पळसखेड्यात रानातल्या कवितांची निसर्गसंपन्न लेणी कोरणारे आठवणीतील अजिंठ्याजवळचे कवी ना.धो.महानोर.

अजिंठ्याच्या अजस्त्र लेण्याच्या बाजूला पळसखेड्यात रानातल्या कवितांची निसर्गसंपन्न लेणी कोरणारे कवी ना. धो. महानोर आज आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही.

कवी ना. धो. महानोर आज आपल्यात नाहीत पण त्यांच्या गावाकडच्या निसर्ग संपन्न कविता आज आपल्यामध्ये आहेत. कवी ना. धो. महानोर या कवितांच्या रूपात कायम आपल्यात राहतील. निसर्ग माणसापेक्षा जिवंत आहे हे पटवून देण्याची ताकद त्यांच्या कवितेत होती लेखणीत होती.Na.Dho.Mahanor, a memorable poet near Ajintha who carves natural caves of poems in the forest in Palaskhedy.

हे ही वाचा

नाशिक सायबर पोलिसांचा “सायबर दूत” उपक्रम काय आहे जाणून घ्या : महाराष्ट्रातून होत आहे कौतुकाचा वर्षाव.

कवी ना. धो. महानोर यांच्या बोलण्यातून निसर्ग पाजळायचा,लिहिण्यातून हिरवाई फुटायची, असा हा हाडाचा कवी माणूस अचानक आपल्यातून निघून जाण्याने कविता विश्वाचे नुकसान झालेच आहे पण एका ग्रामीण कवीला आपण कायमचे मुकलो आहोत.

कविता लिहिण्यासाठी ना. धो. महानोर यांना कुठेही देशात परदेशात जावे लागले नाही. त्यांच्या पळसखेड या गावात बांधावर फिरत असताना सुद्धा ते सहज कविता जन्माला घालत. त्यांना तिथे जे गवसलं ते त्यांनी जगभर पोहोचवले. ना. धो. महानोर, त्यांच्या कविता आणि अजिंठा लेणी तिन्ही गोष्टींची लोकप्रियता समान आणि कायम राहील यात शंका नाही.

कवी ना. धो. महानोर यांच्या विषयी थोडक्यात माहिती आज आपण वाचणार आहोत.

मराठवाड्यातील शेवटचं गाव,जिथं आजूबाजूला छोटी छोटी खेडी आहेत,असे पळसखेड नावाचे गाव अजिंठाच्या बाजूला आहे. त्या गावाची वस्ती दीड हजार इतकी आहे. फक्त सातवीपर्यंत शाळा असलेल्या गावात ना. धो. महानोर जन्मले व वाढले. जिथे शिक्षणच नव्हतं, घरातल्या लोकांनाही कविता नावाचा शब्दही माहीत नव्हता अशा कुटुंबात कवी ना. धो. महानोर यांचा जन्म झाला.

हे ही वाचा

नाशिक मनपा क्षेत्रात “मेरी मिट्टी, मेरा देश” अभियान : आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमाचे नियोजन.

त्यांचे वडील शेतमजूर होते. गावामध्ये सुद्धा कुणाला शिक्षणाचे फारसे देणे घेणे नव्हते. अशा ठिकाणाहून ना. धो. महानोर पुढे गेले. कोरडी जमीन, काहीच न पिकणारी जमीन हे सगळं असे असल्याने महानोर यांच्या पदरी वण-वण भटकेपणा आला होता. ते यशस्वी झाल्यावर लोक त्यांना विचारायचे की, ही कविता आली कुठून ? घरचे कुणी लिहिणारे वाचणारे होते का ? असे लोक विचारत असायचे. गावातून कुटुंबातून कवितेशी जवळीक असणाऱ्यांचा दूर दूर पर्यंत काहीही संबंध नव्हता.

तिथल्या लोकांना वाटायचे की, कविता करणे म्हणजे बिनडोक लोकाचे काम आहे. लोक त्यांना हसायचे, त्यांची पत्नी सुद्धा त्यांना विचारायची की तुम्ही कवी होणारच आहात का ? त्यावर ते उत्तर द्यायचे मग होणारच ना ! वडील म्हणायचे या गोष्टी बंद कर, मुंबई,पुण्याची लोक तुला वर येऊ देणार नाहीत. पण त्यांनी या गोष्टीचा कधीच विचार केला नाही.

पुढे ना. धो. महानोर यांनी मराठी कवितेचे, कवींचे सर्व संस्कार अर्थात ज्ञानोबा,तुकोबा,बहिणाबाई,मर्ढेकर,विदा करंदीकर,त्यांचे समकालीन अरुण कोल्हटकर असो आरती प्रभू असो, नामदेव ढसाळ असो सर्वांचे संस्कार महानोर यांनी घेतले.नव्या कवींचे संस्कार ही त्यांनी घेतले आणि पचवले. 

हे ही वाचा

आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल ! काय AI लेखन क्षेत्रातील लोकांना ही ठरणार उपयोगी ?

पण स्वतःची वाट आणि चेहरा त्यांनी निर्माण केला. कवी ना. धो. महानोर म्हणायचे शहरी संपत्तीच्या ठिकाणी जरी फिरलो तरी माझा एक पाय पळसखेड मध्येच असतो ,त्या मातीत असतो,त्या भरड रान मळ्यात असतो.कवी ना.धो.महानोर आपल्यातून वैकुंठवासी झाले तरी त्यांना श्रद्धांजली द्यावी असे मनाला वाटत नाही,कारण असे कवी जात नाहीत ते कायम आठवणीत मनात आणि हृदयात राहत असतात.

Leave a Comment