पावसाची बातमी : 4 दिवसात मान्सून केरळात ? महाराष्ट्रात यावेळी

पावसाची बातमी : चार दिवसात मान्सून केरळात ? महाराष्ट्रात यावेळी पाऊस सविस्तर माहिती

 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतामध्ये उष्णतेची प्रचंड लाट निर्माण झालेली असून या तापमानाने 45° पर्यंत आपले अस्तित्व दाखवलेले आहे. या उष्णतेने देशातील बहुसंख्य नागरिक होरपळून निघत असलेले दिसून येत आहेत.Rain News: Monsoon in Kerala in 4 days? This time in Maharashtra

हे ही वाचा : नवीन शैक्षणिक वर्षापासून बालवाडी,अंगणवाड्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होण्याची शक्यता.

मागील मे महिन्यापेक्षा यावेळ चा मे महिना खूपच कडक असल्याचे लोकांकडून बोलले जात आहे. या कडक उष्णतेमुळे लोक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नवीन माहितीनुसार भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मोसमी अर्थात पावसाविषयी अत्यंत समाधानकारक माहिती दिलेली आहे.

हे ही वाचा : पंजाबराव डख यांचे भाकित : चक्री वादळाचा अडथळा आणि महाराष्ट्रात मान्सून सक्रियतेबाबत.

 देशामध्ये मान्सूनसाठी अतिशय पोषक वातावरण निर्माण झालेले असून येत्या चार दिवसांमध्ये केरळ राज्यामध्ये मान्सून धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. खरे तर मान्सून एक जून रोजी केरळमध्ये दरवर्षी दाखल होत असतो, परंतु यावेळी तो आधीच अर्थात 31 मे रोजी दाखल होणार आहे. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या लोकांना ही एक समाधानकारक बातमी आहे असे म्हणावे लागेल.

यंदा मान्सून हा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये दीर्घ असा बरसणार असणार आहे. यंदा सरासरी इतका किंवा सरासरी पेक्षाही जास्त पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशात  106% सरासरी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशी माहिती विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेली आहे 

भारतीय हवामान खात्याने सांगितलेले आहे की, ईशान्य भारतात सामान्य पेक्षा कमी, उत्तर पश्चिम मध्ये सामान्य आणि मध्य आणि दक्षिण भारतात सामान्य पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. अर्थात मागील वर्षापेक्षा जास्त पाऊस यावेळी पडण्याची शक्यता आहे असे डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.

 वायव्य भारतात 92 ते 108% अर्थात सरासरी इतका आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी अर्थात 94% पाऊस असण्याची शक्यता आहे.

 जूनमध्ये दहा  तारखेदरम्यान मुंबईसह कोकणात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. 15 जून पर्यंत मान्सूनचं पुणे,नाशिक कोल्हापूर सह महाराष्ट्र मध्ये मराठवाडा विदर्भ या ठिकाणी आगमन होण्या चा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

Leave a Comment