स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत नृत्य व पथनाट्य स्पर्धा या विषयी सविस्तार महिती.
Table of Contents
मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडी मुळे हळूहळू पर्यावरण नष्ट होत चाललेले आहे. म्हणूनच आपल्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन व्हावे आणि नाशिक शहराच्या नागरिकांमध्ये आजूबाजूच्या परिसराच्या स्वच्छते प्रती जागृती निर्माण व्हावी म्हणून नाशिक शहर महानगरपालिका तर्फे स्वच्छ भारत अभियान ही नृत्य व पथनाट्य स्पर्धा नाशिक शहरात आयोजित केलेली आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून नाशिक शहरातल्या सर्व विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
हे ही वाचा: नमो चषक 2024 या स्पर्धेसाठी शाळा व महाविद्यालयांनी विविध स्पर्धेसाठी नोंदणी करा
सदर स्पर्धेचे निकष पुढीलप्रमाणे आहेत:-
- सदर नृत्य व पथनाट्य स्पर्धा विनामूल्य आहे
- या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावी दरम्यानचे शालेय विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
या नृत्य व पथनाट्य स्पर्धेकरिता पुढील विषयांच्या संदर्भात कलाकृती सादर कराव्यात.
- ओला व सुका कचरा वर्गीकरण व त्याचे फायदे.
- प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम
- स्वच्छते प्रति नागरिकांचे कर्तव्य
- नदीपात्राचे होणारे प्रदूषण व संवर्धनाचे उपाय
हे ही वाचा: Nashik Police कडून वाहतूक मार्ग नियंत्रणाबाबत महत्वाचे बदल
- नृत्य स्पर्धेकरिता प्रत्येक सादरीकरणासाठी चार ते पाच मिनिटांचा वेळ देण्यात येईल.
- पथनाट्य स्पर्धेकरिता प्रत्येक सादरीकरणासाठी सहा ते आठ मिनिटांचा वेळ दिलेला असेल.
- सदर पथनाट्य स्पर्धा ही दिनांक 18 जानेवारी 2024 व 19 जानेवारी 2024 रोजी मनपाच्या कालिदास कला मंदिर येथे घेण्यात येणार आहे.
- नृत्य स्पर्धेकरिता प्रत्येक सादरीकरणासाठी किमान आठ ते बारा स्पर्धकांचा समावेश असायला पाहिजे.
हे ही वाचा: 2 दिवशीय केंद्रस्तरीय नवभारत साक्षरता अभियान प्रशिक्षणाची सांगता
- पथनाट्य स्पर्धेकरिता प्रत्येक सादरीकरणासाठी किमान आठ ते बारा स्पर्धकांचा समावेश असायला पाहिजे.
- स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 10,000/- व 7500/- व 5000/- रोख पारितोषिके देऊन विजेत्यांना गौरवण्यात येईल त्याचबरोबर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल.
- पथनाट्य कलाकृतीची भाषा मराठी, हिंदी किंवा इंग्रजी असायला पाहिजे.
- या नृत्य किंवा पथनाट्य स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशिका या दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी पावे तो घनकचरा व्यवस्थापन विभाग राजीव गांधी भवन येथे अथवा health.nashikcorporation@gmail.com पाठविण्यात याव्यात.
हे ही वाचा: शैक्षणिक सहली बाबत शासनाचे जोखमीचे परिपत्रक काय सांगते ?
प्रवेशिके बाबत अधिक माहिती करिता पुढील क्रमांकावर संपर्क करा
- श्री प्रशांत ठोके – 9970434259
- श्री मोहित जगताप – 7020043611