दाट झाडींच्या डोंगराळ भागात वसलेले एक छोटस गाव कुकटोळी.या गावाच्या कुशीत असलेला गिरलिंग डोंगर.आजूबाजूला विस्तीर्ण हिरवीगार पिकांनी व्यापलेली जमीन.
Table of Contents
महादेवाच्या डोक्यावरील मुकुट मनी शोभावा असे सफेद रंगाचे गिरलिंग मंदिर पर्यटनाच्या वेगळ्याच जगात घेऊन जाते.येऊन तर बघा एकदा आमच्या जुन्या पन्हाळयाला अर्थात गिरलिंग मंदिर कुकटोळीला.Girling Temple, Old Panhala Kuktoli. Does Maharashtra know about this place ?
हे ही वाचा
आता या कर्मचाऱ्यांना मिळणार CMP प्रणाली द्वारे वेतन | परिपत्रक निर्गमित
गिरलिंग मंदिर, जुना पन्हाळा कुकटोळी नेमके कोठे आहे ?
महाराष्ट्राला सांगली शहर तर परिचित आहेच.सांगलीतून मिरजला आल्यावर मिरज मधून सुभाषनगर हून सरळ मालगाव हून बेळंकी ला यावे.बेळंकीहून सलगरे ला जाताना एक फाटा उत्तरेला फुटतो.
त्या रस्त्याने सरळ उतरे यांच्या मळ्यातून पश्चिमेला सरळ रस्त्याने गेल्यावर कुकटोळी लागते तेथेच लागुनच डोंगर आहे अर्थात तोच जुना पन्हाळा आहे.
या डोंगराला गिरलिंग डोंगर किंवा जुना पन्हाळा असेही म्हणतात.आजकालच्या धावपळीच्या जगात मनुष्याला मानसिक स्वास्थ्य ,प्रसन्नता देणारे ,आनंदमय निसर्ग ठिकाण दिसले की माणूस चैतन्यमयी, उत्साही होतो.अशा ठिकाणापैकीच एक मंदिर म्हणजे गिरलिंग मंदिर आहे.या मंदिराच्या वर डोंगरावर विस्तीर्ण असे पठार आहे.
हे ही वाचा
मोकळ्या जागेपासून पैसे कसे मिळवू शकाल |यातील एक तरी पर्याय लागू
डोंगराला लांबून जरी पाहिलं तरी डोंगराची वरची बाजू एका रेषेत दिसते. गिरलिंग मंदिर हजारो वर्षांपूर्वीचे मंदिर आहे . हे मंदिर रामायण कालीन मंदिर आहे असे बोलले जाते.
मंदिरासमोर पराशय ऋषीची समाधी आहे. मंदिराच्या मध्ये वशिष्ठ ऋषींची संजीवन समाधी आहे. मध्ये शिवलिंगा ची मोठी पिंड आहे. दररोज नियमितपणे त्या पिंडाची पूजा केली जाते.
या मंदिराला धार्मिक वैशिठ्या बरोबरच नैसर्गिक वैशिष्ठ ही लाभले आहे.ट्रेकिंगला किंवा शाळेच्या सहलीसाठी किंवा पर्यटनासाठी लोक येतात. या डोंगरावरील गुहा या जांभ्या खडकापासून बनल्या आहेत व त्या मध्येच कोरल्या आहेत. Girling Temple, Old Panhala Kuktoli. Does Maharashtra know about this place?
डोंगराच्या बाजूने अनेक गुहा सापडतात. बऱ्याच गुहा पांडव अज्ञातवासात असताना कोरलेल्या गुहा आहेत असे बोलले जाते.
मंदिराच्या उजव्या बाजूला कड्याच्या बाजूने छोटीशी पाऊलवाट काढून गुहेमध्ये जाता येते. त्यामध्ये शिवलिंगाची छोटीशी पिंड ही आहे .छोटीशीच गुहा आहे.
मंदिराच्या उजव्या बाजूच्या पायऱ्या चढून गेल्यावर वाट पठारावर जाते. डाव्या बाजूनेही जाता येते .हे पठार खूप विस्तीर्ण असे पठार आहे.
हे ही वाचा
एकदा चार्ज केल्यावर चालते 70 किलोमीटर ही इलेक्ट्रिक सायकल|बाजारात नवीन येणार येत्या दिवाळी नंतर
याला जुना पन्हाळा असे म्हणतात .पठारावर 400 एकर शेतजमीन आहे. याच्यावरूनच दिसून येते की पठार किती मोठे आहे. या पठाराचे वैशिष्ट्य असे आहे की पठाराच्या कडेकडेने जांभ्या खडक आहेत.तेथे दुर्मिळ लेणं आहे.
त्याचं नाव आहे तिघई लेणी. तेथे तीन घई असल्यामुळे त्याला तिघई लेणी असेही नाव पडले आहे .
पठाराच्या कडेला एका कड्यांमध्ये हे लेणं कोरल आहे.जांभ्या खडकामध्ये हे लेणं कोरलेलआहे.ही गुहा देखील खूप आकर्षक आहे तसेच नुकत्याच झालेल्या सभामंडपामध्ये शनी मारुतीची स्थापना करण्यात आली आहे.तेथील शिवलिंगाची स्थापना बाराशे वर्षांपूर्वी केली गेली आहे असे समजते.
या डोंगराला जुना पन्हाळा असे नाव का देण्यात आले ?
जुने जाणते लोक असे बोलतात की,खूप जुन्या काळी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराज येथे आले होते. तेव्हा एक चमत्कार घडला होता.तो चमत्कार म्हणजे भांड्यात शिजत घातलेला ससा जिवंत झाला होता. हा चमत्कार एका संजीवनी झाडामुळे शक्य झाला असे ऐकायला मिळते.
ते झाड अद्याप कोणालाही सापडले नाही. ज्या झाडामुळे ससा जिवंत झाला त्या झाडा चा शोध येथे सुरु झाला पण झाड मात्र सापडले नाही.
येथे पन्हाळा किल्ला बांधण्यात येणार होता. हा चमत्कार झाल्यामुळे त्या किल्ल्याची स्थापना कोल्हापूर येथे करण्यात आली.
असे आज ही परिसरातील लोक बोलतात.शिवलिंगाचा वार हा सोमवार असतो. त्यामुळे प्रत्येक सोमवारी भाविक, भक्तांची खूप गर्दी येथे असते. येथे प्रत्येक सोमवारी महाप्रसादा चे आयोजन करण्यात येते.तसेच श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी यात्रा भरवण्यात येते. खूप मोठ्या संख्येने भाविक यात्रेसाठी येतात.
हे ही वाचा
शाळा व्यवस्थापन समितीची रचना कशी असते : अटी,शर्ती व निकष असे आहेत
यात्रेच्या दिवशी देखील येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. तसेच यात्रेच्या दिवशी सांगलीच्या कृष्णा नदीतील पाणी पहाटेच्या वेळी शिवलिंगाला आणून वाहतात. पूजा आरती करून यात्रेला सुरुवात केली जाते .
असे खास वैशिष्ट्य आहे यात्रेचे.या मंदिराकडे शासन आणि लोक प्रतिनिधी यांचे दुर्लक्ष जरी असले तरी स्थानिक लोकांनी व भाविकांनी मात्र मंदिराच्या विकासाच्या बाजू नेहमी उचलल्या आहेत.इथल्या लोकांनी इथली संस्कृती जपली आहे.मंदिराची देखभाल,निगा,पावित्र्य यात कोणताही दुर्लक्षितपणा जाणवत नाही. शासन आणि लोक प्रतिनिधी नी इकडे लक्ष द्यायला पाहिजे. लोकांनी जपलेल्या ,निसर्गरम्य परिसराने वेढलेल्या ,धार्मिक,गुहा ,प्राचीन बांधकाम असलेल्या मंदिराला एकदा तरी अवश्य भेट द्या असे सांगितल्या वाचून मन मात्र राहत नाही.