ध्रुवनगरच्या मनपा शाळेत दिवाळी कशी साजरी झाली याबाबत सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत.
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाची शाळा मनपा शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर मध्ये दिवाळी हा सण मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवार दिनांक 4 नोव्हेंबर हा प्रथम सत्रातील शेवटचा दिवस होता अर्थात 6 नोव्हेंबर पासून शाळेला दिवाळी सुट्ट्या असल्याने शालेय प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी दिवाळी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेऊन तो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. Diwali festival is celebrated with enthusiasm in a unique way in Municipal School of Dhruvnagar.
हे ही वाचा : दिव्यांगासाठी शिष्यवृत्ती व व्यवसाय प्रशिक्षणाकरिता अर्थसहाय्य्य योजना.
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाची मनपा शाळा क्र. 22 ध्रुवनगर ही विविध उपक्रम आयोजित करत असते. शाळेच्या उपक्रमामध्ये विविधता असते. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असे विविध उपक्रम मनपा शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर मध्ये साजरे करण्यात येत असतात.
या विविध उपक्रमांचा उद्देश हा असतो कि, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये सकारात्मक प्रभाव पडावा, उपक्रमातील अनुभव जीवनामध्ये कामी यावा हा उद्देश उपक्रमाचा असतो.
दिवाळी या सणातील महत्वाचे दिवस पाडवा,भाऊबीज, लक्ष्मीपूजन,नरक चतुर्दशी,धनत्रयोदशी,वसुबारस असे विविध दिवसासह दिवाळी प्रतिकात्मक रूपात साजरी करण्यात आली . शाळेचे सर्व विद्यार्थी विविध वेशभूषेत उपस्थित होते.
हे हि वाचा
बेरोजगार दिव्यांगाना अर्थसहाय्य्य योजना|संपुर्ण माहिती
शाळेतील बागेच्या फुलांची आरास यावेळी करण्यात आली होती.विविध आकाश कंदील बनवून लटकवलेले होते. यावेळी बचत गटाकडून खिचडी सह चिवडा वाटप करण्यात आला व शाळेतील शिक्षकवृदांकडून विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या शिक्षण तज्ञ उषाताई दिपके उपस्थित होत्या. उषाताई दिपके यांच्याकडून मुलांसाठी चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रंगनाथ चव्हाण हे ही उपस्थित होते. त्यांचा सुद्धा सत्कार ही करण्यात आला. शाळेचे माजी जेष्ठ शिक्षक बाळनाथ खैरनार हे सुद्धा उपस्थित होते. त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. शाळेची विद्यमान मुख्याध्यापक सोनजी गवळी यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपशिक्षिका लता सोनवणे,कल्पना पवार,दिपाली काळे, उपशिक्षक नामदेव जानकर,संतोष महाले,ईश्वर चौरे आणि सुरक्षारक्षक उमेशकांत निकम यांचे सहकार्य लाभले.