RTE Admission : नोंदणीची प्रक्रिया सुरू

RTE Admission : नोंदणीची प्रक्रिया सुरू या विषयी सविस्तर माहिती

या शैक्षणिक वर्षापासून RTE साठी खासगी इंग्रजी माध्यमांचा जागेसह यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित शाळा यांच्यासाठी समावेश करण्यात आला आहे.RTE मध्ये करण्यात आलेल्या या बदलामुळे RTE प्रवेश प्रक्रियेत जागांची संख्या वाढली आहे. राज्यभरातील सर्व शाळांमधून पूर्ण 9 लाख 71 हजार 203 जागा प्रवेशासाठी उपलब्ध झालेल्या आहेत. तसेच प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.

ग्रामीण व शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण घेता यावे म्हणून RTE अंतर्गत खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये 25% विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे आणि त्यासह प्रवेशात पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तकवया आणि इतर सुविधा मोफत पुरवल्या जातील. शाळांमध्ये होणारी पालकांची अडवणूक थांबवायला हवी म्हणून शासनातर्फे शाळांना विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचा जो अधिकार देण्यात आला आहे तो काढून घेतला जाईल आणि यासाठी तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकाराच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येईल.

हे ही वाचा: संकलित मूल्यमापन 2 : शिक्षक मार्गदर्शिका इयत्ता 3 ते 8 गणित विषय

आरटीई अंतर्गत वंचित असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोणतीही परिणाम व्हायला नको म्हणून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जाणार आहे काही वर्षांपासून खासगी इंग्रजी माध्यमांमध्ये शिक्षण विभागाकडून शाळांना शुल्क प्रतिपूर्ती करण्यात येत नाही त्या कारणामुळे शाळांनी आरटीई चे प्रवेश नाकारल्याची परिस्थिती दिसून येत आहे. या विरोधात इंग्रजी शाळांच्या संघटनांनी आंदोलन देखील केले होते म्हणून शिक्षण विभागाने आरटीई कायद्यात सुधारणा केली आहेत त्यानुसार खासगी इंग्रजी शाळा शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

हे ही वाचा: संकलित मूल्यमापन 2 : शिक्षक मार्गदर्शिका इयत्ता 3 ते 8 मराठी विषय

अशा ठिकाणी जिथे अनुदानित किंवा शासकीय शाळा नसते तिथे विद्यार्थ्यांना खाजगी इंग्रजी शाळेत प्रवेश घेता येणार आहे. या बदलामुळे शिक्षण क्षेत्रातून पालक संघटनांनी विरोधी ही केला याबद्दल शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आता ही प्रक्रिया पूर्ण झाली.

हे हि वाचा: नाशिक मनपा शिक्षकांच्या योगदानामुळे वाचले विद्यार्थिनीचे प्राण !

अनेक गोष्टींच्या अभावामुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याचे दिसून येते. म्हणून प्रवेशासाठी तीन-चार वेळा मुदतवाढ केली जाते यामुळे प्रवेशात वेळ लागत असतो हे लक्षात घेऊन जून महिन्यापूर्वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी हा आदेश देण्यात आलेला आहे.

Leave a Comment