नाशिक मनपा प्रशासनाधिकारी बापुसाहेब पाटील यांनी स्वीकारला गोवा येथे राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार.

कालच शनिवार दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचे मा. प्रशासनाधिकारी बापुसाहेब पाटील यांनी गोवा येथे नाशिक महानगरपालिका शाळांमधील डिजिटल क्रांतीसंदर्भात केलेल्या कामाबद्दल संपूर्ण देशातून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारला. Nashik Municipal Administrative Officer Bapusaheb Patil accepted the second national level award in Goa

हे ही वाचा

अभ्यास नेमका कसा केला पाहिजे ? अभ्यासाबाबत काही महत्वाच्या गोष्टी.

गेल्या महिन्यात गव्हर्मेंट डिजिटेक ने आयोजित केलेल्या स्मार्ट स्कूल स्पर्धा अंतर्गत सर्वेक्षणात मनपा शाळा क्र.४३ काठे गल्ली नाशिक या शाळेला डिजिटल या कॅटेगरीत देशात दुसरा क्रमांक मिळाला होता. त्याचाच पुरस्कार वितरण कार्यक्रम काल शनिवार रोजी गोवा येथे पार पडला. या पुरस्कार वितरण समारंभाला नाशिक मनपा शिक्षण विभागाचे मा. प्रशासनाधिकारी बापुसाहेब पाटील यांनी उपस्थिती दर्शवली आणि पुरस्कार स्वीकारला.Nashik Municipal Administrative Officer Bapusaheb Patil accepted the second national level award in Goa

नाशिक महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत 69 शाळांचे वर्ग डिजिटल करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. नाशिक महानगरपालिकेतील काठे गल्लीतील मनपा शाळा क्रमांक 43 मध्ये आठ स्मार्ट क्लासरूम सुरू झाले आहेत. त्याच दरम्यान डिजिटल स्मार्ट सर्वेक्षण करण्यात आले होते.

हे ही वाचा

पनवेल महानगरपालिकेने काढले ७२ जागासाठी पदभरती जाहिरात शुद्धीपत्रक | बघा कोणते बदल झाले | कोणत्या पदासाठी | संपुर्ण माहिती.

स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत मनपा शाळेमध्ये विविध शैक्षणिक बदल दिसून येतआहेत. पारंपारिक फळ्यासोबतच स्मार्ट बोर्ड, नवीन बेंचेस, इंटरनेट कनेक्शन, डिजिटल अभ्यासक्रमाची शैक्षणिक सुविधा इत्यादी सुविधा शाळेमध्ये दिसून येत आहेत.मनपा शिक्षण विभागाकडून 1 कोटी रुपयांचा निधी खर्च करून शाळांचा संपुर्ण कायापालट केला जात आहे.इकोनॉमिक्स टाईम्स गव्हर्मेट डिजीटेक या संस्थेने देशभरात स्मार्ट स्कूल उपक्रमात सहभागी झालेल्या शहरांना भेटी दिल्या.या संस्थेच्या पथकाने मनपा शाळा क्र.४३ काठे गल्ली या ठिकाणी ही भेट दिली होती आणि पाहणी केली होती.

संपूर्ण शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविण्यात येत आहेत. प्रत्येक शाळेत 21 संगणकांचा कक्ष बनवण्यात येत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत शाळेचा संपूर्ण कायापालट होत आहे. काही ठिकाणी काम पूर्ण ही झालेले आहे. Nashik Municipal Administrative Officer Bapusaheb Patil accepted the second national level award in Goa

हे ही वाचा

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये स्काऊट गाईड विषय अनिवार्य करण्यात येत आहे.अभ्यासक्रम भाग : 1 | सर्व शाळांना उपयोगी.

याचीच दखल घेऊन केंद्राच्या इकोनॉमिक्स टाइम्सने नाशिक मनपा शाळांच्या या डिजिटल क्रांती बद्दल गोवा येथे पुरस्कार सोहळ्यात नाशिक मनपा शिक्षण विभागाला रोप्य पदकाने सन्मानित केले गेले. या गव्हर्मेंट डिजिटल अवॉर्ड 2023 पुरस्कार वितरण सोहळ्याला मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी मा. बापुसाहेब पाटील उपस्थित राहिले व त्यांनी हा सन्मान स्वीकारला.

मा. प्रशासनाधिकारी बापुसाहेब पाटील यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या.

हे ही वाचा

विविध पात्रता,पदे,आरक्षण संपुर्ण तपशील काय आहेत जाणून घ्या. पनवेल महानगरपालिका ३७७ विविध जागासाठी भरती प्रक्रिया सुरु आहे

        

  “मी आज गोवा येथे पुरस्कार स्वीकारला,

          हा पुरस्कार खऱ्या अर्थाने माझ्या तमाम

         शिक्षकांचे श्रेय आहे,त्यांनी केलेले आजपर्यंतच्या    

         मेहनतीचे फळ आहे, त्यामुळे सर्व शिक्षकांना                

            हा पुरस्कार अर्पण करीत आहे.

                        धन्यवाद.”

  मा.प्रशासनाधिकारी यांच्या दूरदृष्टीने,कर्तुत्वाने आज डिजिटल स्मार्ट सर्वेक्षणात नाशिक मनपा शिक्षण विभागाचा झेंडा देश पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. याचे श्रेय मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी मा.बापूसाहेब पाटील यांना जाते यात शंकाच नाही.

Leave a Comment