आता असणार नर्सरी प्रवेशासाठी वयाची अट असणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षापासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. या विषयी सविस्तर माहिती.
पालकांसाठी आपल्या पाल्याकरिता नर्सरी प्रवेशासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून वयाची अट असणार आहे. आता पुढील शैक्षणिक वर्षापासून तीन वर्षे वयाच्या मुलांना नर्सरी मध्ये प्रवेश मिळणार आहे. मुलांच्या शाळा प्रवेशाचे नियम ‘एनईपी-2020’ च्या नियमानुसार असावेत यासाठी धोरण तयार केले जात आहे.
हे ही वाचा: डी.एड,बी.एड शिक्षकांची साडेचार हजारांहून अधिक पदे भरली जाणार.
इयत्ता पहिलीत प्रवेश करत असताना ‘एनईपी’ च्या नियमानुसार मुलाचे वय सहा वर्षे असावे.पूर्वी मुलांचा नर्सरीसाठी प्रवेश हा तीन वर्षाचा असताना करावा अशी अट होती. परंतु मुलांना दोन किंवा अडीच वर्षाचे असतानाच त्यांना प्रवेश दिला जात असे. आता मात्र तसे करता येणार नाही. मुले जेव्हा पहिलीला जातील, तेव्हा त्या मुलाचे वय सहा वर्षे पूर्ण असावे लागणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रवेश हा नव्या धोरणाप्रमाणे घेतला जाणार आहे.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हिवाळी अधिवेशनात जिथे बालवाडी ते दुसरी पर्यंतचे वर्ग सात-साडेसात वाजता भरतात त्यांच्या वेळेमध्ये बदल करणारे आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून त्यांची अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले आहेत.
तत्कालीन व विद्यमान राज्यपालांनीही या संदर्भात पत्र शिक्षण खात्याला दिले आहे. लहान मुले रात्री उशिरा म्हणजेच अकरा वाजेपर्यंत झोपत नाही व त्यांना सकाळी शाळेत जाण्यासाठी पुन्हा सात वाजेपर्यंत तयार होऊन शाळेत जावे लागत असते. त्यासाठी त्यांना सहा किंवा साडे सहा वाजता उठावे लागते.
हे ही वाचा: सायबर सुरक्षा ; तंत्रज्ञानाचा वापर करताना घ्यावयाची काळजी
महाराष्ट्र शासनाच्या बालविकास मंत्रालयाच्या मार्फत हे धोरण तयार करण्यात येणार आहे . मुलांची झोप होत नसल्याने त्यांना थकवा शाळेत जाणवतो. मुलांची झोप पूर्ण झाली नाही तर,त्यांच्यात चिडचिडेपणा जास्त आढळतो आणि याचा संपूर्ण परिणाम हा मुलाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो.
या सर्व बाबींवर आता सर्वच शाळांच्या वेळा सकाळी नऊ नंतर असणार आहेत. त्यात खाजगी व शासकीय दोन्ही शाळांमध्ये बदल होणार आहे.अशी माहिती राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलताना दिले.
‘एकराज्य एक गणवेश’ पुढच्या वर्षी
राज्यातील खासगी अनुदानित व शासकीय शाळांमधील सर्वचमुलांना एकच गणवेश असणार आहे. नवीन गणवेश स्काऊट व गाईड विषयास अनुरूप असणार आहे.
● मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट असणार आहे.
● मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा शाळांमध्ये सलवार कमीज असेलतर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची, अशा स्वरूपात गणवेशाची रचना असणार आहे.
या गणवेशाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यासंर्दभातील घोषणा यापूर्वीच केली आहे.