“राजर्षी शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धा २०२३ आयोजन.
Table of Contents
सारथी संस्थेमार्फत महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात राजर्षी शाहू महाराज स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यासाठी “राजर्षी शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धा २०२३ आयोजन करण्यात येणार आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे आयोजित राजप शाहू महाराज स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त तालुका स्तरावर प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यासाठी “राजर्षी शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धा २०२३ आयोजन करण्यात येणार आहे.On the occasion of Rajarshi Shahu Maharaj commemoration centenary year, “Rajrshi Shahu Maharaj Taluka Level Essay Competition 2023” is organized for primary and secondary students in all talukas of Maharashtra through Sarathi Sanstha.
हे ही वाचा
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा ” हा उपक्रम कसा असणार आहे संपुर्ण माहिती
संदर्भीय विषयांन्वये राजर्षी शाहू महाराज” यांची कर्तुत्व संपन्न कारकीर्द हि महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व ठरले आहे. सुख विलासाची सर्व साधने पायी घोटाळत असतांना हा राजा उपभोग शून्य राहिला. सत्तेचे साधन हाती ठेवून प्रजेचा उत्कर्ष घडविण्यासाठी त्यांनी महत प्रयास केले. जनतेच्या सर्वांगीण उन्नतीचे त्यांनी स्वप्न पाहिलेव ते साकार करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले.
शाहू महाराजांच्या कार्याची सर्व विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवनाचे सोने करावे, यासाठी सारथी संस्थेमार्फत शालेय व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धा २०२३ आयोजित करण्यात येत आहेत. ही निबंध स्पर्धा पुढील ५ वर्ष चालू ठेवण्याचा सारथी संस्थेचा मानस आहे. सारथी संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी सदर निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. इ. ३ री ते इ. ५ वी तसेच इ. ६ वी ते इ. १० वी च्या विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक वाढावा यासाठी सदरची स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व तालुका स्तरावर घेण्यात येणार आहे. तालुका स्तरीय निबंध स्पर्धा विषय नियम व अटी.
हे ही वाचा
विषय गट :
गट क्र. १ इ ३री ते इ.५ वी
विषय : अ) राजर्षी शाहू महाराजांची एक आठवण
ब) राजर्षी शाहू महराजांच्या जीवनातील मला आवडलेला एक प्रसंग शब्द मर्यादा १०० शब्द
गट क्र. २ :- ६ वी ते ७ वी
विषय : अ) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे क्रीडाविषयक कार्य
ब) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य
शब्द मर्यादा ३०० शब्द –
गट क्र. ३ :- ८ वी ते १० वी
विषय : अ) राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि वसतिगृह चळवळ,
ब) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कृषी क्षेत्रातील कार्य.
शब्द मर्यादा ३०० शब्द
हे ही वाचा
On the occasion of Rajarshi Shahu Maharaj commemoration centenary year, “Rajrshi Shahu Maharaj Taluka Level Essay Competition 2023” is organized for primary and secondary students in all talukas of Maharashtra through Sarathi Sanstha.
१) शालेय स्तर नियोजन :- गट क्र.१ इ.३ री ते इ. ५ वी व गट क्र. २ इ ६वी ते इ.७ वी, इ. ८ वी ते इ. १० वी या तीनही गटांच्या निबंध स्पर्धा शालेयस्तरावर दिनांक :- १४/०८/२०२३ रोजी आयोजित करण्यात याव्यात. यातील प्रथम, द्वितीय, तृतीय व ७ उत्तेजनार्थ विद्यार्थीची निवड करण्यात यावी. या स्पर्धेचा निकाल मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरी नेकेंद्रप्रमुख त्यांच्याकडे सादर करावा.
हे ही वाचा
आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल ! काय AI लेखन क्षेत्रातील लोकांना ही ठरणार उपयोगी ?
२) केंद्रस्तर नियोजन :- गट क्र. १ इ ३ ते इ. ५ वी व गट क्र. २ इ ६वी ते इ.७ वी, इ. ८ वी ते इ.१० वी तीनही गटांच्या निबंध स्पर्धा केंद्रस्तरावर दि.१८/०८/२०२३ रोजी आयोजित करण्यात याव्यात. यामध्ये शालेय स्तरावरील प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ विद्यार्थीचा सहभाग घेण्यात यावा. केंद्रस्तरावरील निबंध स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थीची निवड करण्यात यावी व याच विद्यार्थीची बैंक पासबुकची झेरॉक्स प्रत सोबत पाठवावी. तसेच सदर स्पर्धेचा निकाल केंद्रप्रमुख यांच्या स्वाक्षरीने या कार्यलयास दि. २२/०८/२०२३ पर्यंत सादर करावा.
३) गट क्र.१ इरी ते इ ५ वी व गट क्र. २ इ ६वी ते इ.७ वी, इ. ८ वी ते इ.१० वी या तीनही गटांच्या निबंध स्पर्धेत केंद्रस्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांचे निबंध दि. २२/०८/२०२३ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत समग्र शिक्षा अभियान कार्यालय मनपा शाळा क्र. १६ नाशिक येथे श्रीम मनिया बाहुले विशेष तज्ञ यांच्याकडे जमा करण्यात यावे.
४) सदरच्या स्पर्धेत सर्व माध्यमाच्या सर्व मान्यताप्राप्त शाळेतील विद्यार्थी सहभाग घेवू शकतात..
हे ही वाचा
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा.
५) निबंध लेखन स्पर्धाचे माध्यम मराठी असेल. वरील नमूद केलेल्या गटात एकाच विषयावर विद्यार्थ्यांनी निबंध लिहावा. निबंधावर विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव, इयत्ता, शाळेचे नाव व निबंधाचा विषय नमूद करावा तसेच निबंधाच्या शेवटी शब्द संख्या नमूद करावी.
६) प्रत्येक शाळेतील निबंध स्पर्धेतील सहभागी होणारे व सहभागी होऊन पारितोषिक प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे निबंध शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी एकत्रित करावेत व तदनंतर निंबंध सोबत पुढील प्रपत्र तयार करावे त्यामध्ये अनुक्रमांक, विद्यार्थ्यांचे नाव, इयत्ता, जन्मतारीख, विद्यार्थ्याच्या निबंधाचा विषय, निबंध सादर केलेली तारीख, शेरा या प्रपत्रात विद्यार्थ्यांची माहिती तयार करावी व शाळेच्या लेटर हेडवर मुख्याध्यापकांच्या सही शिक्यानिशी सदर प्रपत्र केंद्रप्रमुख यांच्या कडे जमा करावीत व केंद्रप्रमुख यांनी सर्व प्रपत्र एकत्रित कार्यालयात मा. प्रशानाधिकारी सो. यांना दि.२२/०८/२०२३ पर्यंत सादर करावे.
७) सारथी मार्फत तालुकानिहाय यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येईल. गट क्र. १ इ ३ री ते इ ५ वी प्रथम बक्षिस रक्कम रु.४००, द्वितीय बक्षिस रक्कम रु.३००/-, तृतीय बक्षिस रक्कम रु.२०० व उत्तेजनार्थ रक्कम रु.१००/- ची ७ बक्षिसे विद्यार्थ्यांना देण्यात येतील. गट क्र. २ इ ६वी ते इ.७ वी च्या गटातील विद्यार्थ्यांना प्रथम बक्षिस रक्कम रु. ५००/- द्वितीय बक्षिस रक्कम रु.३००/-, तृतीय बक्षिस रक्कम रु. २००/- व उत्तेजनार्थ रक्कम रु.१००/- ची ७ बक्षिसे प्रत्येक तालुक्यात देण्यात येतील. गट क्र. ३ इ. ८ वी ते इ. १० वी प्रथम बक्षिस रक्कम रु.७००, द्वितीय बक्षिस रक्कम रु. ५००/-, तृतीय बक्षिस रक्कम रु.३०० व उत्तेजनार्थ रक्कम रु.१००/- ची ७ बक्षिसे विद्यार्थ्यांना देण्यात येतील.
८) निबंध स्पर्धेचे परीक्षण आशय २५ गुण अभिव्यक्ती, ५ गुण भाषाशैली, ५ गुण शुद्धलेखन, ५ गुण वळणदार अक्षर व प्रभाव १० गुण एकूण ५० गुणाच्या आधारे मूल्यमापन करण्यात येईल.