नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत असाक्षरांची 23 मार्च रोजी परीक्षा

नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत असाक्षरांची 23 मार्च रोजी परीक्षा या विषयी सविस्तर माहिती

उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम (NBSK) अंतर्गत रविवार दिनांक २३/०३/२०२५ रोजी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी FLNAT चे संपूर्ण राज्यात आयोजन करण्यात येणार आहे.

हे ही वाचा: पर्यटनाच्या क्षेत्रात नवा टर्निंग पॉइंट : नाशिकमध्ये ग्लैम्पिंग महोत्सवाचे आयोजन

असाक्षर नोंदणी उदिदष्ट संख्या, असाक्षर परीक्षा नोंदणी फॉर्म व परीक्षा आयोजनासाठीच्या मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे. शालेय प्रशासनाद्वारे उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम यांच्याशी समन्वय साधून मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षेचे नियोजन मार्गदर्शक सूचना पुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे मार्गदर्शक सूचनांनुसार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अचूक नियोजन करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल योजना कार्यालयास दिनांक १५/०३/२०२५ पर्यंत सादर करावा.

हे ही वाचा: वार्षिक परीक्षा : इयत्ता पहिली ते नववी एकाच वेळी वेळापत्रक पहा.

१. संदर्भीय पत्र

२. FLNAT चाचणीस प्रविष्ट होणारी असाक्षर संख्या

३. परीक्षा आयोजन मार्गदर्शक सूचना पुस्तिका व परीक्षा नोंदणी अर्ज / प्रपत्र (रजिस्ट्रेशन फॉर्म)

४. NBSK बाबनिहाय खर्चाबाबत मार्गदर्शक सूचना

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे प्रश्नपत्रिका भाषांतरित करण्याचे काम करीत आहे.

हे ही वाचा: नाशिक महानगरपालिका शाळा क्र.71 रायगड चौक सिडको या शाळेचे स्नेहसंमेलन प्रचंड उत्साहात संपन्न

1.सर्व भाषेतील सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणे.

2.FLNAT परीक्षा 2025 पार पडल्यानंतर निकाल संकलन करणे.

3.निकाल त्रुटी दुरुस्ती करणे.

समाज माध्यमांमध्ये आवश्यक त्यावेळी प्रसिद्धी व इतर अनुषंगिक कामे पार पाडण्याची जबाबदारी राज्य साक्षरता केंद्राची असेल.

1. मूल्यमापन चाचणी रविवार दि. 23 मार्च 2025 रोजी घेतली जाणार आहे.

2. परीक्षेची वेळ सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 वा. पर्यंत असेल.

3. प्रत्येक पेपरचा कालावधी हा 3 तासाचा असेल.

4. मूल्यमापन चाचणीपूर्वी असाक्षरांची नोंदणी सोबत दिलेल्या नोंदणी प्रपत्रामध्ये ऑफलाईन करुन घ्यावी.

5. असाक्षरांना परीक्षा बैठक क्रमांक ज्यामध्ये जिल्हावार्ड/ग्रामपंचायत/तालुका/ नुसार 3 अंकी दिला जाईल.

6. असाक्षरांच्या नोंदणी प्रपत्रानुसार सांख्यिकी माहिती Excel Sheet मध्ये भरावी.

7. मूल्यमापन चाचणीसाठी शाळांनी असाक्षर नोंदणी उद्दिष्ट संख्येनुसार प्रश्नपत्रिका छापून घ्याव्यात.

8. जिल्हाग्रामपंचायत/तालुका/ स्तरावर मूल्यमापन चाचणीसाठी नोडल ऑफीसरची नियुक्ती करावी.

9. युडायस कोड क्रमांक प्राप्त असलेल्या शाळेमध्येच परीक्षेचे आयोजन करावे.

10. शाळेचे मुख्याध्यापक हे परीक्षेचे केंद्र संचालक असतील आणि शिक्षक हे पर्यवेक्षक असतील. परीक्षा आयोजन, डाटा एन्ट्री, परीक्षा नोंदणी कामकाजात स्वयंसेवक मदत करतील.

11. प्रश्नपत्रिका ही मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित खालील तीन भागांमध्ये विभागलेली असून एकूण 150 गुणांची असेल.

भाग एक वाचन – 50 गुण

भाग दोन लेखन- 50 गुण

भाग तीन संख्याज्ञान – 50 गुण

12. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी 33 टक्के गुण अनिवार्य आहेत व एकूण गुण 33 टक्के असतील तर कोणत्याही एका भागासाठी कमाल 5 मार्काचा ग्रेस देऊन उत्तीर्ण केले जाईल.

हे ही वाचा: एस टी महामंडळातील एक आदर्श व्यक्ती : इम्रान मन्सुरी

Leave a Comment