नाशिक महानगरपालिका शाळांची वेळ बदलली
Table of Contents
नाशिक महानगरातील सर्व मनपा शाळांची वेळ नाशिक मनपा शिक्षण विभागाकडून बदलण्यात आल्याचे परिपत्रक आज शुकवार रोजी निर्गमित झाले.तत्कालीन मा.आयुक्त तुकाराम मुंडे यांनी ठराविक शाळा विलीन करून शाळांची वेळ ही बदलली होती.पण ही वेळ काहीशी शाळांच्या दृष्टीने गैरसोयीची असल्याने काही शाळांनी SMC च्या निर्णयानुसार यामध्ये बदल केला होता.
हे ही वाचा
मा.आयुक्त तुकाराम मुंडे यांनी परीपत्रकाद्वारे निर्गमित केलेली वेळ अशी होती,सकाळ सत्रातील शाळांची वेळ ८ ते २ व दुपार सत्रातील शाळांची वेळ १२.३० ते ५.३० करण्यात आलेली होती. परंतु यामध्ये शाळांनी वेळांमध्ये बदल केलेला होता.त्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या हे ही अडचणीचे ठरु लागले होते.
ही बाब विचारात घेऊन मनपा शिक्षण विभागाचे मा.प्रशासनाधिकारी बी.टी.पाटील यांनी सध्याच्या शाळेच्या वेळेत बदल करण्यात येत असल्याचे परिपत्रक निर्गमित केले.Nashik Municipal Corporation Schools Timings Changed. View Any School Timings with Time Table Planning.
हे ही वाचा
Jio BP petrol pump Dealership मिळवा आणि महिन्याला कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये कमवा. सुवर्णसंधी
शुक्रवार दिनांक ११/०८/२०२३ रोजी केंद्रसमन्वयक यांच्या समवेत झालेल्या बैठकीमधील चर्चेनुसार प्राथमिक शाळांच्या वेळेमध्ये भिन्नता असुन सर्व शाळांची वेळ समान असणे प्रशासकीयदृष्टया योग्य राहील. त्याअनुषंगाने प्राथमिक शाळांच्या वेळेमध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात आला आहे.नाशिक महानगरपालिकेच्या एकूण ९० शाळा आजमितीला नाशिक महानगरात आहेत.यामध्ये शाळांमध्ये तासिकांच्या नियोजनासह खालील बदल करण्यात येत आहेत.Nashik Municipal Corporation Schools Timings Changed. View Any School Timings with Time Table Planning.
हे ही वाचा
आजच अर्ज करा ! महाराष्ट्र शासन : १० वी व १२ वी,पदवीधर युवकांच्या भरतीस प्रारंभ
हे ही वाचा
ठाणे महानगरपालिका नोकरभरती : वरिष्ठ निवासी पदांसाठी थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहा.
उपरोक्त प्रमाणे दिनांक २८/०८/२०२३ पासून शाळांच्या वेळा करण्यात येत आहे. त्यानुसार खालील प्रमाणे सुचना देण्यात आल्या आहेत .
१. उपरोक्त दिलेल्या वेळेप्रमाणेच शाळा भरविण्यात येणार आहेत .
२. कार्यालयाच्या लेखी परवानगी शिवाय शाळेच्या वेळेत कोणताही बदल करता येणार नाही. परस्पर वेळेत बदल केल्यास मुख्याध्यापकांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.
३. संदर्भीय पत्रामध्ये नमुद केल्याप्रमाणे सोमवार ते शनिवार तासिकांचे नियोजन करण्यात येणार आहे .
४. शालेय वेळेत बदल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव आणता येणार नाही तसे केल्यास शाळेतील सर्व शिक्षकांवर प्रशासकीय कारवाई होणार आहे.
५. सर्व शिक्षकांनी शाळा भरण्यापूर्वी १० मिनिटे आधी येणे व शाळा सुटल्यानंतर १० मिनिटांनी शाळेतून जाणे अपेक्षित आहे.
६. शाळेच्या वेळेनुसार नेहमी प्रमाणे सेल्फी हजेरी काढण्यात येणार. त्यानुसार सेल्फी हजेरी नसल्यास वेतन अदा केले जाणार नाही.
७. शाळेतील शिपाई यांनी १ तास आधी येवून शाळेतील सफाई करणे अपेक्षित आहे. सर्व शाळेची नीटनेटकी स्वच्छता करण्यात यावी.शाळा सुटल्यानंतर ३० मिनिटांनी शाळेतुन जाणे. शाळेतील शिपाई यांना आठ तास डयुटी करणे आवश्यक आहे.
८. शालेय परिसरामध्येच सेल्फी हजेरी द्यावी लागणार .
हे ही वाचा
शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका,अधिकार व कार्ये जाणून घ्या.
९. प्रशासकीय कामकाजासाठी बाहेर जातांना हालचाल रजिस्टरवर नोंद करावी लागणार.वारंवार प्रशासकीय कामकाजाचे निमित्त करून बाहेर जाता येणार नाही .
१०. अर्जित रजा, वैद्यकिय रजा व किरकोळ रजा यांचा हिशोब शालेय दप्तरी ठेवण्यात यावा.
११. कार्यालय प्रमुखांनी वारंवार रजा घेणाऱ्या शिक्षकांना रजेसाठी शिफारस देण्यात येवू नये.
१२. शाळेची वेळ ठरविणे हि संपूर्ण प्रशासकीय बाब असून शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार शालेय वेळेत बदल करता येणार नाही याची सर्व मुख्याध्यापकांनी नोंद घ्यावी.
१३. दोन सत्रात भरणान्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी ११ ते ५ या वेळेत शाळेत यावे.
१४. शाळा इमारत संरक्षणासाठी मनपा शिक्षण विभाग व सुरक्षा विभाकडून सुरक्षा रक्षकांची नेमणुक करणेत आलेली आहे. सदर सुरक्षा रक्षकांची वेळ दुपारी ४.०० ते १२.०० व रात्री १२.०० ते सकाळी ८.०० निश्चित करून देण्यात आलेली आहे. त्यानुसारच त्यांनी कामकाज करावेत. सुरक्षा रक्षकांच्या वेळेत मुख्याध्यापकांनी परस्पर बदल करू नये.