शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थांना मिळणार बूट व पायमोजे या विषयी सविस्तर माहिती
Table of Contents
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थांना एक जोड बूट व दोन पायमोजे देण्यात येणार आहे या विषयी परिपत्रक शासनाने संबंधित कार्यालयांना पाठवले आहे. या विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ
राज्य शासनाच्या मोफत गणवेश बुट व पायमोजे योजने अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय शाळांतील इ. १ ते ८ मधील सर्व मुले व मुली या विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून एक जोडी बुट व दोन पायमोजे उपलब्ध करून देण्याकरीता निधी वितरीत करण्याबाबत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय शाळांतील इ. १ ते ८ मधील सर्व मुले व मुली या विद्यार्थ्यांना बूट व पायमोजे यांचा लाभ शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून देण्याची नविन योजना शासनाने सुरू केलेली आहे.
हे ही वाचा: उन्हाळी सुट्टी: 2 मे पासून राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर !
त्या अनुषंगाने दि. ०६.०७.२०२३ रोजी शासन निर्णय यापूर्वीच निर्गमित केलेला आहे. एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे याकरिता प्रति लाभार्थी विदयार्थी रू. १७०/- असा दर निश्चित करण्यात आलेला आहे. तसेच सदर योजनेंतर्गत विदयार्थ्यांना देण्यात येणारे बुट एक समान दर्जाचे असण्याकरिता शासनाने दि. १६.०१.२०२४ रोजीच्या परिपत्रकान्वये मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत.
हे ही वाचा: नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरणार
मार्गदर्शक सुचनांनुसार शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ मध्ये बुट व पायमोजे यांचा लाभ शाळेच्या पहिल्याच दिवशी विदयार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार आवश्यक ती पुढील कार्यवाही विहीत वेळेत पुर्ण होणे आवश्यक आहे.
शासन निर्णय दि. दि.०६.०७.२०२३ व शासन परिपत्रक दि.१६.०१.२०२४ नुसार केंद्र शासनाच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम मंत्रालय यांच्या अधिनस्त असणाऱ्या तंत्रज्ञान विकास केंद्र, मेरठ यांच्याकडून बुट व पायमोजे यांचे स्पेसिफिकेशन सोबतच्या शासन परिपत्रकात परिशिष्ट ‘अ’मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत.
हे ही वाचा: जन्म नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल | केंद्राकडून आली सूचना
त्यादृष्टीने सर्व शाळांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी एक जोड बुट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत आवश्यक ती कार्यवाही होणे आवश्यक आहे.