शिक्षकांना कोणतेही अशैक्षणिक कामे नकोत ; शासन नियुक्त समितीकडून अहवाल प्राप्त.

शिक्षकांना कोणतेही अशैक्षणिक कामे नकोत ; शासन नियुक्त समितीकडून अहवाल सदर या विषयी सविस्तर माहिती.

सरकारने नियुक्त केलेल्या समितीद्वारे अहवाल सादर करण्यात आलेला आहे. शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त कोणतेही काम नको.

शाळेतील शिक्षकांना अध्यपना व्यतिरिक्त दिला जाणारा कामांच्या संदर्भात शासनाने नियुक्त केलेल्या समितीने अहवाल जाहीर केला आहे. शिक्षकांना शिक्षणाच्या कामा व्यतिरिक्त कोणतेही अशैक्षणिक कामे द्यायला नकोत. अभिलेखनांसाठी देखील स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची शिफारस अहवालात केलेली आहे. यामुळे या अहवालावर शिक्षण विभाग कोणते धोरण ठरवणार ही बाब महत्त्वाची ठरणार आहे.

हे ही वाचा: स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत नृत्य व पथनाट्य स्पर्धात सहभागी व्हा

शिक्षण हक्क कायद्यातील कलम 27 नुसार सर्व शिक्षकांना अशैक्षणिक कामे करायला परवानगी ही नाही पण तरीही शिक्षकांना वर्गात शिकवणे शिवाय शाळेतील शैक्षणिक उपक्रमाव्यतिरिक्त अनेक अशी अशैक्षणिक कामे करायला दिली जातात. अशैक्षणिक कामांमध्ये विविध कामे उदा, अहवाल,सर्वेक्षणे इत्यादींचा समावेश हा असतो. सर्व शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त फक्त राष्ट्रीय कामे उदा. जनगणना,निवडणूक आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळेची कामे इतकेच अपेक्षित असते.

शिक्षकांनी शैक्षणिक कामाव्यतिरिक्त जर अशैक्षणिक कामे केली तर त्याचा परिणाम हा शैक्षणिक कामकाजावर होत असतो आणि म्हणूनच शिक्षक संघटनांनी अशैक्षणिक कामांना विरोध केलेला आहे. यामुळे शासनाने नियुक्त केलेल्या समितीचे विधिमंडळ अधिवेशनापूर्वीच याविषयी एक अहवाल सादर केला होता. या अहवालात शिक्षणाविषयी विविध शिफारसी या केल्या आहेत.

हे ही वाचा: नमो चषक 2024 या स्पर्धेसाठी शाळा व महाविद्यालयांनी विविध स्पर्धेसाठी नोंदणी करा

कोणत्याच शिक्षकाला शिक्षणाव्यतिरिक्त कोणत्याही विभागाचे काम देऊ नये. शैक्षणिक दृष्ट्या आवश्यक असलेली कामे हीच करावी अशी शिफारस आहे. त्यात शिक्षण विभागाच्या अखत्यारितीतल कामे, जसे यु-डायस नोंदणी, विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड अशी कामे करावी लागणार आहे. अशा प्रकारच्या अनेक शिफारसी या अहवालात केलेल्या आहेत.

शिक्षण विभागाच्या कामांपैकी अनेक कामे ही अशैक्षणिक असतात. शाळेत शिक्षण विभागाकडून अनेक प्रकारच्या माहिती पाठवलेला असतात या माहितीचा शिक्षणाशी, अध्यपनाशी काहीही संबंध नसतो,पण तरीही शिक्षक ती माहिती सादर करण्याचे काम करतात. या कामांमध्ये शिक्षकांची वेळ असेच वाया जातो. म्हणूनच शिक्षकांनी अशैक्षणिक कामे करायला नकोत म्हणून हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे.आता यावर शासन काय निर्णय घेते याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा: 2 दिवशीय केंद्रस्तरीय नवभारत साक्षरता अभियान प्रशिक्षणाची सांगता

Leave a Comment