क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2023-24 प्रस्ताव ऑनलाईन इथे पाठवा .

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2023-24 आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार हे प्रत्येक वर्षी समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना प्रदान करण्यात येत असतात.त्याचाच एक भाग म्हणून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३-२४ प्रस्ताव ऑनलाईन मागविण्यात येत आहेत.

हे ही वाचा : International Yoga day : नाशिक मनपा शाळांमध्ये योगदिन मोठ्या उत्साहात साजरा.

शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज अणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी हे पुरस्कार वस्तूनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत. आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुढे नमूद केल्यानुसार वेबलिंकवर

https://forms.gle/7vYfYGJ5YGxVFAiu7

हे ही वाचा : पायाभूत चाचणी परीक्षा : नवीन शैक्षणिक वर्षात,संपूर्ण वेळापत्रकासह पहा.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले

या लिंकवर आपली आवेदने दिनांक २५ जून, २०२४ रोजी पासून दिनांक ०५जुलै, २०२४ रोजी पर्यंत सादर करावीत. सोबत पुरस्काराचे वेळापत्रक जोडले आहे. त्याप्रमाणे आपल्या स्तरावरील कालमर्यादित कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदर वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत आपणांस संचालनालय स्तरावरुन अवगत करण्यात येईल.

सदरील बाबत आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून देखील स्वतंत्रपणे सूचना/लेखी आदेश निर्गमित करुन सर्व संबंधित शिक्षकांपर्यंत माहिती पोहचेल असे पाहावे असे शासन परिपत्रकात नमूद आहे..

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार वेळापत्रक खालीलप्रमाणे

Leave a Comment