राज्यात आता दप्तराशिवाय शाळा : अभ्यासाचा ताण कमी होण्यासाठी उपाय  !

 राज्यात आता दप्तराशिवाय शाळा : अभ्यासाचा ताण कमी होण्यासाठी उपाय या विषयी सविस्तर माहिती.

महाराष्ट्रामध्ये आता इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव उपक्रम राज्य शासनाकडून राबविला जाणार आहे. तो उपक्रम म्हणजे दप्तरविना शाळा. हा उपक्रम राज्यात प्रत्येक शनिवारी राबविला जाणार आहे असे परिपत्रक संबंधित अधिकाऱ्यांनी काढलेले आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना शाळेचे अभ्यासाचे ओझे वाटू नये आणि तणावमुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना घेता यावे या उद्देशाने हा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे समजते.. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपली आवड जोपासण्यास मदत होणार आहे. शाळेची गोडी वाटण्यास मदत होणार आहे.

हे ही वाचा : नवीन शैक्षणिक वर्षापासून बालवाडी,अंगणवाड्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होण्याची शक्यता.

या उपक्रमाची अंमलबजावणी 2024-25 या नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये होणार असून त्यासंबंधीचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेत असताना मानसिक ताण जाणवतो. तो ताण न जाणवता शिक्षण हे आनंददायी पद्धतीने होण्यासाठी या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याला प्राधान्य या शैक्षणिक वर्षांमध्ये दिले जाणार आहे.

हे ही वाचा : पंजाबराव डख यांचे भाकित : चक्री वादळाचा अडथळा आणि महाराष्ट्रात मान्सून सक्रियतेबाबत.

आठवड्यातील पाच दिवस (सोमवार ते शुक्रवार) पुस्तकी धडे दिले जाणार असून शनिवार हा दिवस दप्तराविना असणार आहे. या दिवशी विद्यार्थ्यांच्या आवडीला प्राधान्य दिले जाणारा असून कला,खेळ,ऐतिहासिक किंवा प्रेक्षणीय स्थळांना भेटी स्काऊट गाईड कथा सांगणे असे विविध उपक्रम शिक्षकांना शाळांमध्ये घ्यावे लागणार आहेत. आठवड्यातील दोन दिवस त्यांना अभ्यासापासून विश्रांती भेटल्यानंतर ते सोमवारी परत शाळेत येतील आणि त्यांच्यातील अभ्यास व शाळेबद्दल गोडी वाढलेली असेल असा विश्वास शालेय शिक्षण विभागाला आहे.

 चालू शैक्षणिक वर्षात प्रत्येक शनिवारी दप्तर विना शाळा इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत भरेल. ही संकल्पना आनंदी शनिवार या संकल्पने अंतर्गत असेल. त्या दिवशी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. स्काऊट गाईड, विविध ठिकाणांना भेटी क्षेत्रभेटी यांचे आयोजन केले जाणार आहे.

 नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील शाळांसाठी हा उपक्रम मागील वर्षापासून सुरू केलेला आहे. त्यांच्या या यशस्वीतेनंतर या उपक्रमाचा अभ्यास करून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हा उपक्रम राबविला असल्याची राज्यात चर्चा आहे.

Leave a Comment