स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत नृत्य व पथनाट्य स्पर्धात सहभागी व्हा

स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत नृत्य व पथनाट्य स्पर्धा या विषयी सविस्तार महिती.

मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडी मुळे हळूहळू पर्यावरण नष्ट होत चाललेले आहे. म्हणूनच आपल्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन व्हावे आणि नाशिक शहराच्या नागरिकांमध्ये आजूबाजूच्या परिसराच्या स्वच्छते प्रती जागृती निर्माण व्हावी म्हणून नाशिक शहर महानगरपालिका तर्फे स्वच्छ भारत अभियान ही नृत्य व पथनाट्य स्पर्धा नाशिक शहरात आयोजित केलेली आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून नाशिक शहरातल्या सर्व विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

हे ही वाचा: नमो चषक 2024 या स्पर्धेसाठी शाळा व महाविद्यालयांनी विविध स्पर्धेसाठी नोंदणी करा

सदर स्पर्धेचे निकष पुढीलप्रमाणे आहेत:-

  • सदर नृत्य व पथनाट्य स्पर्धा विनामूल्य आहे
  • या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावी दरम्यानचे शालेय विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

या नृत्य व पथनाट्य स्पर्धेकरिता पुढील विषयांच्या संदर्भात कलाकृती सादर कराव्यात.

  1. ओला व सुका कचरा वर्गीकरण व त्याचे फायदे.
  2. प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम
  3. स्वच्छते प्रति नागरिकांचे कर्तव्य
  4. नदीपात्राचे होणारे प्रदूषण व संवर्धनाचे उपाय

हे ही वाचा: Nashik Police कडून वाहतूक मार्ग नियंत्रणाबाबत महत्वाचे बदल

  • नृत्य स्पर्धेकरिता प्रत्येक सादरीकरणासाठी चार ते पाच मिनिटांचा वेळ देण्यात येईल.
  • पथनाट्य स्पर्धेकरिता प्रत्येक सादरीकरणासाठी सहा ते आठ मिनिटांचा वेळ दिलेला असेल.
  • सदर पथनाट्य स्पर्धा ही दिनांक 18 जानेवारी 2024 व 19 जानेवारी 2024 रोजी मनपाच्या कालिदास कला मंदिर येथे घेण्यात येणार आहे.
  • नृत्य स्पर्धेकरिता प्रत्येक सादरीकरणासाठी किमान आठ ते बारा स्पर्धकांचा समावेश असायला पाहिजे.

हे ही वाचा: 2 दिवशीय केंद्रस्तरीय नवभारत साक्षरता अभियान प्रशिक्षणाची सांगता

  • पथनाट्य स्पर्धेकरिता प्रत्येक सादरीकरणासाठी किमान आठ ते बारा स्पर्धकांचा समावेश असायला पाहिजे.
  • स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 10,000/- व 7500/- व 5000/- रोख पारितोषिके देऊन विजेत्यांना गौरवण्यात येईल त्याचबरोबर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल.
  •  पथनाट्य कलाकृतीची भाषा मराठी, हिंदी किंवा इंग्रजी असायला पाहिजे.
  • या नृत्य किंवा पथनाट्य स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशिका या दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी पावे तो घनकचरा व्यवस्थापन विभाग राजीव गांधी भवन येथे अथवा health.nashikcorporation@gmail.com पाठविण्यात याव्यात.

हे ही वाचा: शैक्षणिक सहली बाबत शासनाचे जोखमीचे परिपत्रक काय सांगते ?

प्रवेशिके बाबत अधिक माहिती करिता पुढील क्रमांकावर संपर्क करा

  1. श्री प्रशांत ठोके – 9970434259
  2. श्री मोहित जगताप – 7020043611

Leave a Comment