शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ करीता महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळामध्ये कब/बुलबुल ,स्काऊट/गाईड विषय अनिवार्य करण्यात आला आहे.त्या अनुषंगाने या विषयी सविस्तर मार्गदर्शन ही नाशिक भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयामार्फत देण्यात आले आहे.कब/बुलबुल ,स्काऊट/गाईड विषयाचा अभ्यासक्रम काय आहे पाहणार आहोत.अभ्यासक्रमाचा काही भाग इथे देत आहोत.उर्वरित भाग पुढील भागात येईल Scout Guide subject is being made compulsory in all schools of Nashik Municipal Corporation. Syllabus Part : 1 | Useful for all schools.
हे ही वाचा
प्रथम वर्ष
जून :-
प्रवेश व प्रथम सोपान अभ्यासक्रम
१) स्काऊट गाईड चळवळीचा प्रारंभ व संक्षिप्त इतिहास याची माहिती २) स्काऊट गाईड प्रार्थना, झेंडा गीत व राष्ट्रगीत योग्य चालीवर म्हणता येणे.
जुलै :-
१) स्काऊट गाईडचे नियम, वचन, ध्येय, स्काऊट / गाईड चिन्ह, वंदन, डाव्या हाताने हस्तांदोलन यांचे ज्ञान असावे.
२) स्काऊट गाईडच्या गणवेशाचे वेगवेगळे भाग व ते कसे वापरावे याची माहिती असावी. ३) सत्कृत्य
ऑगस्ट :- १) दीक्षाविधी घेणे.
२) राष्ट्रध्वज, भारत स्काऊट गाईड ध्वज, जागतिक स्काऊट गाईड ध्वज याची रचना व वैशिष्ट याची माहिती असावी.
३) संघाची माहिती असणे, स्वतःचा संघ, त्याचा ध्वज, आरोळी किंवा गीत व संघकोपरा यांची माहिती असणे,
संघ सभा व सन्मान सभा याची माहिती असणे व आयोजन करता येणे.
४) गाठी व त्यांचा उपयोग सुकर गाठ (Reef Knot), शीड गाठ (Sheet Knot), दोरीचे टोक शेवटणे. ५) संघाबरोबर एक दिवसाच्या वर्षा सहलीस जाणे.
सप्टेंबर :- १) प्रथमोपचार पेटीतील वस्तूंची माहिती असणे व रोलर बँडेज व त्रिकोणी पट्ट्या, कॉलर व कफ झोळी आणि त्रिकोण सस्पेंशन झोळी ह्यांच्या उपयोगाची प्रात्याक्षिके करून दाखविणे, कापणे, खरचटणे यावर प्रथमोपचार करता येणे.
२) हाताच्या खुणा व शिटीच्या खुणा सराव करा.
३) स्काऊट गाईड यासाठी विस्तृत खेळात सहभाग घेणे. उदा. चोर शिपाई, लंगडी व पळण्याची शर्यत इ.
ऑक्टोबर :- दिवाळीची सुट्टी
हे ही वाचा
नोव्हेंबर :- १) आरोग्याचे सर्व साधारण नियम असावेत व बी.पी. प्रणीत सहा व्यायाम प्रकार किंवा सहा आसने किंवा सुर्य नमस्कार शिकून त्याचा सराव करावा.
२) वनविद्येतील मागाच्या खुणा शिकणे व त्यांच्या अनुरोधाने मार्ग शोधून काढणे.
३) चौर आढी (Clove hitch), साखळी गाढ बांधता येणे
४) ७ नोव्हेंबर स्काऊट गाईड दिन सर्व धर्मिय प्रार्थना सभा घेऊन साजरा करणे.
डिसेंबर :- १) पालकांच्या मदतीने एक आठवडाभर स्वयंपाक करणे, पाणी साठविणे, घरच्या कामाची जबाबदारी स्वीकारणे
(फक्त गाईडसाठी) २) दोरीचे टोक शेवटणे.
३) स्काऊटसाठी आडवडाभर एखादी बाग, पाणवठा, बस थांबा किंवा इमारत दत्तक घेऊन स्वच्छता राखण्याची योजना आखणे. ४) स्काऊट गाईड हस्तकला, गॅझेटस, हातपंखा, वर्तमानपत्र रॅक तयार करणे, पाकीटे व नववर्ष भेटकार्ड तयार
करणे.
जानेवारी :- १) स्काऊट गाईड नियमावर आधारीत एखाद्या सेवा प्रकल्पाबद्दल स्काऊट मास्तर / गाईड कॅप्टनकडे विचारविनिमय करून तो प्रकल्प पुर्ण करणे, त्याचा अहवाल स्काऊट मास्तर / गाईड कॅप्टनकडे एक आठवड्याच्या आत सादर करणे.
२) एका वळसा व दोन ओढ्या (One round & two half hitches), पक्का फास (Bow Line),
कोळी गाठ (Fisherman Knot)
फेब्रुवारी :- १) ग्रामपंचायत / पंचायत समिती / नगर परिषद कार्यालय यांपैकी एका कार्यालयात जनतेसाठी कोणकोणत्या सेवा सुविधा पुरवितात ह्याची माहिती करून घेणे व अहवाल सादर करणे.
मार्च :- १) झालेल्या अभ्यासक्रमाची चाचणी घेणे, मुल्यमापन तक्त्यात नोंद करणे.
हे ही वाचा
द्वितीय वर्ष
द्वितीय सोपान व द्वितीय वर्ष
जून :-
१) पायोनियरींग – मोळी गाठ (Timber hitch), सरकती आढी (Rolling hitch), शिबीर औजारे, त्याची माहिती व उपयोग तसेच घ्यावयाची काळजी
जुलै :-
१) प्रथमोपचार
अ) सेंट जॉर्जची झोळी तयार करता येणे आणि त्याचे प्रात्याक्षिक करून दाखविणे.
ब) कामचलावू स्ट्रेचर, उदा. स्कार्फपासून, शर्टपासून दोरीच्या साहाय्याने, गोणपाट किंवा सतरंजीच्या साहाय्याने इ.
क) १० मीटर अंतरापर्यंत प्राणरक्षक दोर फेकता येणे.
ङ) भाजणे, खरचटणे, मुरगळणे, दंश आणि नाकातून रक्तस्त्राव होणे यावर प्रथमोपचार करणे.
इ) त्रिकोण बंधन, गुंडाळी बंधन, चिटकविणारे बंधन आणि क्रेप बँण्डेज याची माहिती असणे व उपयोग करता येणे.
ऑगस्ट :-
१) मालन स्पाईक / लिव्हर हिच गाठ बांधता येणे.
२) अंदाज करणे स्काऊट गाईड दंडासारख्या साहित्याचा उडयोग करून १०० मीटर पर्यंत रुंदी असलेल्या
दोन अंतराचे अंदाज घेणे. ३) स्काऊट गाईडना सद्वर्तनाचे ज्ञान असणे आवश्यक
४) गाठी व त्यांचा उपयोग सुकर गाठ, शीड गाठ, दोरीचे टोक शेवटणे. ५) संघाबरोबर एक दिवसाच्या वर्षा सहलीस जाणे.
सप्टेंबर :-
१) होकायंत्र-
अ) होकायंत्राच्या साहाय्याने १६ उपदिशा ओळखणे व होकायंत्राचा उपयोग करता येणे. ब) रात्रीच्या वेळी आकाशातील किमान एका नक्षत्राच्या साहाय्याने उत्तर दिशा ओळखता येणे. क) नकाशातील अंतर, दिशा, अंश आणि प्रमाण यांचे ज्ञान असणे.
ऑक्टोबर :-
दिवाळीची सुट्टी
हे ही वाचा
नोव्हेंबर :-
नसेल तर
१) विस्तव उघड्यावर काटक्या रचून जास्तीत जास्त दोन आगकाड्यात ते पेटविता येणे, ते शक्य
केरोसिनचा किंवा गॅसचा स्टोव्ह करून पेटविणे.
प्रात्याक्षिक
अ) आग विझविणे व आगीपासून बचाव करणे याची माहिती असणे. ब) आग विझवायच्या बकेट चेन (साखळी) पद्धतीची माहिती असणे.
क) जंगलातील वाळलेल्या गवताला लागलेली आग कशी आटोक्यात आणाल ? याची माहिती मिळविणे.
२) ७ नोव्हेंबर स्काऊट गाईड दिन सर्व धर्मिय प्रार्थना सभा घेऊन साजरा करणे.
डिसेंबर :-
१) ळ आकाराची बांधणी
२) समांतर, चौरस व तिरकस बांधणी करता येणे.
३) स्वयंपाक उघड्यावर लाकडाची चुल पेटवून तिच्यावर किंवा स्टोव्ह वर दोन माणसाला पुरेसा खाद्यपदार तयार करणे. एका संघाला पुरेल इतका चहा तयार करणे.
हे ही वाचा
Pan Card ला Aadhar Card शी लिंक कसे कराल ? जर करणे बाकी असेल तर आत्ताच करा.
जानेवारी :
१) संदेशन-
अ) अग्निच्या साहाय्याने
ब) धुराच्या साहायाने
क) ध्वनीच्या साहाय्याने संदेशन करता येणे व माहिती असणे.
२) खालीलपैकी कोणत्याही दोन्हीची पुर्तता करणे.
अ) आपली संस्कृती व आपली परंपरा याबद्दल माहिती मिळविणे व त्याची नोंदवही तयार करणे. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या संमतीने व संघाच्या मदतीने शाळेचा एखाद
हाती घेणे.
सामाजिक सेवा शिबीरात सहभाग घेणे.
परिसरातील प्रदूषण प्रश्नावर पालक आणि शेजाऱ्यांशी चर्चा करूण त्यावर अहवाल तयार करणे.
आणि गाईडसाठी खालीलपैकी कोणत्याही एका प्राविण्य पदकाची पात्रता प्राप्त करावी.
हे ही वाचा
फेब्रुवारी :
मेळाव्यात वा सार्वजनिक उत्सवात किंवा यात्रेत सेवा कार्य करणे.
ऑगस्ट :-
१) मालन स्पाईक / लिव्हर हिच गाठ बांधता येणे.
२) अंदाज करणे :- • स्काऊट गाईड दंडासारख्या साहित्याचा उडयोग करून १०० मीटर पर्यंत रुंदी असलेल्या
दोन अंतराचे अंदाज घेणे. ३) स्काऊट गाईडना सद्वर्तनाचे ज्ञान असणे आवश्यक
४) गाठी व त्यांचा उपयोग सुकर गाठ, शीड गाठ, दोरीचे टोक शेवटणे, ५) संघाबरोबर एक दिवसाच्या वर्षा सहलीस जाणे.
सप्टेंबर :-
१) होकायंत्र:-
अ) होकायंत्राच्या साहाय्याने १६ उपदिशा ओळखणे व होकायंत्राचा उपयोग करता येणे.
ब) रात्रीच्या वेळी आकाशातील किमान एका नक्षत्राच्या साहाय्याने उत्तर दिशा ओळखता येणे.
क) नकाशातील अंतर, दिशा, अंश आणि प्रमाण यांचे ज्ञान असणे.
ऑक्टोबर :-
हे ही वाचा
Juice Jacking Scam कसा होतो ? या विषयी माहिती आपण घेऊ या !
दिवाळीची सुट्टी
नोव्हेंबर :-
१) विस्तव :- उघड्यावर काटक्या रचून जास्तीत जास्त दोन आगकाड्यात ते पेटविता येणे, ते शक्य नसेल तर केरोसिनचा किंवा गॅसचा स्टोव्ह करून पेटविणे.
प्रात्याक्षिक
अ) आग विझविणे व आगीपासून बचाव करणे याची माहिती असणे. ब) आग विझवायच्या बकेट चेन (साखळी) पद्धतीची माहिती असणे.
क) जंगलातील वाळलेल्या गवताला लागलेली आग कशी आटोक्यात आणाल ? याची माहिती मिळविणे.
२) ७ नोव्हेंबर स्काऊट गाईड दिन सर्व धर्मिय प्रार्थना सभा घेऊन साजरा करणे. –
डिसेंबर :-
१) ळ आकाराची बांधणी
२) समांतर, चौरस व तिरकस बांधणी करता येणे.
३) स्वयंपाक उघड्यावर लाकडाची चुल पेटवून तिच्यावर किंवा स्टोव्ह वर दोन माणसाला पुरेसा खाद्यपदार – तयार करणे. एका संघाला पुरेल इतका चहा तयार करणे.
हे ही वाचा
माझी कन्या भाग्यश्री योजने बद्दल संपुर्ण माहिती जाणून घ्या…| Majhi Kanya Bhagyashri Yojana
जानेवारी :-
१) संदेशन-
अ) अग्निच्या साहाय्याने
ब) धुराच्या साहायाने
क) ध्वनीच्या साहाय्याने संदेशन करता येणे व माहिती असणे.
२) खालीलपैकी कोणत्याही दोन्हीची पुर्तता करणे.
अ) आपली संस्कृती व आपली परंपरा याबद्दल माहिती मिळविणे व त्याची नोंदवही तयार करणे.
ब) आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या संमतीने व संघाच्या मदतीने शाळेचा एखादा विकास कार्यक्रम हाती घेणे.
क) सामाजिक सेवा शिबीरात सहभाग घेणे.
ड) मेळाव्यात वा सार्वजनिक उत्सवात किंवा यात्रेत सेवा कार्य करणे.
इ) परिसरातील प्रदुषण प्रश्नावर पालक आणि शेजाऱ्यांशी चर्चा करूण त्यावर अहवाल तयार करणे.
स्काऊट आणि गाईडसाठी खालीलपैकी कोणत्याही एका प्राविण्य पदकाची पात्रता प्राप्त करावी.
हे ही वाचा
फेब्रुवारी :-
अ) स्वंयपाकी / स्वंयपाकीन (Cook)
ब) वक्ता (Debator)
क) माळी / माळीन (Gerdener)
ड) धोबी / धोबीण (Loundrer/Laundress)
इ) प्राणी मित्र (Friend to Animals)
ई) हरकाम्या / हरकामीन (Handyman /Handiwoman)
प) सायकलस्वार (Cyclist)
मार्च :-
१) झालेल्या अभ्यास क्रमाची चाचणी घेणे, मुल्यमापन तक्त्यात नोंद करणे.
9:39 PM’ले आक्रमण, द्वावणी घेणे, मुल्यमापन तक्त्यात नोंद करणे.
हे ही वाचा
तृतीय वर्ष
तृतीय सोपान व तृतीय वर्ष
जून:
१) भारतीय स्काऊट गाईड चळवळीचे ज्ञान असणे.
२) प्रथम सोपान चाचणीमध्ये दर्शविलेली त्यापेक्षा दुसऱ्या पद्धतीने दोरीची टोके शेवट
जुलै :-
१) ओड गाठ (Draw hitch), खुर्ची गाठ (Fireman’s chair knot) बांधता येणे.
(Man hamess knot and splicing-eye, back, short)
२) पोहणे
अ) ५० मीटर पोहणे. ब) सुरक्षित पोहण्याच्या पद्धतीचे ज्ञान असावे.
क) पोहताना स्वायुची कोणती काळजी घ्यावी याची माहिती असावी.
किंवा
स्काऊट /
गाईडसाठी खालीलपैकी एक प्राविण्य पदक मिळविणे.
अ) खेळाडू (Athlete)
ब) गिर्यारोहक (Climber)
अ) जिमनॉस्ट (Gymnast)
ब) हाईकर (Hiker)
अ) योगा (Yoga)
ब) खेळ मार्गदर्शक (Games Leader)
अ) ऊंट पालक (Camel man)
हे ही वाचा
ऑगस्ट :-
५) प्रथमोपचार
अ) विजेचा धक्का बसणे, मुर्च्छा येणे, घशात अडकणे यावर उपचार करता येणे. ब) बाहू, गळा, हनुवटीचे हाड मोडल्यास प्रथमोपचार करता येणे.
क) पाण्यात बुडालेल्या व विजेचा धक्का बसलेल्या व्यक्तीवर प्रथमोपचार करता येणे.
ड) तोंडाने बासोच्छवास करण्याच्या पद्धतीने प्रात्याक्षिक करून दाखविता येणे.
सप्टेंबर :-
१) अंदाज
अ) ३० मीटर पेक्षा जास्त नाही इतकी उंच अगर खोली असलेल्या दोन ठिकाणांचा अंदाज करता येणे.
ब) २ किलोपेक्षा जास्त वजन नाही अशा दोन वस्तूंचा अंदाज करता येणे.
क) दोन प्रकारच्या वस्तूंची संख्या मोजता येणे. उदा. नाणे, मार्बल, बिस्किट इत्यादी.
आक्टोबर :-
दिवाळीची सुट्टी
नोव्हेंबर :-
नकाशा –
अ) वेगवेगळ्या खूणा काढून व ग्रीड रेफरन्स यांचे ज्ञान असावे. प्रवाशांच्या उपयोगाच्या टूरिस्ट नकाशा व
सर्वे ऑफ इंडिया यांनी तयार केलेल्या नकाशाचे वाचन करता येणे. एखाद्या व्यक्तीला नकाशात दाखविलेल्या रस्त्याने प्रवासास नेता येणे याचे ज्ञान असावे.
ब) त्रिकोण पद्धतीने, प्लेन टेबल, रोड ट्रॅव्हल्सच्या पद्धतीने नकाशा काढता येणे..
२) उघडयावर चार व्यक्तींना पुरेल इतका स्वयंपाक तयार करणे. ३) ७ नोव्हेंबर स्काऊट गाईड स्थापना दिन सर्वधर्मिय प्रार्थना सभा घेऊन साजरा करणे.
डिसेंबर :-
१) तंबू उभारणे व गुंडाळणे किंवा दोन व्यक्तींना आत झोपता येईल असा तात्पूरता निवारा तयार करणे. २) स्काऊट संघ किंवा गाईड कंपनीने आयोजित केलेल्या रात्रीच्या शिबीरात सहभागी होणे,
३) चाकू व हात कुन्हाडीचा उपयोग कसा करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवावे. सुरक्षिततेच्या नियमांचे
असावे,
जानेवारी:-
१) खालीलपैकी एका कार्यक्रमात भाग घेऊन त्यांची दैनंदिनी तयार करा. अ) तुमच्या युनिटमध्ये राष्ट्रीय एकात्मतेवर भाषण तयार करा.
ब) युनिटच्या शेकोटीच्या कार्यक्रमात भाषण द्या, किंवा एखादी गोष्ट सांगा..
२) संदेशन म्हणजे काय व त्याची सुरुवात कशी झाली व त्याचा उपयोग काय याची माहिती असावी, ३) मार्स संदेशन पद्धतीने कमीत कमी ३० शब्दांचा संदेश पाठविणे व घेता येणे.
४) दुसऱ्या स्काऊट गाईड सोबत अनुक्रम २५ किलो मीटर अंतराची सायकल सहल किंवा १०/१५
किलोमीटर अंतराची पायी सहल आयोजित करून त्याचा अहवाल स्काऊट मास्तर गाईड कॅप्टनकडे सादर
करावा.
फेब्रुवारी :-
स्काऊट गाईडने खालीलपैकी कोणतेही दोन प्रत्येक विभागातील एक प्राविण्य पदकांची पात्रता मिळविणे.
विभाग अ)
१) नागरी सुरक्षा (Civil Defence)
२) आघाडीचा हरकाम्या / हरकामी (Pioneer)
३) सामाजिक कार्यकर्ता/कार्यकर्ती (Community Worker)
४) विश्वसंधारक (World Conservation)
५) सेप्टी नॉलेज
६) सेल्फ डिफेन्स (Self Defence)
विभाग ब)
१) बुक बाईंडर (Book Binder)
३) निसर्ग तज्ञ (Naturalist)
२) नागरीक (Citizen)
४) वाटाड्या (Path Finder)
मार्च :-
१) झालेल्या अभ्यासक्रमाची चाचणी घेणे व मुल्यमापन तक्त्यात नोंद करणे.
राज्य पुरस्कार
( वयाची १३ वर्षे पुर्ण झालेली असावीत.)
१) तृतिय सोपान पदक व प्राविण्य पदके यांचे अद्यावत ज्ञान अवगत असावे.
२) तृतीय सोपान पदक
3) स्काऊट गाईडने खालीलपैकी कोणतेही दोन प्राविण्य पदके मिळविणे. (यापुर्वी न मिळालेली)
अ) बालसंगोपन (Child Nurse) (फक्त गाईडसाठी)
ब) सामाजिक कार्यकर्ता / कार्यकर्ती (Community Worker)
क) पर्यावरण तज्ज्ञ (Ecologist)
ड) कुष्टरोग निवारक (Leprosy Control)
इ) साक्षरता (Literacy)
फ) आरोग्य विषयक संरक्षक (Sanitation Promoter)
भ) ग्रामीण कार्यकर्ता/कार्यकर्ती (Rural Worker)
खालीलपैकी कोणतेही एक प्राविण्य पदक प्रत्येक गटातील मिळविणे.
म) भू-संरक्षक (Soil Conservator)
अ गट
१) निसर्ग निवास (Camper)
२) संदेशक (Signaller)
४) निसर्गतज्ज्ञ (Naturalist)
३) विद्युत (Electrician)
५) डेअरी मॅन (Dairy man)
६) नक्षत्र तज्ज्ञ (Starman)
७) टेलर फक्त गाईडसाठी (Tailar)
४)
८) विद्युत उपकरण तज्ज्ञ फक्त गाईडसाठी (Electronics)
ब गट
१) सामाजिक आरोग्य रक्षक
२) रुग्णालय
३) सुदृढ कार्यकर्ता
४) जीवरस सत्वतज्ज्ञ
टीप :-
५) शेतकरी फक्त स्काऊटसाठी
१) राज्य संस्थेचे आश्रयदाते मा. राज्यपाल हे राज्य पुरस्कार पदक प्रदान करतात.
२) जिल्हा किंवा स्थानिक पदक कमेटीने नियुक्त केलेल्या परिक्षकाकडून प्राविण्य पदकाच्या परिक्षा घेण्यात येतात. व त्यांच्या शिफारशीनुसार प्राविण्य पदके प्रदान करण्यात येतात.
३) राज्य कार्यालय मुंबईच्या वतीने आयोजित केलेल्या राज्य पुरस्कार फेर चाचणी शिबीरात तृतीय सोपान पर्यंतच्या सर्व अभ्यासक्रमाच्या चाचण्या पुन्हा द्याव्या लागतील. राज्य पुरस्कार पदक तृतीय सोपान पदकाच्या जागेवर लावण्यात यावे.
राष्ट्रपती पुरस्कार
( वयाची १४ वर्षे पुर्ण व १८ वर्षाच्या आत)
१) राज्य पुरस्कार पदक धारक असावा.
२) शिबीर निवास
अ) किमान सलग तीन रात्रीच्या शिबीर निवास केलेला असावा (जिल्हा मेळावे, जांबोरी यांचा अंतर्भाव नसावा.)
ब) चाकू, हात, कुन्हाड, हात करवत, कटर, हातोडा, खुंटया यांचा योग्य प्रकारे उपयोग करता यावा. करून दोन व्यक्तींना आत अजोपता येईल असा तात्पुरता
क) उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साहित्याचा उपयोग निवार मचाण अगर झोपडी बनविता यावी.
३) अम्ब्युलन्स मॅन हे प्राविण्य पदक मिळालेले असावे. ४) खालीलपैकी पुर्वी न मिळालेली अशी दोन प्राविण्य पदके मिळवावी.
स्काऊटसाठी :-
१) निसर्ग निवासी (Camper)
३) ग्रामीण कार्यकर्ता/कार्यकर्ती (Rural Worker)
५) अग्री संरक्षक (Fireman)
७) वार्ताहर (Journalist)
गाईडसाठी –
अ गट
१) टोपल्या बनविणारी (Basket Worker)
३) मनोरंजन करणारी (Entertainer)
५) शिंपी (Tailor)
ब गट
१) होम मेकर (गृहव्यवस्थापिका) (Home maker)
३) वाटाड्या (Path Finder)
२) चिटणीस (Secretary)
४) विद्युत उपकरणे (Electronics)
६) वनतज्ज्ञ (Forester)
८) कुष्ठरोग नियंत्रक (Leprosy Controler)
२) विद्युत उपकरण तज्ज्ञ (Electronics)
४) संगीतकार (Musician)
२) वार्ताहर (Journalist)
४) ग्रामीण कार्यकर्ता (Rural Worker)
५) किमान दोन महिने मुदतीपर्यंत चालणाऱ्या समाजसेवा प्रकल्पात दर आठवड्यास १ दिवस या प्रमाणे ३६ तास कार्य करावे. केलेल्या कार्याची दैनंदिनी तयार करावी व ती सन्मान समेत दर आठवड्यास सादर करावी.
६) दुसऱ्या स्काऊट गाईड समवेत १० किलोमीटर अंतराची रात्रीची सहल आयोजित करा. किंवा ५० किलोमीटर अंतराची सायकल सहल (गाईडसाठी ३५ किलोमीटर) आयोजित करा आणि सहलीचा अहवाल १० दिवसाच्या आत स्काऊट मास्तर / गाईड कॅप्टन यांना सादर करा. बचत योजना, साक्षरता प्रसार, सामुदायिक आरोग्य किंवा सामाजिक वनीकरण याविषयी भरीव समाज विकास प्रकल्पांची
७)
आखणी करावी व त्यात सहभागी व्हावे.sthanik paripatrake Scout Guide subject is being made compulsory in all schools of Nashik Municipal Corporation. Syllabus Part : 1
८) ९) परिसरात सुरू असलेल्या कब पॅक / बुलबुल फ्लॉक किंवा स्काऊट / गाईड युनिटना वेगवेगळी पदके कोणती व ती कशी मिळवावीत यांचे शिक्षण द्या किंवा परिसरातील लहान मुलांना पंधरा दिवसांपर्यंत निरनिराळे खेळ खेळायला शिकवा.. राज्य पुरस्कारांनंतर किमान १ वर्षे कार्य केलेले असावे.
टीप :- १) राष्ट्रीय संस्थेचे आश्रयदाते मा. राष्ट्रपती, राष्ट्रपती पुरस्कार पदक प्रदान करतात. २) राष्ट्रीय कार्यालय नवी दिल्लीच्या वतीने आयेजित केलेल्या राष्ट्रपती पुरस्कार चाचणी शिबीरात राज्य
पुरस्कार पर्यंतच्या सर्व अभ्यासक्रमाच्या कौशल्याच्या चाचण्या द्याव्या लागतील. राष्ट्रपती पुरस्कार जागेवर लावण्यात यावे.
यापुढील भाग पुढील भागात.
अभ्यासक्रम Download करण्यासाठी येथे क्लिक करा.