राज्यात व नाशिक महानगरपालिका क्षेत्रात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरू : नागरिकांनो,कृपया सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकास सहकार्य करा.

नाशिक : महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने संपुर्ण महाराष्ट्र राज्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या विविध भागात दि. १७ ऑगस्ट २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये सर्वेक्षण सुरु असणार आहे. बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये राज्यात दि. १ एप्रिल २०१० रोजी बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा कार्यान्वित झाला आहे. सदर कायद्याअंतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे आवश्यक आहे. बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे. शाळेत कधीही दाखल न झालेली तसेच, शाळेत न जाणारी बालके, किंवा ज्या बालकांनी शाळेत प्रवेश घेतला नाही अशा ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी हे सर्वेक्षण आहे. राज्यात आजही अनेक बालके विविध कारणांमुळे शाळाबाह्य आहेत.Survey of out-of-school children started in the state and Nashik Municipal Corporation area: Citizens, please cooperate with the teacher conducting the survey.

हे ही वाचा

आता वीज मीटरला ही मोबाईल सारखे रिचार्ज करावे लागणार ?

विविध जिल्ह्यात तसेच नाशिक जिल्ह्यात अनेक तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात रोजगारा निमित्त कुटुंब स्थलांतर करीत असतात. स्थलांतराचा कालावधी हा माहे ऑक्टोबर ते एप्रिल असा साधारण सहा महिन्याचा असतो. ऊस तोडणी, वीटभट्टी, दगडखान, कोळसाखाणी, शेतमजुरी, कांदाचाळ, डाळिंब व द्राक्ष शेती, बांधकाम व्यवसाय, सार्वजनिक बांधकामा अंतर्गत रस्ते व नाले दुरुस्ती बांधकाम, जिनिंग मिल इत्यादी अनेक प्रकारच्या कामांसाठी ही कुटुंबे स्थलांतर करीत असतात.Survey of out-of-school children started in the state and Nashik Municipal Corporation area: Citizens, please cooperate with the teacher conducting the survey.

हे ही वाचा

सातपुर विभागातील विश्वासनगर मनपा शाळेमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत भरघोस यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकाचे मा.शिक्षणाधिकारी बी.टी.पाटील व मान्यवरांच्या हस्ते सत्कार

सदर कुटुंबासोबत शाळेत जाणारी मुले स्थलांतरित करीत असल्यामुळे ५ ते ६ महिन्यांच्या कालावधीतील अनुपस्थितीमुळे बालके शिक्षणापासून वंचित राहतात, परिणामी मुले शाळा सोडून आपल्या आई-वडिलांना रोजगारात व कामात मदत करतात. वाढत्या स्थलांतरामुळे बालके शाळाबाह्य होत असतात तसेच बालमजुरी व बालविवाहाचे प्रमाण रोखण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे शाळाबाह्य स्थलांतरित व शाळेत नियमित असलेल्या बालकांचा शोध मोहीम राबवण्याचा निर्णय उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये घेतलेला आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे निर्णय झालेला आहे.

हे ही वाचा

आता आपली आवडती स्प्लेंडर इलेक्ट्रिक अवतारात ; इतकी असणार किंमत.

राज्यात शाळाबाह्य अनियमित स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दि. १७ ऑगस्ट २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये सर्वेक्षण हाती घेण्याचे शासनाच्या सूचना आहेत. या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात महसूल, ग्राम विकास, नगर विकास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास , एकात्मिक बाल विकास योजना, कामगार विभाग आदिवासी विकास, अल्पसंख्यांक विकास, सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या विभागातील अधिकान्यांच्या सहभागाने राबविण्याबाबत शासनाने कळविलेले आहे.

सर्वेक्षणाचा कालावधी:- दि. १७ ऑगस्ट २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२३

उद्दीष्ठे

१. शाळाबाह्य व अनियमित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.

२. बालकांचे पालका सोबत होणारे स्थलांतर थांबवणे .

३. स्थलांतरित बालकांना त्याच परिसरात शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवणे

४. स्थलांतरित होणाया बालकांना शिक्षण हमी कार्ड देणे.

हे ही वाचा

पूर्व प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणाचा भाग समजणे चुकीचे | SCERT ला सादर केलेल्या उपक्रमांतर्गत प्रस्तावना लेख.

सर्वेक्षण करावयाच्या बालकांचे प्रकार

अ) शाळाबाह्वय व अनियमित बालके

१. (१) शाळेत कधीच दाखल न झालेली बालके.

(२) शाळेत प्रवेश घेतलेली परंतु प्राथमिक शिक्षण पूर्ण न केलेली एका महिन्यापेक्षा

सातत्याने अनुपस्थित राहत असलेली बालके

ब ) स्थलांतरितांच्या बाबतीत मुख्यतः दोन प्रकारात वर्गीकरण होते.

१.कुटुंबासोबत स्थलांतरीत होऊन येणारी बालके

१.कुटुंबासोबत स्थलांतरीत होऊन जाणारी बालके

हे ही वाचा

धृवनगरच्या शाळेतील मा.दिनकर आण्णा पाटील यांचे संपुर्ण भाषण ; शाळेस बांधुन देण्यात येणार वर्गखोली.

१) सर्वेक्षण कोठे करावे

सदर सर्वेक्षण कालावधीमध्ये शालाबाह्य अनियामित स्थलांतरीत बालकांच्या नोंदी घरोघरी,प्रत्येक गावात व शहरात गजबजलेल्या वस्त्या,रेल्वे स्टेशन,बस स्थानके, बाजार, गुराळ,गावाबाहेरची पाल , वीट भट्ट्या,दगडखान मोठी बांधकामे स्थलांतरित कुटुंबे,झोपड्या,फुटपाथ,सिग्नलवर,रेल्वेमध्ये फुले व अन्य वस्तू विकणारी तसेच रस्त्यावर भीक मागणारी बालके, लोक कलावंताची वस्ती,स्थायी निवारा करणारी कुटुंबे, भटक्या जमाती, तेंदुपत्ता वेचणारी,इत्यादी ठिकाणी काम करणारे बालमजूर ,उसतोड कामगारांच्या वस्त्या , शेत मळ्यावरील आणि जंगलातील वास्तव्य असणाऱ्या पालकांची बालके या ठिकाणाची बालके, मागासवंचित गटातील व अल्पसंख्यांक गटातील,वस्तीतील मुले यांची माहिती शोधमोहिमेत घेण्यात यावी. महिला विकासअंतर्गत बालगृह /निरीक्षण गृह/विशेष दत्तक संस्था येथील मुला-मुलींचाही समावेश या शोध मोहिमेत करण्यात येणार आहे . एकही शाळाबाह्य मुल, स्थलांतरीत मुल शिक्षणापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.

हे ही वाचा

सातपुर मधील महादेवनगर मनपा शाळेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा

२) शोध मोहीम जबाबदारी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची जबाबदारी राहील.

३) मोहिमेची अंमलबजावणी तालुकास्तरावरीलअधिकारी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका पांच्या मदतीने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी मदतनीस ३ ते १८ ची शोध मोहीम पूर्ण करतील. सर्वेक्षण दि. १७ ऑगस्ट २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत करावयाचे असून संदर्भित पत्रात नमूद केल्याप्रमाणे यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी सर्वेक्षणाला व्यापक जन धन प्रसिद्धी, प्रचार करण्यात येणार आहे , याकरिता विविध स्तरावर समिती गठन करण्यात आली आहे.सर्व नागरिकांना विनंती आहे कि,शाळाबाह्य मुलांबाबत तंतोतंत वस्तुनिष्ठ माहिती आपल्या भागातील जे कोणी सर्वेक्षण करणारे येणार आहेत त्यांना देण्यात यावी ही विनंती.

Leave a Comment