महाराष्ट्रात व नाशिक जिल्ह्यात ब-याच काळापासून नोकर भरती बंद होती.ती आता सुरु झाली आहे.या भरतीची जाहिरात नुकतीच निघाली आहे.तरी इच्छुकांनी जाहिरात पाहून अर्ज करावेत. अर्ज करण्याचा कालावधी व जाहीरात संपुर्ण माहिती खाली देत आहोत.आम्ही दिलेली ही संक्षिप्त माहिती आहे.सर्वात खाली जाहिरात दिली आहे ती Download करून संपुर्ण माहिती पहावी.Nashik Zilla Parishad Recruitment Process Started | Advertisement Released | Link | Online application submission schedule complete information.
हे ही वाचा
स्वतःच्या घरावर बसवा मोफत सोलर पॅनल|लाईफ टाईम वीज मोफत मिळवा.Govt solar rooftop Yojana.
सरळसेवेने भरावयाच्या पदाकरीता https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी https://zpnashik.maharashtra.gov.in या नाशिक जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. ऑनलाईन भरलेल्या अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.Nashik Zilla Parishad Recruitment Process Started | Advertisement Released | Link | Online application submission schedule complete information.
सरळसेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात https://zpnashik.maharashtra.gov.in या नाशिक जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी जाहिरातीत नमूद संपुर्ण माहिती काळजीपुर्वक वाचून ऑनलाईन (Online) पद्धतीनेच https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावेत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रिये संबंधित आवश्यक अद्ययावत माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
हे ही वाचा
+ अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) यामध्ये कोण अर्ज करू शकतात.
जे उमेदवार महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, असे उमेदवार आणि महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. मकसी१००७/प्र.क्र.३६/का.३६ दिनांक १० जुलै २००८ अन्वये महाराष्ट्र कर्नाटक सीमा ‘भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगीतलेल्या ८६५ गांवातील मराठी भाषिक उमेदवारांना अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) पदांसाठी अर्ज करू शकतात.
* अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) यामध्ये कोण अर्ज करू शकतात. १. शासन अधिसूचना दि. २९/०८/२०१९ नुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) पदे आवश्यक शैक्षणिक अर्हता
असलेल्या स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्यात येतील.
२. स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार याचा अर्थ, जे उमेदवार स्वत: किंवा त्यांचे वैवाहीक साथीदार किंवा ज्यांचे मातापिता किंवा आजी-आजोबा हे दिनांक २६ जानेवारी १९५० पासून आजपर्यंत संबंधित जिल्ह्यांच्या अनुसूचित क्षेत्रांत सलगपणे राहत आले आहेत, असे अनुसूचित जमातीचे उमदेवार, असा आहे.
हे ही वाचा
अभ्यास नेमका कसा केला पाहिजे ? अभ्यासाबाबत काही महत्वाच्या गोष्टी.
३. अनुसूचित क्षेत्रातील उमेदवारांकडे अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक (मूळ) रहिवासी असल्याबाबतचा महसूली पुरावा असणे आवश्यक आहे. तसेच सदर उमदेवारांनी अंतिम निवड झाल्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांनी अनुसूचित क्षेत्रामधील स्थानिक रहिवासी असल्याबाबत सादर केलेल्या महसूली पुराव्याबाबत पडताळणी केली जाईल. त्यानंतरच निवड झालेल्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रात (पेसा) नियुक्ती दिली जाईल.
४. अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य संवर्गाची पदे ही स्वतंत्रपणे दर्शविण्यात आलेली नसून परिशिष्ठ -१ मध्ये सामाजिक व समांतर आरक्षणात एकत्रित दर्शविण्यात अलेली आहेत. ५. महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभागाकडील शासन परिपत्रक क्रमांक आविवि- २०२३/प्र.क्र.१३२/का-१४, दि. १६/०६/२०२३ अन्वये प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांचा रहिवासी दाखला सादर करणे आवश्यक राहील.
६. ज्या उमेदवारांची पेसा क्षेत्रामध्ये निवड होईल त्या उमेदवारांची बिगर पेसा क्षेत्रामध्ये बदली करता येणार नाही.
७. जाहिरातीमध्ये अनुसूचित क्षेत्रातील भरावयाची पदे ही महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. बीसीसी २०१८ / प्र.क्र.४२७/१६-ब, दि. १० मे २०२३ नुसार दर्शविणेत आलेली आहेत.
हे ही वाचा
संपुर्ण जाहिरात करा इथे डाऊनलोड
Online अर्ज करण्याचे वेळापत्रक खाली दिले आहे.