्यान असावी.
हे ही वाचा:- स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत नृत्य व पथनाट्य स्पर्धात सहभागी व्हा
शारीरिक तंदुरुस्ती चाचणी
- 6 मिनिट 30 सेकंदात 1.6 किलोमीटर धावावे लागते.
- एका मिनिटात उमेदवाराला 10 सिट-अप काढावे लागतील
- एका मिनिटात उमेदवाराला 10 पुश-अप काढावे लागतील.
- एका मिनिटात उमेदवाराला 20 स्कॅटस करावे लागते.
हे ही वाचा:- नमो चषक 2024 या स्पर्धेसाठी शाळा व महाविद्यालयांनी विविध स्पर्धेसाठी नोंदणी करा
शैक्षणिक पात्रता
अग्नीवीर वायूची शैक्षणिक पात्रता ही उमेदवाराने अर्ज केलेल्या स्ट्रीमवर अवलंबून असणार आहे. पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी वरील website वर क्लिक करावे. उमेदवार 50 टक्के गुणांसह गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीसह बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यानंतर 50% गुणांसह अभियांत्रिक (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/माहिती तंत्रज्ञान) मध्ये तीन वर्षांचा कोर्स पूर्ण केलेला असावा.
अग्निवीर परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू होईल. आयएफएस अग्निवीर वायुदलासाठी उमेदवारांची तीन टप्प्यात परीक्षा घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात संगणक आधारित चाचणी तर दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांची शारीरिक चाचणी आणि तिसऱ्या टप्प्यात उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाणार आहे.
हे ही वाचा:- शैक्षणिक सहली बाबत शासनाचे जोखमीचे परिपत्रक काय सांगते ?
भारतीय वायुदलात सामील होण्यासाठी उमेदवार शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
फिटनेस
- उमेदवारांची उंची किमान 152.5 सेमी असावी.
- उमेदवारांच्या छातीची किमान मर्यादा 5 सेमी असावी. उमेदवाराच्या वयाच्या प्रमाणात असावे.
- उमेदवाराला प्रत्येक कानाने सहा मीटर अंतरावरून ऐकता आले पाहिजे.
- उमेदवाराच्या दातांचा संघ आणि हिरड्या निरोगी असाव्यात.
हे ही वाचा:- प्रजासत्ताक दिन परेड पाहण्यासाठी या पद्धतीने ऑनलाईन तिकीट बुक करा
अर्ज कसा करावा
- सर्वप्रथम IAF agnipathvayu.cdac.in अधिकृत वेबसाईटवर जावे.
- त्यानंतर उमेदवाराने रिक्रुटमेंट लिंक वर क्लिक करा.
- त्यानंतर उमेदवाराने वैयक्तिक माहिती भरून सबमिट करावे.
- आता तुम्ही User ID ने लॉग इन करा.
- त्यानंतर फॉर्म भरा आणि अर्ज शुल्क भरून सबमिट बटणावर क्लिक करा.
- आता फॉर्मची एक प्रत डाऊनलोड करून भविष्यासाठी स्वतःजवळ ती ठेवा.