नाशिक मनपा स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत शाळांना पुरविण्यात येत असलेल्या शाळा प्रशासन संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) संदर्भात द्वारका येथे प्रात्यक्षिक.

नाशिक मनपा शाळा मध्ये काही शाळा स्मार्ट स्कूल म्हणून निवड करण्यात आली होती.जवळ जवळ ६९ शाळांची निवड स्मार्ट स्कूल साठी केली होती.त्या शाळांमध्ये विविध डिजिटल साहित्य उपलब्ध झाले असून त्याचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक आज द्वारका येथे दाखवण्यात येणार आहे असे मनपा शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे.स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत पुरविण्यात येत असलेल्या शाळा प्रशासन संगणक प्रणालीच्या (सॉफ्टवेअर), प्रात्यक्षिकासाठी उपस्थित राहणेबाबत अवगत करण्यात आले आहे.Demonstration at Dwarka regarding School Management Computer System (Software) provided to schools under Nashik Municipal Smart School Project.

हे ही वाचा

नाशिक सायबर पोलिसांचा “सायबर दूत” उपक्रम काय आहे जाणून घ्या : महाराष्ट्रातून होत आहे कौतुकाचा वर्षाव.

नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.च्या निधी अंतर्गत स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी मे पॅलेडियम कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पॅलेडियम) यांची स्मार्ट शाळा अंमलबजावणीसाठी “सल्लागार” म्हणून नाशिक महानगरपालिकेकडून नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. कडून मे. बेनेट कोलमन आणि कंपनी लि. यांची प्रकल्प अंमलबजावणी करिता मक्तेदार म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.

या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या शाळांमध्ये खालील प्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.Demonstration at Dwarka regarding School Management Computer System (Software) provided to schools under Nashik Municipal Smart School Project.

हे ही वाचा

नाशिक मनपा क्षेत्रात “मेरी मिट्टी, मेरा देश” अभियान : आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमाचे नियोजन

> स्मार्ट क्लासरूम, (६५६) ७५” इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल, डिजिटल कन्टेन्ट, वायरलेस माइक आणि स्पीकर सिस्टम, लॅन कनेक्टिव्हिटी, ग्रीन बोर्ड, सॉफ्ट पिन बोर्ड, विद्यार्थी बेंच, शिक्षक टेबल, शिक्षक खुर्ची, डस्टबिन, एलईडी ट्यूब लाइट्स, छतावरील पंखे, पेंटिंग आणि किरकोळ दुरुस्ती

> संगणक प्रयोगशाळा (६९) २० डेस्कटॉप संगणक, १ हाय एंड संगणक (स्थानिक सर्व्हर), प्रिंटर, LAN कनेक्टिव्हिटी, नेटवर्क रैंक, विडोज ओएस, मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूट आणि अँटीव्हायरस सॉफ्टवेअर, एअर कंडिशनर, अग्निशामक यंत्रे, ग्रीन बोर्ड, सॉफ्ट पिन बोर्ड, कॉम्प्युटर टेबल, खुर्ची, शिक्षक टेबल, डस्टबिन, शू रॅक, पेंटिंग आणि किरकोळ दुरुस्ती

> मुख्याध्यापक कक्ष (६९) २ डेस्कटॉप संगणक, Android टॅब्लेट, प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरा फीडचे निरीक्षण करण्यासाठी ३२ एलईडी टीव्ही,संगणक टेबल, संगणक खुर्ची, डस्टबिन, पेंटिंग आणि किरकोळ दुरुस्ती > शालेय स्तर (६९) क्लाउड आधारित शाळा प्रशासन संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर), २००Mbps च्या किमान गतीसह ब्रॉडबैंड इंटरनेटकनेक्टिव्हिटी, बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली, सीसीटीव्ही यंत्रणा.

मे. पॅलेडियमच्या सहयोगाने त्यापैकी शाळा प्रशासन संगणक प्रणालीचे (सॉफ्टवेअर ) प्रात्यक्षिक केंद्र प्रमुख (सर्व) आणि शिक्षण विभाग कर्मचारी यांच्याकरिता मक्तेदाराकडून आयोजित करण्यात येत आहे. त्यासाठी संबंधितांनी मनपा शाळा क्र. ४३, काठे गल्ली येथे दि. ११ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता उपस्थित राहावयाचे आहे आणि शाळा प्रशासन संगणक प्रणालीसंबंधी माहिती घेऊन त्याबाबत काही सूचना असतील तर त्या सादर करावयाच्या आहेत. शाळा प्रशासन संगणक प्रणालीच्या अंमलबजावणी दरम्यान या सूचना त्यामध्ये समाविष्ट केल्या जाणार आहेत.

हे ही वाचा

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा

केंद्रप्रमुख यांना प्रशिक्षण दिल्यानंतर ते शाळेतील शिक्षकांना सुद्धा मिळण्याची शक्यता आहे.सध्याच्या अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती शिक्षकांना मिळणे गरजेचे असते.

Leave a Comment