कोचिंग क्लासेस साठी शिक्षण मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे या विषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
सध्या पालकांना त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाची काळजी जास्त असते, म्हणूनच पाल्याचे शिक्षणासाठी शालेय शिक्षणाबरोबरच पालकांनी त्यांच्या मुलांच्या जास्तीच्या शिक्षणासाठी त्यांना कोचिंग क्लासेस देखील लावलेले असतात. आता शासनाने 16 वर्षाखालील मुलांना कोचिंग क्लासेस लावण्यासाठी मनाई केली आहे. त्यावर काही मार्गदर्शक तत्वे देखील केली आहेत.
हा निर्णय घेण्यामागचे कारण
शासनाने सोळा वर्षाखालील मुलांचे कोचिंग क्लासेस लावण्यासाठी मनाई केली आहे. या मागचे कारण म्हणजे कोचिंग क्लासेस ची वाढती फी व फसवणूक या कारणांमुळे शासनाला हा निर्णय घ्यावा लागला.
हे ही वाचा: मराठा आरक्षण : राज्य मागासवर्ग आयोगाच्या प्रश्नावली नुसार महाराष्ट्रात सर्वेक्षण उद्यापासून
मार्गदर्शक तत्वे
- कोणत्याही कोचिंग क्लासला विद्यार्थ्याच्या रँकिंग किंवा चांगल्या स्कोर याबद्दल कोणतीही हमी देण्यात येणार नाही.
- कोणत्याही कोचिंग क्लासेस मध्ये सोळा वर्षाखालील विद्यार्थ्याला प्रवेश देता येणार नाही.
- विद्यार्थ्यांच्या निकाला किंवा गुणवत्तेबद्दल कोचिंग क्लासला दावा करणारी जाहिरात करता येणार नाही.
- प्रत्येक कोचिंग क्लासेस कडून विविध विषयांमध्ये पारदर्शकता असावी.
- कोणत्याही कोचिंग क्लासेस मध्ये नियुक्त केलेल्या शिक्षकाची पदवीहून कमी शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांची नियुक्ती केली जाऊ नये.
हे ही वाचा: Ram mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असणार |मुख्यमंत्र्यांचा निर्णय
- प्रत्येक कोचिंग क्लासेस मध्ये फायर सेफ्टी, बिल्डिंग सेफ्टी इत्यादी सुविधा उपलब्ध असायला हव्यात.
- 16 वर्षांवरील विद्यार्थ्यांनी मध्येच क्लास सोडल्यास विद्यार्थ्याला उर्वरित फी क्लासने परत करावी.
- प्रत्येक कोचिंग क्लासेस कडे त्यांच्या क्लासची शैक्षणिक संस्था, शिक्षकांची पात्रता, अभ्यासक्रम इत्यादी गोष्टी दर्शवण्यासाठी एखादी वेबसाईट असावी.
- कोचिंग सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, विद्युतीकरण, सुरक्षा व्यवस्था, इत्यादी सुविधा उपलब्ध असायला हव्यात.
- कोणत्याही कोचिंग क्लासेस ने मार्गदर्शक तत्त्वांचा उल्लंघन केल्यास त्या कोचिंग क्लासेस वर कारवाई केली जाणार आहे.
- मार्गदर्शन तत्त्वांचा उल्लंघन केल्यावर 1 लाखाहून अधिक रुपयांचा दंड देखील आकारला जाणार आहे.
हे ही वाचा: अग्निवीरवायू भरती सुरु : लगेच अर्ज करा.
शिक्षण मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे : download hindi PDF
कोचिंग क्लासेस ची वेळ
कोचिंग सेंटर मध्ये कोचिंग क्लास ची वेळ दुपारी पाच तासांपेक्षा जास्त असायला नको. त्याचबरोबर सकाळी लवकर व संध्याकाळी खूप वेळ अशी नसावी. कोचिंग क्लासेस मध्ये विद्यार्थ्याला त्याच्या भविष्यासाठी करिअर पर्याय बद्दलची माहिती सांगावी.
हे ही वाचा: FASTtag जाणार काळाच्या पडद्याआड | नवीन GPS प्रणाली कोणती ? कशी?
कोचिंग सेंटर फी
कोचिंग सेंटर मध्ये फी ही विद्यार्थ्याला परवडणारी असायला हवी. फी ची पावती ही विद्यार्थ्याला कोचिंग सेंटरने उपलब्ध करून द्यावी. एखाद्या विद्यार्थ्याने कोर्ससाठी पूर्ण पैसे दिले असतील आणि मधूनच क्लास सोडल्यास कोचिंग सेंटरने विद्यार्थ्याला उर्वरित फी ही परत करावी लागणार आहे.