आरोग्यदायी करवंद आणि त्याचे फायदे मोजक्या शब्दात याबाबत संपूर्ण माहिती
करवंद हे फळ प्राचीन काळापासून अस्तित्वात असणारे एक फळ आहे. करवंदाचा उल्लेख प्राचीन साहित्या मध्ये उपलब्ध असलेला आढळून येतो. करवंदाला आपल्याकडे रानमेवा या नावाने सुद्धा ओळखले जाते. करवंदाचे एक प्रकारचे खुरटे झुडुप असते. हे झुडूप डोंगरदऱ्यामध्ये आढळते. म्हणून या झाडाला डोंगरची मैना असे म्हटले जाते. करवंदाचे फळ कच्चे असताना हिरव्या स्वरूपात असते. आणि परिपक्व झाल्यानंतर निळसर काळे दिसते. Healthy Karvand and its benefits in a few words !
Table of Contents
हे ही वाचा : पावसाची बातमी : चार दिवसात मान्सून केरळात ?
हे छोटेसे दिसणारे झाड आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे फळ देत असते, सर्वांना याचा फायदा होत असतो.
या झाडाचे अस्तित्व जंगलामध्ये, डोंगर कपारी मध्ये असते. हे फळ तोडल्यानंतर एक सफेद रंगाचा चिकट पदार्थ निघत असतो, जो अतिशय चिकट असतो. हे फळ आंबट,गोड,तुरट अशा चवीची असते.
आता आपण पाहूया करवंदाच्या झाडाचे महत्व काय आहे ?
करवंदाचे फळ हे अतिशय गुणकारी असे फळ आहे. या फळांमध्ये व्हिटॅमिन ए ,विटामिन सी, लोह,खनिज कॅल्शियम, मॅग्नेशियम पोटॅशियम, फायबर्स आणि एनथोसायनिंग म्हणजेच तंतुमय घटक पदार्थ भरपूर असतात. यातील घटकामुळे मानवी शरीराला ऊर्जा आणि तरतरी मिळण्यास मदत होते.
हे ही वाचा : राज्यात आता दप्तराशिवाय शाळा ?
आधुनिक समाजातील लोक अँटीबायोटिक वर जास्त अवलंबून राहत असतात, परंतु आदिवासी बहुल भागामध्ये आज ही शरीरातील शर्करेचे प्रमाण जर स्थिर ठेवायचे असेल तर, त्यासाठी या करवंदाचाच प्रामुख्याने उपयोग केला जातो. पारंपरिक वनस्पती करवंद उपचारात वापरली गेली जाते. आज ही पारंपरिक पणे करवंदाचा वापर केला जातो. हा वापर खजूर, अतिसार अधून मधून येणारा ताप, कामोत्तेजक अँटी पायारेटिक साठी वापर होतो. करवंदाच्या तुरट गुणधर्म साठी देखील ते फळ विशेष प्रसिद्ध आहे.
करवंदांचा आरोग्यासाठी उपयोग
- करवंदा पासून उष्णतेचे होणारे विकार कमी होतात.
- करवंदे खाल्ल्याने कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.
- करवंदामध्ये कॅल्शियम असल्याने हाडांसाठी आरोग्यदायी असतात.
- करवंदे हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात.
- करवंदामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
- करवंदामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
- करवंदामुळे वजन नियंत्रित होते.
- करवंदे डोळ्यांसाठी निरोगी बनवतात.
- करवंदा मुळे त्वचा निरोगी राहते. करवंदे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
करवंदाचा खाण्यामध्ये कोण कोणता उपयोग होतो आता आपण पाहणार आहोत.
- करवंदाचे लोणचे
- करवंदाचे जाम
- करवंदाची चटणी
- करवंदाचा रस
- सुका करवंद
- करवंद सिरप
अशाप्रकारे करवंदाचा आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या खाण्यामध्ये उपयोग होऊ शकतो म्हणून करवंद हे फळ मानवासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.