नाशिक मधील स्वारबाबानगर मनपा शाळा क्र.30 शाळेची 2 दिवसीय शैक्षणिक सहल संपन्न

नाशिक मधील स्वारबाबानगर मनपा क्र.30 शाळेची 2 दिवसीय शैक्षणिक सहली विषयी साविस्तर माहिती.

नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 30 स्वारबाबानगर सातपूर या शाळेची शैक्षणिक सहल ही नुकतीच पार पडली . नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 30 ही एक उपक्रमशील शाळा आहे. या शाळेत पहिली ते आठवीचे विद्यार्थी शिक्षण घेतात, अध्ययन करतात. शाळेत नेहमी नवनवीन उपक्रम हे घेतले जातात. त्यातलाच एक उपक्रम म्हणजे शैक्षणिक सहलीचे आयोजन होय.

सहलीचे ठिकाण

नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक ३० स्वारबाबा नगर सातपूर या शाळेची शैक्षणिक सहल ही शुक्रवारी दिनांक 5 जानेवारी 2024 ते 6 जानेवारी 2024 पर्यंत आयोजित करण्यात आली होती. ही शैक्षणिक सहल अत्यंत आनंदात व उत्साहात संपन्न झाली. या सहलीचे विद्यार्थी सहलीसाठी आतुरतेने वाट बघत होते. शाळेच्या सहलीमध्ये अलिबाग किल्ला, अलिबाग चौपाटी, नागाव बीच, काशीद बीच, मुरुड, जंजिरा किल्ला, बिर्ला मंदिर या ठिकाणांना भेट दिल्या गेल्या.

हे ही वाचा:शैक्षणिक सहली बाबत शासनाचे जोखमीचे परिपत्रक काय सांगते ?

सहल जाण्याआधी पालक भेटीद्वारे पालकांना सहलीची संपूर्ण माहिती देण्यात आली. सहलीत इयत्ता चौथी ते आठवीचे विद्यार्थी हे सहभागी झाले होते. या सहलीत एसटी महामंडळाच्या दोन बसेस मध्ये एकूण 93 विद्यार्थी सहभागी झाले होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थ्यांनी सहलीचा उत्साहात आनंद घेतला.

दिनांक 5 जानेवारी रोजी रात्री स्वारबाबा नगर सातपूर येथून 93 विद्यार्थी व आठ शिक्षक सहलीसाठी रवाना झाली होते.

सहलीचे दृश्य

सहलीत सकाळी अलिबाग येथील स्थळांना भेटी देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या अल्पोपहार नंतर विद्यार्थ्यांनी नागाव बीच आणि आजूबाजूचा परिसरात फेरफटका मारला. पुढे विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवणानंतर पुढे सहल ही मुरुड जंजिरा येथील जलदुर्ग बघण्यासाठी मार्गस्थ झाली.

हे ही वाचा: प्रजासत्ताक दिन परेड पाहण्यासाठी या पद्धतीने ऑनलाईन तिकीट बुक करा.

रस्त्याच्या दुतर्फा असलेली नारळाची झाडे,आंबे पोकळीच्या आणि दूरवर पसरलेला समुद्र किनारा हे दृश्य विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे आकर्षित करत होते. त्याचबरोबर समुद्राच्या मधोमध असणारा अजिंक्य अभेद्य आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला जंजिरा किल्ला आणि त्याची रचना याबाबत सर्व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. परत येताना विद्यार्थ्यांनी बिर्ला मंदिर आणि काशीद बीच चे देखील दर्शन घेतले. सहलीचा सर्व विद्यार्थ्यांनी मनसोक्तपणे आनंद घेतला. रात्रीच्या संगीत, भोजनानंतर विद्यार्थी सहलीच्या गोड गोड आठवणी घेऊन स्वग्रही परतले.

सहलीचे नियोजन

सहलीसाठी मनपा शाळा क्र 30 शाळेचे मुख्याध्यापक नितीन चौधरी, उपशिक्षक ब्राम्हणकर , धुमाळ , पाटील , चौरे , रौंदळ , जगताप तसेच उपशिक्षिका आथरे,पैठणपगारे,बनाटे ,ठाकरे,गांगोडे ,शेवाळे ,देवरे,कदम,भामरे यांनी परिश्रम घेतले.

हे ही वाचा: सकाळ चित्रकला स्पर्धेत सहभागी व्हा. या तारखेला स्पर्धा

त्याचबरोबर सहलीसाठी मुख्याध्यापक नितीन चौधरी,शैक्षणिक सहलप्रमुख .प्रवीण रौंदळ, शेखर धुमाळ, धनलाल जगताप ,प्रेमसम्राट ब्राम्हणकर, ओंकार चौरे,यांसह पुनम भामरे, वृषाली भामरे यांनी विद्यार्थ्याच्या सोबत उपस्थित राहून सहल यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. या सहलीसाठी शाळेतील मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम होऊन सहलीचे काटेकोरपणे नियोजन केले

Leave a Comment