FASTtag जाणार काळाच्या पडद्याआड | नवीन GPS प्रणाली कोणती ? कशी? या विषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
केंद्र सरकारने महिन्यापासून देशातील 5 ते 10 महामार्गांवर GPS आधारित टोल चाचणी सुरू करण्याचा विचार करत आहे. टोल वसूल करण्याची ही पद्धत आता अधिक कार्यक्षम असणार आहे.
टोल वसूल करण्याच्या नवीन पद्धतीमुळे आता FASTtag इतिहास जमा होणार आहे. मंत्रालयातील रस्ते सचिव अनुराग जैन यांनी सांगितले आहे की,’देशभरात याची अंमलबजावणी करण्यापूर्वी काही महामार्गांवर याची चाचणी केली जाणार आहे.’
हे ही वाचा: शिक्षकांना कोणतेही अशैक्षणिक कामे नकोत ; शासन नियुक्त समितीकडून अहवाल प्राप्त.
चालत्या वाहनातून टोल कापला जाईल.
सध्या रस्ते आणि वाहतूक मंत्रालय GPS टोल प्रणालीवर काम करत आहे. या नवीन प्रणाली बाबत काही समस्या आहेत. त्याचा विचार देखील वाहतूक मंत्रालय करणार आहे. या नवीन प्रणालीत टोल प्लाझा संपताच चालत्या वाहनातील टोल कापला जाईल.GPS आधारित टोल प्रणाली वाहनांमध्ये एखादे उपकरण बसवली जाईल, ज्याने त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे. महामार्गाच्या एक्झिट पॉईंट वर प्रवास केलेल्या अंतरानुसार वाहनाचे टोल कापले जाईल.
अंतरानुसार टोल कापला जाईल
जर एखाद्या वाहनाने कमी प्रवास केला तर कमी टोल कापला जाईल जास्त प्रवास केला तर जास्त टोल कापण्यात येईल सध्या अशी कोणतीही व्यवस्था नाही आहे. सध्या महामार्गावरून वाहनाने कमी प्रवास जरी केला तरी त्यांना पूर्ण टोल भरावे लागणार आहे. परंतु नवीन प्रणालीमध्ये सेन्सर असेल त्यामुळे प्रवासांना टोल भरण्यासाठी महामार्गावर थांबण्याची गरज भासणार नाही. GPS आधारित टोल प्रणालीत वापर करताना स्वतःचे आणि त्याच्या वाहनाची नोंदणी ही करावी लागेल व त्याला बँक खात्याशी जोडावे लागणार आहे.
हे ही वाचा: नाशिक मधील स्वारबाबानगर मनपा शाळा क्र.30 शाळेची 2 दिवसीय शैक्षणिक सहल
रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने राष्ट्रीय मार्गाने शुल्काच्या नियमांमध्ये बदल केला आहे. ज्यात प्रत्येक वापरकर्त्यांना राष्ट्रीय महामार्गांवरील अंतरानुसार टोल कापण्याची सुविधा मिळेल.
या सर्व गोष्टी अमलात आणण्यापूर्वी अधिकाऱ्यांना याचा बराच अभ्यास करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. या नवीन प्रणालीत एक गोष्ट वापरकर्त्यांच्या गोपनीयतेशी संबंधित आहे. ती म्हणजे जीपीएस द्वारे वापरकर्त्याचा वैयक्तिक डेटा ट्रॅक करता येतो. महामार्गावरील वापरकर्त्यांची गोपनीयता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
हे ही वाचा: स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत नृत्य व पथनाट्य स्पर्धात सहभागी व्हा
वाहनांमध्ये ट्रेकिंग उपकरणाची गरज भासणार
या GPS आधारित टोल प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी वाहनांमध्ये ट्रेकिंग डिवाइस ची आवश्यकता असेल. जेणेकरून वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल. महामार्गावरून बाहेर पडताना तुम्ही केलेला अंतरावर टोल आकारला जाईल त्यामुळे वाहनांना टोल नाक्यांवर थांबण्याची गरज भासणार नाही.
मोटार वाहन कायद्यात सुधारणा करावी लागेल.
लाईव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने सांगितले की, रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम 2008 मध्ये सुधारणा करावी लागेल. यामुळे वाहनाने प्रवास केलेल्या अंतराच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्गावर टोल वसूल केला जाईल.
मात्र ही यंत्रणा सुरू करण्यापूर्वी तांत्रिक पायाभूत सुविधांसोबतच रस्ते सुधारण्यासाठी बरेच काम करावे लागणार आहे. केंद्र सरकारला मोटर वाहन कायद्यात दुरुस्तीची गरज ही भासू शकते. त्यामुळे देशातील महामार्गांवरील टोलनाके हटवण्यासाठी या यंत्रणेला बराच वेळ लागेल.
हे ही वाचा: नमो चषक 2024 या स्पर्धेसाठी शाळा व महाविद्यालयांनी विविध स्पर्धेसाठी नोंदणी करा
गोपनीयतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे
पेमेंट व्यवस्था सुधारण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार GPS आधारित टोल प्रणाली सुरू करणार आहे. पण आता या प्रणाली वरील गोपनीयते बाबतची चिंता व्यक्त केली जात आहे आणि या कारणाने ही यंत्रणा सुरू करण्यास केंद्र सरकारला विलंब होत आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक आणि रस्ते महामार्ग मंत्रालयाचे अधिकारी आता या गोपनीयतेच्या समस्यांचे निराकरण करण्यावर चर्चा करत आहेत.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहने न थांबवता टोल वसूल करण्यासाठी ऑटोमॅटिक नंबर प्लेट ओळख प्रणालीचे दोन प्रकल्प चालवले आहेत. २०१८-१९ या वर्षात वाहनांना टोल नाक्यांवर सरासरी आठ मिनिटे थांबावे लागत होते तर २०२१-२२ मध्ये टोल नाक्यांवर FASTtag प्रणालीमुळे फक्त 47 सेकंद थांबावे लागतात पण आता तुम्हाला टोलनाक्यावर थांबायची गरजच भासणार नाही.
हे ही वाचा: Nashik Police कडून वाहतूक मार्ग नियंत्रणाबाबत महत्वाचे बदल
मार्च 2024 पासून जीपीएस टोल सुरू करण्याची सरकारची योजना
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की मार्चपासून ही प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात दहा महामार्गांवर या प्रणालीची चाचणी करण्यात येणार आहे. याचा अर्थ असा की FASTtag प्रणाली बंद होईल व टोल वसुलीसाठी आता GPS प्रणाली सुरू होईल.