Smart School प्रकल्पांतर्गत नाशिक महानगरपालिका शिक्षकांना अत्याधुनिक अध्यापन साधने,तंत्रज्ञान वापराचे धडे.

Smart School प्रकल्पांतर्गत नाशिक महानगरपालिका शिक्षकांना अत्याधुनिक अध्यापन साधने,तंत्रज्ञान वापराचे धडे मिळाले याबाबत सविस्तर माहिती .

स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत पुरविण्यात येत असलेल्या स्मार्ट बोर्ड, डिजिटल अभ्यासक्रम व शाळा प्रशासन संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) च्या प्रात्यक्षिकासाठी निवडक ५१ शाळांमधील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांसाठी दिनांक ११ व १२ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय प्रशिक्षण मनपा शाळा क्र.२१ कार्बन नाका शिवाजीनगर व मनपा शाळा क्र.४३ काठे गल्ली येथे सकाळी 8 ते 11 या वेळात आयोजित करण्यात आले होते.Under the Smart School Project, the teachers of Nashik Municipal Corporation are provided with the latest teaching tools and lessons on the use of technology.

हे ही वाचा

CITILINC कडून दिव्यांग प्रवाश्यांच्या मोफत कार्ड ला पुन्हा मुदतवाढ

   

या प्रशिक्षणात NMC School No.१८,१९,२२,२३,२६,२८,३१,६९,७०,७१,७४,७७,८७,25,२७,३०,७८,८६,१,४,७,८,१३,३७,३८,३९,४०,४१,४२,४७,४८,४९,५५,५६,५८,६०,६२,६३,६४ ६५,८३,८५ आणि NMC Secondary School Shivajinagar satpur,Satpur Colony,Ganesh Chowk/Chunchale,Raigad Chowk,Ambad,Kamathawade,Wadalagaon,Pathardi,Badidarga या शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचा समावेश होता.नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. च्या निधी अंतर्गत स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविण्यात आला आहे.

हे ही वाचा

Multi skill विद्यार्थ्यांसाठी उर्जा व पर्यावरण विषयावर मनपा माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर मध्ये व्याख्यान !

या प्रकल्पासाठी मे. पॅलेडियम कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पॅलेडियम) यांची स्मार्ट शाळा अंमलबजावणीसाठी “सल्लागार” म्हणून नाशिक महानगरपालिकेकडून नेमणूक करण्यात आलेली आहे.या अंतर्गत पुरविण्यात आलेल्या स्मार्ट बोर्ड, डिजिटल अभ्यासक्रम व शाळा प्रशासन संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) चे प्रशिक्षण घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.

दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ५१ शाळांचे प्रशिक्षण वर दिलेल्या माहितीप्रमाणे दि. ११ व १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दिलेल्या वेळापत्रका प्रमाणे नियाजित करण्यात आले होते . सदर प्रशिक्षण सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्यासाठी अनिवार्य होते.

सदर स्मार्ट स्कूल प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणी साठी सदर प्रशिक्षण अत्यंत महत्वाचे असल्याने सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सदर प्रशिक्षणास वेळापत्रकानुसार नियोजित ठिकाणी उपस्थित राहून प्रशिक्षण अतिशय चांगल्या वातावरणात पार पाडले.

हे ही वाचा

कालिकामाता यात्रा उत्सव 2023 : नाशिक महानगरपालिकेची तयारी,महिला बचत गटांना संधी !


बुधवार दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी मनपा शाळा क्रमांक 21 शिवाजीनगर सातपूर शाळेत मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील यांच्या शुभहस्ते दुसऱ्या टप्प्यातील 51 शाळांमधील शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले.प्रशिक्षण संपल्यानंतर प्रशिक्षणाचा अभिप्राय ही शिक्षकांनी लिहून दिला. शिक्षकांना हे प्रशिक्षण अतिशय उपयुक्त व गरजेचे होते असे वाटले.सर्व प्रशिक्षकांनी अतिशय सखोल असे मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणात स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत शिक्षकांना अध्यापन करतांना येणाऱ्या अडचणी, त्यांचं निरसन करण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रशासनाधिकारी बी.टी. पाटील यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले व या स्मार्ट स्कूल अंतर्गत डिजिटल वर्गांमार्फत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा करून देता येईल यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याचे सांगितले. यावेळी केंद्रप्रमुख प्रकाश शेवाळे,विजय कवर, दिपक मानकर व विविध शाळांमधील,मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते

Leave a Comment