MSRTC मध्ये आता होणार मोठी भरती; वेतन किती असणार?

MSRTC म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अंतर्गत सातारा येथे विविध पदे भरण्यात येणार आहे.

त्यासाठी MSRTC भरतीची जाहिरात देखील निघाली आहे.या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने करायचा असून या भरतीची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे.

हे ही वाचा: नर्सरी प्रवेशासाठी वयअटीसह ; नवीन शैक्षणिक वर्षापासून या नियमांची अंमलबजावणी

या भरतीसाठी एकूण 145 जागा रिक्त आहेत. यामध्ये विविध पदांचा समावेश होतो. या पदांची पदसंख्या आणि त्यांचे नाव पुढील प्रमाणे:-

  1. मोटार मेकॅनिक वाहन- 40 जागा
  2. मेकॅनिक डिझेल- 34 जागा
  3. मोटार वाहन बॉडी बिल्डर/शीट मेटल वर्कर- 30 जागा
  4. ऑटो इलेक्ट्रिशियन- 30 जागा
  5. वेल्डर- 2 जागा
  6. टर्नर- 3 जागा
  7. प्रशितन व वातानुकूलिकरण- 6 जागा

हे ही वाचा: डी.एड,बी.एड शिक्षकांची साडेचार हजारांहून अधिक पदे भरली जाणार.

उमेदवारांची शैक्षणिक पात्रता

उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्यासाठी किमान दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा आणि त्याने संबंधित ट्रेड मधील आयटीआय कोर्स पूर्ण केलेला असावा. या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केले आहे.

उमेदवाराला पदाच्या अनुसार इतका पगार मिळेल

  1. मोटार मेकॅनिक वाहन- 8 हजार 50 रुपये
  2. मेकॅनिक डिझेल- 7 हजार 700 रुपये
  3. मोटार वाहन बॉडी बिल्डर/शीट मेटल वर्कर- 7 हजार 700 रुपये
  4. ऑटो इलेक्ट्रिशियन- 8 हजार 50 रुपये
  5. वेल्डर- 7 हजार 700 रुपये
  6. टर्नर- 8 हजार 50 रुपये
  7. प्रशितन व वातानुकूलिकरण- 7 हजार 700 रुपये

या नोकरीचे ठिकाण सातारा येथे आहे.अर्जाची पद्धत ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2023 आहे.

हे ही वाचा: सायबर सुरक्षा ; तंत्रज्ञानाचा वापर करताना घ्यावयाची काळजी

अर्जाची प्रत ऑफलाइन पाठविण्यासाठी पत्ता:-विभाग नियंत्रक कार्यालय, ७ स्टार बिल्डिंगच्या मागे, एसटी स्टँड जवळ, रविवार पेठ, सातारा- 415001

अधिकृत संकेतस्थळ:- msrtc.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :- https://drive.google.com/file/d/11h8OBiBQjaI5A-FH8xxQRJnHhGPC6Clj/view
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :- https://www.apprenticeshipindia.gov.in/

Leave a Comment