SwiftChat: राज्यातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचे हजेरी ऑनलाईन घेण्याचा आदेश या विषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमातील १००% विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती विद्या समीक्षा केंद्राच्या SwiftChat या Application मधील “स्मार्ट उपस्थिती” या Bot च्या माध्यमातून नोंदविणेबाबत सविस्तर माहिती.
समग्र शिक्षा, PM पोषण, स्टार्स, पी.एम. श्री अंतर्गत उपक्रमांचे संनियंत्रण तसेच राष्ट्रीय विद्या समिक्षा केंद्राद्वारा तयार करण्यात आलेल्या 6A framework अंतर्गत Attendance, Assessment, Accreditation, Administration, Adaptive Learning व Artificial intelligence याचे ट्रॅकिंग करण्यासाठी राज्याचे विद्या समीक्षा केंद्र कार्यरत आहे.
दि.०१ डिसेंबर २०२३ पासून स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ. १ ली ते १२ वीच्या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती SwiftChat या Application मधील “स्मार्ट उपस्थिती” या Bot द्वारे ऑनलाईन उपस्थिती सुरू करण्यात आली असून, ऑनलाईन उपस्थिती नोंदीमध्ये स ठेवण्यासाठी यापूर्वी आदेश देण्यात आले होते.
हे ही वाचा: गॅस बुकिंग कंपन्यांनी या सुविधा केल्या उपलब्ध ! जाणून घ्या
राज्याच्या विद्या समीक्षा केंद्राचे (VSK) सर्व्हर राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्राशी (RVSK, संलग्न असल्यामुळे भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाने राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या १००% शाळा देखील विद्या समीक्षा केंद्राशी संलग्न करण्याचे निर्देश दिले आहेत.
भारत सरकारचे राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्र (RVSK) वरीलपैकी ६A framework अंतर्गत विद्यार्थी उपस्थिती चालू शैक्षणिक वर्षापासून (२०२६-२७) Real-Time पद्धतीने Dashboard द्वारे संनियंत्रित करणार आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून (२०२६-२७) सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या १००% शाळेतील इ.१ ली ते इ.१२ वीच्या सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविण्याचे निर्देश आहेत.
शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, पुणे यांचेमार्फत निर्देश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने नागपूर व अमरावती विभाग (विदर्भ) वगळता राज्यातील इतर सर्व विभागांतील शाळांनी विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती दि. १५ जून २०२६ पासून व नागपूर व अमरावती विभाग (विदर्भ) (नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा व यवतमाळ या ११ जिल्ह्यांतील) सर्व शाळांना दि.३० जून २०२६ पासून नियमितपणे १०० % विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविण्याबाबत आपल्या स्तरावरून त्वरित आदेश देण्यात यावेत. तसेच जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी VSK च्या जिल्हा लॉगिनद्वारे नियमित आढावा घ्यावा, क्षेत्रीय अधिकारी यांनी संबंधित सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात.
विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती
१. इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती SwiftChat या Application मधील स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या वर्गशिक्षकांनी नोंदवावी.
२. SwiftChat या Application चा वापर करणाऱ्या शिक्षकांनी लॉगिन करण्यासाठी शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा. आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा. तसेच आपल्या शाळेचा यु-डायस कोड व स्वतःच्या शालार्थ आय. डी. चा वापर करावा.
३. ज्या शिक्षकांना शालार्थ आय. डी. उपलब्ध नसेल, त्या सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी यु-डायस+ पोर्टलमधील १० अंकी National Teacher Code व यु-डायस पोर्टलवर नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करावा. National Teacher Code टाकण्यापूर्वी NTC लिहून पुढे १० अंकी National Teacher Code टाकावा (उदा. NTCTPXXXXXX32). उपस्थिती नोंदविताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ व यु-डायस पोर्टलमधील माहिती अपडेट करावी. सदर पोर्टलवरील माहिती अपडेट केल्यानंतर अशा अडचणी पुढील काही दिवसात आपोआप दूर होतील.
४. विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना App मध्ये विद्यार्थी न दिसल्यास आपल्या स्तरावरून U-Dise प्रणालीमध्ये विद्यार्थी प्रमोशनची (Grade Progression) प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. जेणेकरून विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.
हे ही वाचा: “एक पेड मां के नाम” मोहिमेअंतर्गत शाळांमध्ये वृक्षारोपण मोहीम
५. दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी ७.०० ते दु. १२.०० तर अन्य शाळांसाठी सकाळी १०.०० ते सायं.०५.०० या कालावधीत उपस्थितीची नोंद करावी. रात्रशाळांना आपली उपस्थिती रात्री ०९.०० पर्यंत नोंदविता येईल.
६. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), समग्र शिक्षा व मनपा स्तरावरील समकक्ष अधिकारी हे विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. समग्र शिक्षा अंतर्गत प्रोग्रॅमर याकामी त्यांना मदत करतील. विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.) व जिल्हा नौडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील.
७. राज्यस्तरावरून मासिक आढावा बैठकीत याविषयीचा नियमित आढावा घेतला जाईल.
८. ऑनलाईन उपस्थिती नोंदविताना येणाऱ्या अडचणी https://tinyurl.com/AttendanceBot या लिंकवर सादर करू शकता.






