कालिकामाता यात्रा उत्सव 2023 : नाशिक महानगरपालिकेची तयारी,महिला बचत गटांना संधी !

कालिकामाता यात्रा उत्सव 2023 निमित्त नाशिक महानगरपालिका प्रशासनाची कोणती तयारी सुरु याबाबत सविस्तर माहिती.

   

नाशिक महानगरकार्यक्षेत्रात विविध,समारंभ,यात्रा,उत्सव पार पडत असतात.हे समारंभ,यात्रा,उत्सव नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावे यासाठी नाशिक महानगरपालिका प्रशासन अगोदर पासूनच तयारी करत असते. लवकरच नाशिक मध्ये नवरात्रीचे आगमन होणार आहे.त्याबरोबर कालिकामाता यात्रा उत्सव 2023 येत आहे.याची तयारी महानगरपालिकेकडून सुरु आहे.त्यासाठी विविध नियोजन सुरु आहे.

सार्वजनिक नवरात्र उत्सव 2023 करीता, नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात, कालिका माता मंदिर, जुना आग्रारोड, नाशिक या ठिकाणी कालिकामाता पारंपारिक यात्रा उत्सव साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी दि.१५/१०/२०२३ ते २४/१०/२०२३ पर्यंत एकुण १० दिवस, कालिकामाता यात्रोत्सवात येण-या भाविकांच्या वाहनासाठी खालीलप्रमाणे

हेही वाचा : निपुण भारत उत्सव अंतर्गत शाळा भेटीमध्ये कोणत्या बाबी पाहिल्या जाणार !

नाशिक मनपा जागेत तात्पुरता स्वरुपाचे वाहनतळ जागा निश्चित करुन या वाहनतळाचे/पार्किंगचे वसुलीचे कामकाज फक्त दुचाकी वाहनासाठी वसुली हक्क फक्त महिला बचत गटांना (बी.पी.एल) धारकांना अटी-शर्तीने खालील नमुद जागा वापरणेस १० दिवसांकरीता परवानगी देणे बाबत सदर जागेची जाहिर लिलाव प्रक्रिया मंगळवार दि. १०/१०/२०२३ रोजी दु. ३.०० वाजता विभागीय अधिकारी (पश्चिम) यांचे नियंत्रणात, मनपाचे विभागीय कार्यालय, पश्चिम नविन पंडीत कॉलनी येथील पहिल्या मजल्यावरील सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे तरी इच्छुकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे जाहिरात व परवाने विभाग नाशिक महानगरपालिका, नाशिक यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

हेही वाचा : जागतिक टपाल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाशिक चे 5 हजार विद्यार्थी पत्र लिहून संवाद साधणार.

सविस्तर अटी व शर्थी काय आहेत त्या आपण पाहूया.

१. लिलाव प्रक्रियेमध्ये फक्त महिला बचत गट यांनाच सहभाग घेता येईल.
२. लिलावात भाग घेणाऱ्यास खालीलप्रमाणे छायांकित प्रती (साक्षांकीत करुन) २ प्रतीत सादर करावी लागेल. त्याशिवाय लिलावात भाग घेता येणार नाही.
अ) आधारकार्ड ब) पॅनकार्ड क) महिला बचत गट (बी.पी.एल) नोंदणी प्रमाणपत्र


३. सदर लिलावात भाग घेण्यासाठी अनामत रुपये २,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) लिलावाच्या दिवशी व लिलाव वेळेपूर्वी भरावी लागेल. त्याशिवाय लिलावात भाग घेता येणार नाही.
वाहनतळात पार्किंग केलेल्या वाहनाची देखभाल सक्षमपणे करण्याकरीता पुरेशा संख्येने सुरक्षारक्षक नेमण्याची व वाहनांची सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारी यशस्वी लिलाव धारकाची राहील.


५. वाहने ही एका रांगेत लावण्यात येवुन मुख्य रस्त्यावरील सर्व साधारण वाहतुकीस अडथळा होणार नाही आणि त्या परिसरातील शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापना तसेच स्थानिक नागरिकांना वाहतुकीस अडथळा होणार नाही याची खबरदारी घेणे यशस्वी लिलावधारकास अनिवार्य आहे.वाहन पार्किंग शिवाय इतर व्यवसायाकरीता जागा वापरता येणार नाही.
७. एक बी.पी.एल. महिला बचत गटास एकच वाहनतळाची जागा अधिकची बोली ने घेता येईल, एका पेक्षा जास्त जागा घेता येणार नाही.


८. लिलावप्रक्रीयेतील बोली बोलतांना किमान रु.१००/- च्या पटीत घोषीत करणे अनिवार्य आहे, तसेच तृतीय बोलीत लिलाव कायम करण्यात येतील.
९. यशस्वी लिलाव धारकांस प्राप्त जागेची अंतिम लिलाव बोलीप्रमाणे निश्चित केलेली जागा लायसेंस फी व त्यावरील शासनाचा वस्तु व सेवाकराची १८% व महाराष्ट्र शासनाकडील TCS २% इ. लिलाव प्रक्रीया संपुष्टात आल्यानंतर त्याच दिवशी अथवा लगतच्या दिवशी रोखीने अथवा डिमांड ड्राफने (नांवे नाशिक महानगरपालिका, नाशिक) भरना करणे बंधनकारक आहे. दिलेल्या मुदतीत पुर्तता न केल्यास जमा असलेली सुरक्षा अनामत रक्कम जप्त करुन सदर जागा इतर इच्छुकांना वाटप करण्यात येईल.


१०. जागा वापरणेची मुदत दिनांक १५/१०/२०२३ ते दिनांक २४/१०/२०२३ अखेर पावेतो राहिल.
११. वाहनतळाचे/पार्किंगचे वसुलीचे कामकाज फक्त दुचाकी वाहनासाठी प्रती तास प्रती वाहन १० रु/ फी आकारणे बंधनकारक आहे.
१२. यशस्वी लिलावधारकाने जागे बाबत भरणा केलेली सुरक्षा अनामत मुदत संपल्यानंतर, जागा पुर्ववत स्वच्छ व जैसे थे करुन देणे बंधनकारक आहे. तद्नंतर अनामत रक्कम प्राप्त करणेकरीता मागणी अर्ज व त्या सोबत अनामत रक्कमेची मुळ पावती तसेच मनपाचे इतर थकबाकी नसलेबाबतचा दाखला सादर केल्यानंतर, अनामत रक्कम अदायगी ‘करण्याची कार्यवाही अनुसरण्यात येईल.

१३. महानगरपालिकेचे इतर चार्जेस वेगळे भरावे लागेल.
१४. कोणत्याही प्रकारे नैसर्गिक, अनैसर्गिक कारणाने अगर इतर अन्य कोणत्याही कारणाने लिलावधारकाचे काही नुकसान झाल्यास त्यास नाशिक महानगरपालिका कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसं जबाबदार राहणार नाही.
१५. जागेची कोणत्याही त-हेने हस्तांतर, पोटभाडेकरु, बक्षिस, गहाण, असाईनमेंटवगैरे करता येणार नाही. अगर गुडविलने जागा परस्पर दुस-यास बहाल करता येणार नाही. तसेच जागा संपूर्णपणे अशंत: दुस-याच्या नावावर करून देता येणार नाही. तसेच जागेत भागिदार घेता येणार नाही.


१६. महाराष्ट्र शासन, मा. जिल्हाधिकारी, नाशिक तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नाशिक यांचे तसेच पोलिस आयुक्त, नाशिक शहर यांचेकडील वेळोवेळी पारित होणारे आदेशांचे सुचनेचे व अटीचे पालन करणे बंधनकारक राहिल.


१७. सदर ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपायोजना स्वतः करणे अनिवार्य आहे.
१८. जागेची कोणत्याही प्रकारे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई आपणास भरुन द्यावी लागेल. नुकसान भरपाई ठरविण्याचा अधिकार नाशिक महानगरपालिकेचा राहील व सदर जागेत कोणत्याही प्रकारचे पक्के स्वरुपाचे बांधकाम करता येणार नाही.


१९. सदर जागा वापरतांना तुमचे कडून काही गैरकृत्य झाल्यास अथवा कोणत्याही कारणास्तव महानगरपालिकेस आवश्यकता भासल्यास सदरची जागा २४ तासाच्या सुचनेने विनाहरकत रिकामी करुन महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावी लागेल.
२०. दिलेल्या जागेचा परिसर स्वच्छ ठेवावा लागेल. जो कचरा/निर्माल्य जमा होईल तो घंटागाडीत टाकणे बंधनकारक

२१. यशस्वी लिलावधारकाने, प्राप्त केलेल्या जागेत व्यवसाय न केल्यास, भरणा केलेली जागा लायसेंस फी व त्यावरील वस्तु व सेवा कर इ. लिलावधारकास परत अदा केली जाणार नाही.
२२. उक्त नमुद अटी व शर्तीचे भंग झाल्यास होणा-या पुढील कायदेशीर कारवाईस यशस्वी लिलावधारक अथवा त्याचे नियुक्त कर्मचारी हे जबाबदार राहतील.


सदर लिलाव मान्य करणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणे / जागेचा लिलाव तहकुब करणे, नविन अटी- शर्तींचा समावेश करणे इ.अधिकार नाशिक महानगरपालिकेने राखुन ठेवलेल आहेत. नाशिक मनपाने निश्चित केलेल्या उक्त नमुद अटी-शर्तीचे पालन करणे लिलावात भाग घेणारे यशस्वी लिलावधारकांवर बंधनकारक आहे.

नाशिक महानगरपालिका नागरिकांच्या सेवेत कायम हजर असते.नियम व शर्थी या नाशिक महानगरपालिका व लिलाव धारक यांचा विचार करूनच केलेल्या असतात.

Leave a Comment