Multi skill विद्यार्थ्यांसाठी उर्जा व पर्यावरण विषयावर मनपा माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर मध्ये व्याख्यान !

Multi skill विद्यार्थ्यांसाठी उर्जा व पर्यावरण विषयावर मनपा माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर मध्ये व्याख्यान या बाबत सविस्तर माहिती आपण या मध्ये पाहूया.

नाशिक मनपा माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर कार्बन नाका सातपूर नाशिक येथील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण योजने अंतर्गत Multi skill विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.मल्टीस्कील हा विषय या शाळेत सन २०१६-१७ पासून सुरु आहे. Lecture on energy and environment for multi skill students in Manpa Madhyamik Vidyalaya Shivajinagar!

Multi skill

या विषयात एकूण चार विभाग पडतात. पहिला विभाग बांधकाम व शेती तंत्रज्ञान, दुसरा विभाग अभियांत्रिकी तंत्रज्ञान व कार्यशाळा, तिसरा विभाग अन्नप्रक्रिया व वैयक्तिक आरोग्य स्वच्छता व चौथा विभाग ऊर्जा व पर्यावरण.

हेही वाचा : Multi Skill विद्यार्थ्यांची तोफखाना आणि वस्तु संग्रहालयास क्षेत्रभेट

या चारही विषयातील मूलभूत ज्ञान विद्यार्थ्यांना मिळत असते. त्याचप्रमाणे दर महिन्यात या चारही विषयातील एकेक अतिथी व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते. मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील यांच्या आदेशान्वये शनिवार हा दिवस नाशिक नगरमहापालिकेतील शाळेत “दप्तर मुक्त दिवस” म्हणून राबविण्यात येत असतो. त्यामुळे या दिवशी ऊर्जा व पर्यावरण या विषयाची अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

   

हेही वाचा : कालिकामाता यात्रा उत्सव 2023 : नाशिक महानगरपालिकेची तयारी,महिला बचत गटांना संधी !

अतिथी व्याख्यान म्हणून पंढरी पगारे यांना उपशिक्षक अक्षय एन अहिरे यांनी आमंत्रित केलें होते.त्यांचा आंब्याचे रोप देवून सत्कार करण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांना विद्युत साधने, हत्यारे यांची ओळख करून दिली. जसे कि स्क्रू ड्रायव्हर चे प्रकार, टेस्टर चे प्रकार, पक्कड चे प्रकार, वायरचे प्रकार, विविध प्रकारची केबल्स, वायरची जोड, स्विचेस चे प्रकार, त्याचप्रमाणे विद्युत चिन्हे ओळख व वापर याबाबत सविस्तर माहिती पंढरी पगारे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली.अतिथी व्याख्यान दरम्यान विद्यार्थ्यांकडून साधे वायरिंग, जिना वायरिंग आणि गोडाऊन वायरिंग याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात आले. स्वतः विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक केल्यामुळे त्यांना ती गोष्ट समजण्यास सोपी जाते हे विद्यार्थ्यांना कळाले.

त्यांचा इलेक्ट्रिक क्षेत्रात वीस वर्षाचा अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितला व कोणतेही विद्युत काम करत असताना स्वतःची काळजी घेणे हा मुद्दा विद्यार्थ्यांना पटवून सांगण्यात आला.

हेही वाचा : निपुण भारत उत्सव अंतर्गत शाळा भेटीमध्ये कोणत्या बाबी पाहिल्या जाणार !

Leave a Comment