मोकळ्या जागेपासून पैसे कसे मिळवू शकाल |यातील एक तरी पर्याय लागू पडेल. How you can earn money from open space

पैसे कसे मिळवू शकाल ते पण मोकळ्या जागेपासून

आज काल लोक वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कमवू लागले आहेत.अगदी मोकळ्या जागेचे सुद्धा पैसे लोक कमवू लागले आहेत. मालकीचे रिकामी जागा असल्यास त्याद्वारे नियमित उत्पन्न मिळण्याची उत्तम संधी आहे.असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही पैसे कमवू शकता आणि हा उपक्रम सर्व सामान्य लोकांसाठी चांगला आहे. मोकळ्या जमिनीपासून काहीतरी उत्पन्न मिळवायचे असेल तर काहीतरी कल्पनाही आपल्याकडे असावी लागते, ज्याद्वारे आपल्याला मोकळ्या जमिनीचे उत्पन्न मिळू शकेल.ज्या ठिकाणी काहीच करू शकत नाही अशा ठिकाणी काही ना काही करून पैसे कसे कमवायचे याबाबत सविस्तर पाहूया. If you have free space, at least one of these ways can definitely generate income

हे ही वाचा

एकदा चार्ज केल्यावर चालते 70 किलोमीटर ही इलेक्ट्रिक सायकल|बाजारात नवीन येणार येत्या दिवाळी नंतर .

बदलत्या परिस्थितीमध्ये आणि वाढत्या संधीसह मालमत्ता भाड्याने देणे हा अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. सर्वच जागेसाठी हे पर्याय योग्य ठरतील असे नाही,पण यातील एखादा तरी पर्याय तुमच्या जागेसाठी योग्य ठरू शकतो.At least one of these options will apply to how you can earn money from free space.

1) मंदिराची स्थापना करणे

जर तुमच्याकडे मोकळी जमीन असेल तर त्या ठिकाणी मंदिर उभारू शकता.मंदिराची यात्रा,पूजा,यांची जाहिरात करून त्या ठिकाणाला महत्व आणू शकता.त्याठिकाणी गर्दी जमू लागली कि विविध दुकाने चालवू शकता.

2) जाहिरात

हे ही वाचा

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्ष पदी बाबासो जानकर यांची निवड

जर आपली जागा रस्त्याच्या कडेला असेल तर वेगवेगळ्या उद्योगधंद्याच्या जाहिराती लावण्यासाठी परवानगी देऊन आपण त्यामध्ये पैसे कमवू शकतो. काही कंपन्या अशा असतात कि, त्यांच्याबरोबर करार केल्यानंतर पैसे नियमित मिळू शकतात .या पर्यायासाठी खर्च खूप कमी प्रमाणात असून हा पर्याय योग्य ठरू शकतो. 

3) पॉप अप मार्केट

पॉप अप मार्केट ही दुसऱ्या देशातून आलेली एक संकल्पना आहे.ही योजना कुठेही केली तरी ती चालू शकते तसेच ही योजना भारतामध्ये नवीन आहे. पॉप अप मार्केट म्हणजे मोकळ्या जागेत दुकाने उभारणे म्हणजेच,आपल्याकडे जशी यात्रेत दुकाने थाटलेली असतात तशी दुकाने त्या मोकळ्या जागेत भरवता येवू शकतात. त्या ठिकाणी जी दुकाने येणार आहे त्यांच्याकडून आपण भाडे घेऊ शकतो. जसे की, आठवड्यातून एक दिवशी आठवडा बाजार भरतो तसेच त्या ठिकाणी बाजार भरवता येऊ शकतो.

4) मोबाईल टॉवर स्थापना

मोकळी जागा असेल तर ती जागा मोबाईल कंपन्यांच्या नियमात बसत असेल तर,त्यांना टॉवर उभारण्यासाठी जागा भाड्याने देऊ शकतो. 25 ते 30 वर्षापर्यंत त्या जागेचे भाडे मिळू शकते. त्या ठिकाणी एखादा माणूस चौकीदार म्हणून तेथे कामालाही लागू शकतो,त्या ठिकाणी आपल्यातील च कोणाला लाऊ शकतो.असा दोन्ही कडून ही फायदा मोबाईल टॉवर स्थापनेमध्ये आहे. 

हे ही वाचा

सातपुर कॉलनीतील जिजामाता मनपा शाळा क्र.28 मध्ये मा.प्रशासनाधिकारी बी.टी.पाटील यांच्या उपस्थितीत भव्य माता पालक मेळावा.

5) भंगार यार्ड

गाडीचा एखादा भाग खूप खराब झाल्यावर तो भंगार मध्ये दिला जातो. त्याचा कुठेतरी साठा करून ठेवावे लागतो. शहरांमध्ये त्याचा कोठेही साठा करून ठेवता येत नाही. त्याचा शहराबाहेर साठा करू शकतो, ज्या व्यक्तीला भंगारचा व्यवसाय करायचा आहे त्या व्यक्तीला ती जागा भाड्याने देऊ शकतो,किंवा स्वतःही तेथे काही भंगारचा साठा करून ठेवून व्यवसाय करू शकतो . 

6) पार्किंग

शहरांमध्ये पार्किंगची सुविधा असूनही पार्किंग करण्यासाठी जागा नसते.कारण शहरांमध्ये गाड्यांचे प्रमाण अधिक झाले असल्याने पार्किंग करण्यासाठी जेवढी जागा आपण वापरू तेवढी जागा कमींच पडत असते. ही समस्या दूर करण्यासाठी जर तुमच्याकडे मोकळी जागा ही शहराच्या ठिकाणी किंवा पर्यटनाच्या ठिकाणी तसेच देवस्थानाचे ठिकाणी असेल तर,प्रत्येक गाडीला पार्किंग करण्यासाठी जेवढी रक्कम ठरवू तेवढे भाडे मिळू शकते. 

7) क्रीडा संकुल

आजकाल अनेक लोकांना क्रीडा क्षेत्रात जाण्याची इच्छा असते. त्यासाठी खेळांचा सराव करणे आवश्यक असते. क्रीडा संकुल मध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट यांची व्यावसायिक क्रीडांगणे बनवू शकतो. हे खेळ खेळण्यासाठी भाडे ठरवू शकतो आणि प्रशिक्षणासाठी एखादा माणूस ठेवून त्यातून खूप मोठा फायदा मिळवता येऊ शकतो. 

हे ही वाचा

नाशिक महानगरपालिका शाळांची वेळ बदलली.पहा कोणत्याही शाळेची वेळ तासिका नियोजनासह.

8)कॅम्पिंग

जमीन जर नदी शेजारी ,डोंगराजवळ ,नैसर्गिक ठिकाणी तसेच समुद्रा शेजारी,असेल तर तात्पुरता तंबू लावून जागा भाड्याने देऊ शकतो. 

9) प्रदर्शन

प्रदर्शनासाठी तात्पुरती जागा लागू शकते.प्रदर्शनात जी दुकाने येतात त्यांच्याकडून भाडे मिळू शकते.

10) कृषी पर्यटन

मोकळ्या जागेमध्ये कृषी पर्यटन उघडू शकतो यामध्ये लोकांना निसर्गाची ओळख करून देऊन ,आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवून,लोकांना जेवणाची व्यवस्था करून आनंद देऊ शकतो त्याद्वारे पर्यटन चार्ज आकारू शकतो.

हे ही वाचा

Jio BP petrol pump Dealership मिळवा आणि महिन्याला कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये कमवा. सुवर्णसंधी

या सर्व पर्यायांपैकी कोणता तरी पर्याय तुम्हाला लागू पडलेच यात शंका नाही.तुम्हाला यातून खूप कमाई होवू शकते व याचा चांगला फायदा मिळू शकतो.

Leave a Comment