Multi Skill विद्यार्थ्यांची तोफखाना संग्रहालयास क्षेत्रभेट
मनपा माध्यमिक विद्यालय कार्बन नाका,शिवाजीनगर, सातपूर नाशिक यांनी स्टूडेंट पोलीस कॅडेट अंतर्गत नाशिक जवळील देवळाली येथील रेजिमेंट ऑफ आर्टिलरी म्युझियमला भेट दिली. जिथे भारताने शेजारील देशांसोबत लढलेल्या विविध युद्धांदरम्यान भारतीय लष्कराच्या सर्वात महत्त्वाच्या विभागांपैकी एक असलेल्या तोफखान्याने बजावलेल्या कार्यांची आणि भूमिकांची त्यांना ओळख करून देण्यात आली.
हे ही वाचा : नाशिक महानगरपालिकेत भरती : पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक पदांसाठी.
देवळाली तोफखाना हे नाशिक शहरातील नाशिक रोड या ठिकाणी आहे. तसेच या ठिकाणी कॅन्टोनमेंट बोर्ड देखील आहे. तसेच या ठिकाणी रणगाडे/ तोफखाना,वस्तु संग्रहालय आहे. आशिया खंडातील हे सर्वात मोठे तोफखाना केंद्र आहे.
सदरचे तोफखाना केंद्र सन 1947 मध्ये पाकिस्तानमधून नाशिक येथे स्थलांतरीत झालेले आहे. भारतीय सैन्य दलातील अधिकारी तसेच जवानांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. तसेच बोफोर्स तोफांचे देखील या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते.
बोफोर्स तोफा, तोफा, रणगाडे, लष्करी करार आणि ऐतिहासिक घटनांची विविध चित्रे या ठिकाणी संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत.आर्टिलरी म्युझियम या ठिकाणी मल्टी स्किल इयत्ता नववी व इतर विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती.
त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विविध प्रकारची क्षेपणास्त्र बघण्यासाठी मिळाली.मोकळ्या जागांवर ठेवलेल्या लष्कराच्या अनेक टाक्या, रडार यंत्रणा, विमाने विद्यार्थ्यांनी बघितली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात वापरण्यात आलेले क्षेपणास्त्र या ठिकाणी ठेवण्यात आले आहे व भारत सरकारने सुरू केलेल्या या नवीन अग्निपथ योजनेअंतर्गत आपल्या देशातील तरुणांना चार वर्षासाठी सैन्यात काम करता येईल.
हे ही वाचा : बैलपोळा सण मनपा शाळा क्र. 22, 33 धृवनगर, महादेवनगर मध्ये साजरा.
अग्निवीर योजनेअंतर्गत भरती झालेल्या तरुणांना “अग्निवीर” असे म्हटले जाणार आहे. या अग्निवीर योजना अंतर्गत भरती होणाऱ्या तरुणांना आर्थिक मानधन व अनेक सोयी सुविधाही दिल्या जाणार आहेत.त्याचप्रमाणे वय वर्ष १७ अग्निवीर कसे बनता येईल याचे देखील मार्गदर्शन मिश्रा,जाधव इत्यादी मान्यवरांनी व मल्टीस्किल प्रशिक्षक अक्षय अहिरे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या क्षेत्रभेटीचे आयोजन सचिन जाधव हवालदार अंबड नाशिक यांनी केले असून त्यासंदर्भात सविस्तर माहिती देखील देण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र सोनार, उपशिक्षक पाखले व मल्टीस्किल प्रशिक्षक अक्षय अहिरे हे उपस्थित होते.