नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाची मनपा शाळा क्रमांक 22 धृवनगर येथे 14 ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येत असतो. वाचन प्रेरणा दिन हा 15 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येत असतो. 15 ऑक्टोबर रोजी रविवार असल्याने त्या दिवशी सुट्टी असल्याने महानगरपालिका शाळा क्रमांक 22 धृवनगर मध्ये शनिवारी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.Reading Motivation Day Dhruvnagar Municipal School No. 22 is celebrated with great enthusiasm.
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाकडून शनिवार हा दप्तर मुक्त शनिवार म्हणून साजरा करण्यात येत असतो. विद्यार्थी दप्तर विना शाळेत उपस्थित होते. त्यांना शाळेच्या ग्रंथालयातून पुस्तके वाचनास देण्यात आली. प्रत्येक वर्गातून विद्यार्थ्यांचे गट करण्यात आले होते आणि गटानुसार विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले.
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जात होते. भारतामधील युवा पिढी सक्षम आहे आणि या सक्षम पिढीमुळेच आपला भारत देश महाशक्ती बनणार आहे असे त्यांचे मत होते. डॉ. कलाम यांना असे वाटत होते की एक पुस्तक शंभर मित्रांबरोबर असते. या पुस्तकांचा वापर करून आपण आपले जीवन समृद्ध केले पाहिजे. पुस्तके आपल्या जीवनाचा उद्धार करू शकतात असे त्यांचे मत होते. डॉ.अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाब्दीन असे होते. त्यांनी अग्निपंख नावाचे प्रसिद्ध पुस्तक लिहिले आहे. तरुण वयात डॉक्टर कलाम यांचे लढाऊ वैमानिक होण्याचे स्वप्न होते. परंतु नियतीने हुलकावणी दिली. वयाच्या 75 व्या वर्षी देखील तोच तारुण्यातील उत्साह जोश त्यांच्या नसानसातून ओसंडत होता. 8 जून 2006 रोजी सुखोई 30 एम के आय या लढाऊ विमानातून स्वप्नातील वेगाने प्रवास करणारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे एकमेव राष्ट्रपती होते. ते फक्त मिसाईल मॅन नव्हते तर सळसळत्या रक्ताच्या तरुणांचे एक आदर्श होते.
डॉ. अब्दुल कलाम यांना वाचनाची खूप आवड होती. वाचनाने आपले व्यक्तिमत्व परिपक्व होते असे त्यांना वाटत होते. त्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन केलेले होते. त्यामुळे त्यांचे विचार हे ऐकत रहावे आणि वाचत रहावे असे वाटतात. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी भारताचे राष्ट्रपती पद सुद्धा भूषविलेले आहे. त्यांचे जीवन प्रेरणादायी आहे. या प्रेरणादायी जीवनाचा अभ्यास विद्यार्थ्यांना व्हावा त्यांच्या विचारांची मुळे विद्यार्थ्यांमध्ये रुजली जावीत या उद्देशाने शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो.
शाळा महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाविषयी आवड निर्माण व्हावी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येत असतो. वाचन प्रेरणा दिनामुळे विद्यार्थ्यांना डॉ.अब्दुल कलाम यांच्या आठवणी जागृत होतात. त्यांच्या जीवनाची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळते.
हेही वाचा : कालिकामाता यात्रा उत्सव 2023 : नाशिक महानगरपालिकेची तयारी,महिला बचत गटांना संधी !
महानगरपालिका शाळा क्रमांक 22 धृवनगर मध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा दिनामध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना विविध थोर व्यक्तींच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर किंवा वाचन प्रेरणा दिनानिमित्त भाषणे केली.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक सोनजी गवळी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपशिक्षिका लता सोनवणे,कल्पना पवार,दिपाली काळे,उपशिक्षक नामदेव जानकर,संतोष महाले आणि ईश्वर चौरे यांचे सहकार्य लाभले.